(॥५॥४/८॥२5७/१|_ (13२, र
0) 192490
/ ४०६] ॥४७0/॥५)
संस्कृत विद्येचे पुनर्जीवन
लेखक
नरसिंह चिंतामण केळकर
ह्वितीयावृत्ति--१९२८
किंमत ८ आणे
श्रकाशक- काशीनाथ नरासिह केळकर बी. ए. ( टिळक विद्यापीठ )
पुट्रक-
गोपाळ बळवंत जोशी आनंद छापखाना, सदाशिव पेठ, पुर्थे.
प्रकाशकाचे दोन शाब्द
र्णापणणन््याक्ऊिि(000309पन्नणण-------
या पुस्तकांत आलेली लेखमाला सुमारें पंघरा वर्षापूर्वी केसरीत प्रसिद्ध झाली होती व त्या नंतर ' केळकरकृत लेखसंग्रह ? या ग्रेथांत छापली गेली होती. सदर लेखसंग्रह आज बर्रींच वर्षे उपलब्ध नसल्यानें त्याचें पुनर्मुद्रण करावे अशा आग्रहाच्या सुचना बऱ्याच जणांनी केल्या. परंतु समग्र लेखसंग्रहाची पुनरावृत्त काढणे हें तूर्त संभवनीय नसल्याकारणाने शक्य तर खंडराः हें काम करावें असें योजलें आहे. लेखसग्रहांतील सवं इतिहास विषयक लेख “' इतिहासविद्दार” या स्वतंत्र पुस्तकांत यापूर्वीच प्रसिद्ध केळे असून, संस्कृतविद्येच्या पुनरुज्जीवना संबंधी जो प्रयत्न सध्यां श्वाळूं आहे, त्याला या पुस्तकांतील चर्चेने साह्य होईल, या हेतूनें इं पुस्तक प्रासेद्ध केलं आहे.
-_प्रकाराक
मस्तावना
सुमारें पंधरा वषापूवी ' संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन? या विषयावर केसरीत मीं एक अग्रलेख-माला लिहिली. ती त्या वेळीं पुष्कळ वाच- कांना आवडली. कांदींनीं तर ती लेखमाला स्वतंत्र पुस्तक रूपानें छाप- ण्याची सुचना मोठ्या भाग्रहाने केळी. त्या वेळीं ती सूचना फलद्रूप झाली नाहीं.
हल्ली पुणे येथे एक स्वतंत्र व कांर्हासे जुन्या पद्धतीचं संस्कृत कालेज निघावे, आणि त्याला जुन्या संस्कृत कालेजाचीच म्हणजे विश्रामबाग वाड्याची जागा मिळावी अशी चळवळ चाळू आहे. १९१२ सालीं सिमला येथे भरलेल्या सरकारी विद्याधिकाऱ्यांच्या परिषदेने प्राच्य- विद्यांच्या पुनरुज्जीवना संबंधानें ठराव केले त्यांत इतर कांहीं इलाख्या- प्रमाणेच मुंबई इलाख्यांताहे सरकारानें संस्कृत कालेज काढावें अक्ी एक सचना होती. आणि हिंदुस्थान सरकारानोहि या इलाख्याला एक लक्ष रुपयाची विशेष देणगी परिषदेच्या सर्वे ठरावांना उद्देशून दिली होती. परंतु पुढे लवकरच महायुद्ध सुरू झालें आणि नव्या राजकीय सुघा- रणांत शिक्षण हा विषय वरिष्ठ सरकाराकडून प्रांतिक सरकाराकडे तोडून देण्यांत आला. यामुळें सिमला परिषदेच्या सूचनांपैकी इतर एक दोन सुचना थोड्याबहुत अमलांत आल्या ब येतहि आहेत तरी संस्कृत कोलेजा- संबंधी पुढें कांहींच झालें नाहीं. ती पूर्वीची कल्पना धेऊनच संस्कृत विद्येविषयीं आस्था बाळगणाऱ्या कित्येक ग्रहस्थांनीं संस्कृत कालेजा संबं- घाची चळवळ क्ृल्लीं सुरू केली आहे. अशा वेळीं ' संस्कृत विचेच्या पुनरुज्जीवना' ची माझी लेखमाला पुस्तकाच्या रूपाने छापल्यास तिचा
.२.]
या विषयाच्या चर्चेला बराच उपयोग होईल असें वे. शा. सं. किंजवडेकर शास्त्री यांनी सुचावेल्यामुळें हें पुस्तक हल्ली प्रसिद्ध करण्याचा योग आला आहे. पुराण वस्तु संशोधन व संरक्षण हें आतां हिंदी देशभक्तांपासून तों स्वतः इंग्रज सरकारपर्यंत सवांना सारखंच मान्य झालें आहे. मग संशोधन सरक्षण यांना संस्कृत विद्येइतकी मोल्यवान् इतर वस्तु कोणती! हीच रष्टि अंगिकारून, तथापि जुन्या संस्कृत विद्यापद्धतीचे गुण ब दोष हे दोनहि लक्षांत घेऊन, तिच्या पु नरुज्जीवनाविष्यी केलेली चर्चा या पुस्तकांत वाचकांस वाचावयास सांपडेल असं मला वाटते.
१
पुणे, ता. २० डिसेंबर १९२६, न. चिं. केळकर
अनुक्रमणिका
विषय
१ विषयोपन्यास क २ सिमला कान्फरन्सच्या सूचना पव ३ जुने व नवे पंडित म
४ जुन्या व नव्या पद्धतीचे साहचर्य ... ५ थोडी प्राचीन माहिती ६ दक्षिणी पंडित
७ महाराष्ट्रांतील कांहीं पंडित घराणीं ...
८ संस्कृत विद्या व राजाश्रय
९ पुनरुज्जीवनाचा एक मार्ग १० संस्कृत विद्या व युरोपियन पंडित ११ देशी भाषांच्या द्वारे झालेले प्रयत्न
पृष्ठ
“> विद्येचे टू $ प् पत्रूजीवत
विषयोपन्यास
६ मन ? बदलते म्हणा किंवा ' मनु , बदलतो म्हणा, कांही तरी बदलते खरं, एरबीं मानवी विचारसृष्टीमध्ये अल्पावकाशांत प्रचंड फेर- बदल होतात तसे झाळे नसते. गंगा, सिंधु वगेरे नद्यांच्या काठी राह- णाऱ्या लोकांना असा नेहमीं अनुभव येतो कों, यंदा ज्या ठिकाणीं सेतीचं विस्तीर्ण मैदान तुडबीत जावें लागते, तेथेंच पुढच्या वर्षी पहाबें तो भालाभर पाणी होऊन खुशाळ नावा खेळूं लागतात. लोकगंगेचा प्रवाहहि असाच कांहींसा लहरी आहे. आज जे निंद्य म्हणून तिच्या धारेपुरढे जोरानं वाहून नेळें जातें व कचित् नाशाहि पावते, तेंच उद्या वंद्य बनून स्वतः सुस्थिर ब दुसऱ्यास आश्रयस्थान होऊन राहते. हा नियम मनु- ष्याच्या पोषाखासारख्या व चालीरीतीसारख्या अगर्दीच अशाश्वत किंवा चलस्वबभाव गोष्टींना लागू आहे असें नव्हे; तर विद्या, ज्ञान, संस्काते अशा समाजाच्या काळज!शी मिनलेल्या गोष्टींनाही तो लागू पडतो. नीतीच्या आणि धर्मबुद्धीच्या अगर्दी अंतिम कल्पनाखेरीज करून बाकी सर्व कांहीं युगांतराबरोबर--म्हणजे प्रतिमन्बंतराबरोबर-बदलत असतें, उदाहरणार्थ, श्रीरामचंद्र, धर्मराज, अश्लोक, सीझर, शालमेन किंवा पंचम जाजं यांच्या राज्यारोहणाच्या प्रसंगीं मस्तकावर घालण्याच्या मुगुटांचा आकार व स्वरूप हीं खरोखर वेगवेगळींच असतील, पण त्रेतायुगांतील ६ रामराज्य ? व कलियुगांतळें ब्रिटिश अमलाखालचें “ आराम-राज्य ? या दोहोंमध्ये सत्य, न्याय, परोपकार, अशा मूलभूत व शुद्ध सद्युणांचें स्वरूप एकच आढळणार. कित्येक गोष्टी या दोन टोकांच्या दरम्यान
र संरकृत विद्येचे पुनरुज्जीवन
येतात. त्यांच्या कल्पना नीतितत्त्वांडईतक्या अढळ प्रबपदारूढ नसतात; किंवा दुसऱ्या पक्षी भाषा, पोषाख किंवा चालीरीती यांच्याइतक्या बारा बारा कोसांवर किंवा एकेका पिढीस बदलत नाहींत. पण, म्हणून त्या अस्थिर आहेत असे नाहीं. अमुक इतकीं वर्षे किंवा अमुक इतक्या पिढ्या म्हणजे एक मन्वंतर असे कालमानाचें कोष्टक कोठें ठरविलेले आढळत नाहीं. पण विद्या, ज्ञान, कला व संस्कृति यांच्या बऱ्यावाइटपणाच्या कल्पना मन्वंतरानुरूप बदलत जातात ही गोष्ट निर्विवाद आहे. मग वर्ष- मानाचे गणित कांहीं होवो !
संस्कृत विद्या-अर्थातू आर्य संस्कति-इच्या बरेवाईटपणाच्या कल्पनेत अश्या प्रकारची मन्बंतरें पूवी होत आली आहेतच. पण विशेष सांगा- वयाची गोष्ट ही कॉ, आजच्या घटकेसहि ती अश्या एका मन्वंतरांतून जात असून आमची संक्रमणक्रिया आमच्या स्वत:च्या डोळ्यांस दिसण्या- इतकी उघड व जलद घडून येत आहे. ब्रिटिश राज्य हिंदुस्थानांत सुरू होण्यापूर्वी सस्कृत विद्या हीच निर्लिवादपणे सिंहासनारूढ होती. इंग्रज- शाही झाल्यावर सन १८३५ सालीं लॉड मेकाले यांनीं तिळा आपल्या लेख्णांच्या एका फटक्यासरशी पदच्युत केले, व तिचें सिंहासन आंग्ड- विद्येस देऊन टाकलें. पण १९३५ साल अवतरण्यापूर्वी, विद्येच्या पोट- राज्यांत एक लहानशी राज्यक्रांति होऊन आर्यविद्या आंग्लविद्येच्या बरो- बरीनें तें सिंहासन फिरून अडवून बसेल व समाईक अम्मल गाजवू लागेळ, यांत आम्हांस मुळींच दोका वाटत नाहीं. भार्यव आंग्ल या दोन विद्यांचें तरी संयुक्त स्वराज्य त्या अवर्धींत नांदू लाणून, भावी राष्ट्रीय सूर्यॉदय़ाचा तो शुभसुचक व उल्हासजनक असा अरुणागम ठरेल असें आमचें मन आम्हांस साक्ष देत आहे.
इंग्रज लोक हे स्वतः मोठे विद्याप्रिय असल्यामुळें त्यांचा पाय या देशांत रुजल्यावर इकडील लोकांख्र शिक्षण द्यावें अशी त्यांस सहृजच
विषयोपन्यास ३
इच्छा उत्पन्न झाली. पण तं शिक्षण कशाचें व कोणत्या रीतीनें द्यावें या- विषयीं त्यांना थोडासा विचार पडला. याचें खरें कारण असें कीं आर्य संस्कृतिसंबेधाने त्या वेळच्या इंग्रज लोकांच्या मनांत फारसा आदर नव्हता. आधी संस्कृत भाषा ही मृत भाषा असून लोक हल्लीं ती बोलत नाहींत; हल्लीं बोलत असणाऱ्या भाषेत चांगलासा ग्रेथसंग्रह नाही; व फार जुन्या अशा एका काळीं हिंदी ठोक चांगले शिकले सुधारलेले असले तरी आज हातीं लागणाऱ्या संस्कृत ग्रेथांत व्यवहारोपयोगी असे वाड्मय अथबा शास्त्रीय ज्ञान मुळींच नाहीं; आहे ते वेड्या धर्मसमजुती व बाष्कळ लोकभ्रम यांनीं दूषित असेंच आहे; अशी त्या काळच्या इंग्रज पंडितांची ब मुत्सद्यांची समजूत होती. पेशवाई नष्ट झाल्यापासून पंघरा वर्षोच्या आंतच जुन्या व नव्या विग्रेच्या वादास रूप आलें. लोंडे बॅंटिंक यांच्या अमदार्नीत या वादाचा निकाल लावण्याचे काम एका स्वतंत्र कमिटीकडे सोपविण्यांत आलें, प्रथम प्रथम तिजमध्यें आर्यविद्यच्या पुर- स्कर्त्यांचा पक्ष वरचढ होणार असें दिसत होते. पण पुढें लवकरच आंग्ल भाषा व पाश्चात्य विद्या यांच्या पुरस्कत्यीचा जोर झाला. या मतमेदांतून
काय तोड निघते हें कांहीं वेळ कोणासच सांगतां येण्यासारखे नव्हते, पण याच सुमारास सदर कमिटीवर लाडे मेकाले यांची नेमणूक होऊन त्यांनी जे जोरदार मिनिट लिहिलं त्याने पारडं फिरले; अखेर १८३५ सालीं हिंदुस्थान सरकारानें लार्ड मेकाळे यांच्या मिनिटाच्या आधारेच ठराव लिहून प्रसिद्ध केला; आणि आज सुमारे ७५ वर्ष जिचा अंमल अबाधित चाळत आला आहे, त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीचा मूळ पाया भरला गेला. आयेविद्येच्या पुरस्कत्यांनीं फिरून एक नेटाचा प्रयत्न करून सदर ठराव हाणून पडतो का पाहिलें; पण त्यांचा हा प्रयत्न सिद्धीस गेला नाहीं. लाड आकलंद यांनीं सन १८३९ साठीं एक नवीन ठराव लिहून पूर्वीचाच ठराव कायम केला. त्या ठरावाचा मथितार्थ असा होता
४ संस्कृत विवेचें पुनरुज्जीवन
कीं, “ युरोपियन वाड्मय, तत्त्वज्ञान ध शास्त्रे, यांचें वरिष्ठ प्रतीचे शिक्षण देणे त इंग्रजी भाषेच्या द्वारें दिलें जावें; तथापि विद्यमान पोवात्य शिक्षण- संस्थांचे कामहि पूर्णपणें जोरांत चालूं ठेवावें; आणे इंग्रजी शिक्षण- संस्थांत शिक्षण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस उत्तेजन देण्यांत येईल तितकेच पोवोत्य शिक्षणसस्थांतून शिक्षण मिळविणाऱ्या विद्याथ्यांना देण्यांत यावे, देशभाषा व इंग्रजी भाषा यांच्या शिक्षणाचा मिलाफ करण्यांत यावा; पण आपणास पाहजे त्या प्रकारचें देशी किंवा इंग्रजी शिक्षण घेण्या'ची प्रत्येक व्यक्तिमात्रास स्वतंत्रता ठेवण्यांत यावी, ” लार्ड मेकाले यांच्या एकतर्फी दिसणाऱ्या मताचा तोल संभाळण्याचा प्रयत्न करण्याचा सदर ठराबाचा हेतु उघड दिसुन येतो. परंतु पुढील अनुभवावरून पहातां हा समतोल- पणा बिलकुल टिकला नाहीं असेच म्हणावें लागते. पण याला कारणेंहि तशाच होतीं. आर्यविग्रेलाहि उत्तेजन द्यावें असे सरकारनें म्हटले खरें; पण सरकारच्या मनांत त्या विद्येबद्दल जर मुळीं आदरखबुद्धांच नव्हती तर केवळ आपला शब्द खरा करण्याकरितां म्हणून त्यांच्या हातून त्या विद्रेस भरपूर द्रव्यसहाय्य कसे होणार £ मेकालेने आपल्या मिनिटांत जे शब्द लिहिळे त्यांचाच प्रतिध्बनि प्रत्येक इंग्रजाच्या मनांतून निघत होता. मेकाले- साहेब आपल्या मिनिटांत लिहितात:--““ आपण ज्ञान-प्रसारक मंडळी असा मोठा किताब धारण केला आहे खरा. पण वस्तुतः पहातां तो घेण्यास आपणास बिलकुल अधिकार नाहीं. आपली काते पाहिली तर खऱ्या ज्ञानाचा प्रसार आपण मुळींच करीत नसून, खोटे ज्ञान नाहींधे होत चाललें आहे त्यास मात्र आडवे येत आहे. ज्या पुस्तकांतील (संस्कृत) मजकराची किंमत त्यांतील कागदाच्या किमती इतकीहि व्हावयाची नाहीं असली-म्हणजे बाष्कळ इतिहास, बाष्कळ पदार्थविज्ञान, बाष्कळ इश्वर- ज्ञान वगैरे विषयांवरील -पुस्त्के आपण छापून प्रसिद्ध करीत आहों... आपणापुढे आज प्रश्न हाच आहे की, युरोपियन वि दयेसारखी विद्या व
विषयोपन्यास च
चाड्मय, इंग्रजीसारख्या संपन्न व श्रीमान् भाषेच्या द्वारें हिंदी लोकांस देण्याचें हाती असतां, ज्या भाषत आमच्या ( इंग्रजी ) ग्रेथासारखे ग्रंथ नाहींत, व बरस्पर विरोध आला असतां ज्या भाषेतील ग्रथ इंग्रजी ग्रंथा- पुढें कुचकामाचे ठरतात, त्या भाषेंतील ग्रेथ सरकारनं शिकवावे काय १ आमच्या ( इंग्रजी ) सारखें गहन तत्त्वज्ञान व सत्यपूर्ण इतिहास शिक- बण्यासारखा असतां, तो टाकून द्याबा काय १ आर्यवेद्यकशास्त्र घ्या; एखादा इंग्रज नालबंदहि त्याहून अधिक चांगलें वेद्यक जाणतो ! आर्य ज्योतिष पहा; आमच्या ( इंग्रजी ) शाळेतील परकर नेसणाऱ्या पोरीही या ज्योतिषशास्त्राचे सिद्धांत ऐकून फिदी फिदी इंसतील ! इतिहासग्रंथ घ्या; त्यांत वीस वीस हात उंचीच्या व तीस तीस हजार वर्षे राज्य कर- णाऱ्या राजांची वर्णनं भरलेली ! आणि भूगोलाविषर्यी तर बोळावयासच नको ! कारण त्यांतल्या दुधातुपाच्या-पंचामृताच्या-समुद्रांतत वाचक गटंगळ्या खावयाला लागावयाचा ! असली ही बाष्कळ विद्या मुलांना पढविण्याला जर आम्ही सरकारी पेसा खचच केला तर धिक्कार असो आमच्या ज्ञानाला, सुधारणेला व विद्याप्रियतेला ! लाड आकलंद यांच्या १८३९ च्या ठरावाने या जळजळीत शाब्दांगारांवर थोडीशी राख पसर- ण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यांची उष्णता कशी कमी होणार १ या उष्णतेने थोडक्याच काळांत आयेविद्येचा वृक्ष होरपळून गेला.
पण या बाबतींत लॉर्ड मेकाळे यांसहि फारसा दोष देण्यास आम्ही तयार नाहीं. त्यांनीं आपल्या “ मिनिटां ' त इंग्रजी भाषा ब वाढ्य यांचं जे महत्व वर्णिले आहे तें कोणीहि नाकबूल करणार नाहीं, आणि केवळ संस्कृत भाषेचंच अध्ययन व तेंहि पूर्वपरंपरेप्रमाणें चाळू ठेवावयाचे १ अथवा इंग्रजी भाषारूप नदीच्या द्वारें युरोपियन ज्ञान व सं्स्कात यांच्या समुद्रांत हिंदी लोकांचा प्रवेश करून घ्यावयाचा १ असरे दोनच पक्ष पुढें आलि असतां या दुसऱ्या पक्षास कोणी अनुकूल अभिप्राय देणार नाही
द् संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
असें सहसा व्हावयाचे नाहीं. फार काय पण त्या वेळचा अग्रगण्य समाज-
सुधारक राजा राममोहन रॉय हा स्वतः चांगला संस्कृत पडित असतांहि त्यानें इग्रजी शिक्षणाचीच तरफदारी करून कंप्रनीसरकारकडे अर्ज घाडला
होता, ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. राममोहन राय यांची संस्कृताची आवड व आर्यविद्येचा अभिमान मेकालेहून पुष्कळच अधिक होता यांत शका नाहीं, परतु इंग्रजी भाषेच्या द्वारें युशोपेअन विद्या शिकविण्याच्या बाब- तींत त्या दोघांचे ऐकमत्य होतें ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. मेकॉलेच्या मनांत आर्यविद्येविषयी तिरस्कार होता म्हणून इंग्रजी शिक-
वावें असे त्याचें धोरण होतं; राममोहन राय याच्या मनांत आर्यविद्येचा
यथार्थ अभिमान असतांहि, ती विद्या निःसंशय अपूर्ण आहे.व तिच्या पूर्णतेस भरती दाखल घधालण्यासारखे इंग्रजी वाढ्य़यांत पुष्कळच आहे,
हे तो जाणत होता म्हणून इंग्रजी शिक्षणास त्याची अनुकूलता होती.
मेकालेचें ज्ञान एकांगी होतें व राममोहन राय यांचे ज्ञान उभयांगीं होतं.
तथापि, दोहोंनीं दिळेला अभिप्राय एकच होता. यांचे कारण आमच्या तरी नजरेस असे दिसतें कीं, भौतिक शास्र व इतिहास यांच्या ज्ञानाची या दोघांनाहि विशेष किंमत वाटत होती; व हें ज्ञान देणारे ग्रथ सस्कृत भाषेंत फारस नाहींत अशी दोघांचीहि खात्री असावी. धर्म, नीत, मानसशास्त्र वगैरेसंडंधार्नेच वाद असता तर, मेकाठेसारख्याचे तिरस्कार युक्त आक्षेप खोडून काढणं कोणासह्ि सहज रकक्य झालें असतं. आणि राजा राममोहन रोयासारख्या सुधारक व स्वदेशाभिमानी विद्वानास मेकालेच्या पदरांत त्याच्या चुकीचे माप घालतां आलें असतें. पण त्या वेळी विद्येचा विचार झाला तो भौतिकशास्त्रविषयक ग्रंथाच्या गुणावगुणा- वरच झाला हें निर्विवाद आहे.
सिमला-कॉान्फरन्सच्या सूचना
इग्रजी भाषा व पाश्चात्य विद्या यांना संस्कृत विद्येचे सिंहापन मिळ- ण्याचें एक प्रमुख कारण कोणचे होतं याचा विचार मागील लेखांत झालाच आहे, पण इंग्रजी भाषेचं प्रवर्तन होण्यास याहूनाहि बलवत्तर असं एक कारण होतें; तं हें की, हिंदुस्थानांतील राज्यकारभार चालावयाचा होता व तो चालण्यास इंग्रजी भापा शिकून तयार झालेले लोक सरका- रास हवे होते. या देशांत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या अनक सद्धेतूपेर्की एक हेतु मूळपासून राज्यकारभार चालविण्यास लायक व उपयोगी असे नोकर तयार करण्याचा होता. अथात् केवळ संस्कृत पढलेले लोक कार- कुनी पेषास कसे उपयोगी पडणार १ अव्बल इंग्रजी भाषा ही ब्राम्हणा - च्या मुखास अपवित्र करणारी वस्तु आहे अशी समाजाची कल्पना अस- तांही आपली धर्मबाद्ष व इग्रजी विद्या यांचा मेळ घालण्यास पहेल्या पिढीतले लोक तयार झाले. सरकारास नोकर हवे होते म्हणून व लोकांस नोकऱ्या हव्या होत्या म्हणून इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. उदू भाषा ही इंग्रजीइतकीच देशबाह्य; “ न वदेत् यावनी भाषां प्राणः कंठगतेरापे ” हें वचन बहुधा मुसलमानी भाषेसंबंधाचेंच आहे. असें असतां राज्यकत्यांच्या भाषेचा अंमळ अधिकाराच्या स्वाभाविक गणांमुळें प्रजेवर किती बसतो हें १६1१७ व्या दातकांत निदर्शनास आलें. खुद्द शिवाजीच्या वेळच्या कागदपत्रांत उर्दू लिपी प्रचाराने मोडी- व्या जवळ जवळ होती व केवळ खासगी पत्रव्यवहारांतहि पत्रांतील निम्याहून अधिक शब्द उदू असत अले दिसते. श्राशिवाजीमहाराजांना स्वराज्य स्थापल्यावर या वस्तुस्थितीचा चमल्कारकपणा भासून * राज्य. व्यवहारकोशा ? सारखा ग्रेथ करवून परकी शब्दांचा निःपात करण्याचा त्यांनी उद्योग केला. पण तो जावा तितका सिद्धीस गेला नाहीं; व खुद्द शेन पेशवाईच्या काळांतील कागदपत्रांच्या सोंगट्यांच्या पटांत उर्दू वगेरे
ट संस्कृत विद्यच पुनरुज्जीवन
परकी शब्दांनी सर्व : कटी ? पकडून नाकेबंदी केलेली आढळून येईल. मागलांच्या कृपेनें स्वराज्य परत मिळविलेले शाहूमहाराज व पेदाव्यांच्या तेजाने लोपलेल त्यांचे वंशज हे नामशेष होऊन, महादजी शिंद्यानें मोंगल सत्तेचा दाह काहून उलट दिल्लीवर आपला काटशह चढविला असतां, दरबारी व राजमान्य कागदपत्रांवर मुसलमानी तारीख बरेच दिवस झळ- कत होती; म्हणज अर्धवट धार्मेक स्वरूप असलेल्या कालगणनेच्या बाब तांत स्वराज्य स्थापन झाल्यावरही, एक वेळ विशिष्ट परास्थतीमुळें आपणा- वर लादल्या गेलेल्या परपरेचें पंकाट आम्हांस पुरं मोडतां आले नाहीं, ही गोष्ट सहसा विसरतां येत नाहीं, अथात् पेशवाई ळोपल्यावर व हिंदु स्थानांत चहंकडे ब्रिटश राज्यसत्ता स्थापित झाल्यावर राज्यकारभाराची दृष्टि प्रमुख ठरली; राज्यकत्यांची भाषाच शिकविण्याचा इंग्रजांनी हृषट्ट घरला; व नोकरीच्याच काय पण कांहो अर्शी ज्ञानाच्याहि दृष्टीने आम्ही तो पुरावेला. प्रथम कांहीं दिवस नवी विद्या व जुनी विद्या या दोर्न्हाही समसमान चालू होत्या; किंबहुना लार्ड अमहर्स्ट यांच्या ठरावानंतर कांहीं दिवसपर्यंत इकडे संस्कृत काळेजाला जे महत्व होतें ते इंग्रजी शाळेला नव्हतें. पण इंग्रजी शिक्षण मिळविलेली पिढी जसजशी उदयास येऊं लागली तसतशी संस्कृत विद्येची पीछेहाट होऊ लागली. उभय विद्यां- च्या मिश्रणाने नव्या पिढींतील विद्वानांस प्रास झालेलें तेज मोहक हातच. परंतु दिव्याच्या मार्ग “ रिफ्लेक्टर * किंवा प्रतिर्बिबक लाविला असतां त्याचं तेज जसं दुर्धर होतें त्याप्रमाणें या नव्या पिढीच्या विद्वत्तेच्या तेजास सरकारी नोकरी, मोठा पगार, अधिक राचमान्यता यांचें जोरदार पाठबळ मिळाल्यामुळे तीच विद्दत्ता दुधर झाली. या जुन्या ब॒ नव्या विद्यांचे प्रवाह कांहीं काळपर्यंत समांतर वहात होते हं वर सांगितलेंच आहे. पण एक लहान व एक मोठी अशा दोन नद्या केतीहि दूरवर समांतर वहात असल्या तरी, जरासे लवण येतांच मोठ्या नर्दीत लहान
सिमला--कान्फरन्सच्या सूचना ९
नदी मिसळून जाळून त्यांचा एकच प्रबाह पुढें चालतो व त्या प्रवाहाला या मोठया नदीचे नामरूप प्राप्त होतें अशाच रीतीनें प्रथम कांही दिवस दक्षिणा वगेरेनीं जगविलेली संस्कृत विद्या लवकरच नामशेष झाली, व इंग्रजी विद्येचा प्रवाह मात्र एकटाच जोरानें पुढें वाढत चालला; म्हणजे पूर्वी केवळ संस्कृत विद्येचा उत्कर्ष तर आतां केवळ इंग्रजी विद्येचा उत्कर्ष अशी स्थाति येऊन पोचली !
पण मागील लेखाच्या प्रारंभीं सांगितल्याप्रमाणें हा मनु हली पालटून फिरून संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन होण्याचा रंग दिसत आहे. संस्कृत विद्येपुरती ही प्रतिक्रिया होय. तथापि, इंग्रजी भाषा व युरोपियन विद्या यांचें योग्य महत्व कोणत्याही प्रकारें कमी न होतां संस्कृत विद्या जी विनाकारण मागासली आहे, तिर्चे योग्य महत्व मात्र तिला फिरून प्रात व्हावे, हेंच या नवीन मन्वंतराचें विशेष लक्षण होय; व हें मन्बंतर कसें काय घडून येत आहें हें आपण पाहूं. या मन्वंतराचा हातेहास अथातच मनोरंजक आहे. पण त्याचें सिंहावलोकन करण्यापूर्वी आजची स्थिते प्रथम एकदम थोडक्यांत सांगून टाकणें बरे.
वर वर्णन केलेली निराशाजनक स्थिति हल्ली पालटून आयािद्रेच्या पुनरुज्जीवनास उत्तेजन मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मद्रास ब लाहोर या युनिव्हासिट्यांमध्ये आर्यविचेची शाखा जोडण्यांत आली असून त्या शाखेचे पदवीधर परीक्षा देऊन निर्माण होतात; व युनिव्हार्सिट्या या प्रायः अजून सरकारी संस्था असल्यामुळें आर्यवियेस मिळालेले ह उत्तेनन सरकारच्या खाती जमा करण्यास कांही हरकत नाहीं, पण याहून अधिक आशाजनक अशी प्रमाणेही या बाबतींत दष्टास पडत आहेत. हिंदुस्थानच्या विद्याखात्याचे अधिकारी ना. सर हारकोर्ट बटलर हे आयोवेद्येच्या पुनरुज्जाबनास अनुकूल असून त्यांच्याच उद्योगाने गेल्या जुलै महिन्यांत सिमला येथें आर्यावेद्येच्या सरकारी व खासगी पुरस्कत्यीचें
१० संस्कृत विद्येचे पुनरुज्जावन
एक संमेलन भरलें होतें. सदर समेलनास डो० थिबू, मि० व्हेनिस, डॉ ० होरोविडस, डॉ० रॉस, वगेरे युरोपियन संस्कृतजञ लोक; डो० रामकृष्ण गोपाळ भांडारकर, प्रो. श्रीधरपंत भांडारकर रा. बे. शरश्रद्रदास, डा० गंगानाथ झा, महामहोपाध्याय हरप्रसादशास्त्री, प्रो ० रंगाचार्य वगैरे हिंदु संस्कृतश लोक; आणि प्रो० इस्पह्याने, मौलवी कमालादेन अहमद, शमस--उल-उलेमा शिबलळी नोमानी वगेरे पार्शयन व आरबी पॅडित ग्रहस्थ हजर होते. समलनांत मुख्य विषय पोवात्य-म्हणजे संस्कृत, फार्शी व आरबी या-भाषांच्या द्वारं मिळणाऱ्या विचययेस उत्तेजन कोणत्या प्रकारे द्यावे हा होता. या विषयाचा अनेकांगांनी विचार होऊन जे ठराव मंजूर झाले त्यांचा गोषवारा खालीं दिल्याप्रमाणें आहे. जुन्या तऱ्हेनें शिक्षण मिळविलेले पंडित प्रवीण असतात ब त्यांचा उपयोग फार होतो. त्यांचे शिक्षण एकांगी असतं खरें; पण तं घालवितांना त्यांच्या जुन्या पद्धतींतले गुण नष्ट होऊं देतां कामा नये. पंडित व मोलवी लोकांस त्यांचें अध्ययन पुर॑झाल्यावर जरूर तितकी इग्रजी भाषा शिकवून युरोपियन विद्येच्या संस्कृतीचाही फायदा घेतां येईल अशी कांहीं सोय करावी; व संशो- घनाची पद्धांते आणि चिकित्सक बुद्ध यांचे ज्ञान आणि रीति हीं त्यांस प्रास करून देऊन त्यांच्या ज्ञानास अनेकांगित्व मिळवून द्यावें. इंग्रजी शिकणे हें केवळ भाषेच्यादृष्टाने असून ऐेच्छक आहे असे समजावे, व
केव्हांहि मोलवी-पडितांचे जुन्या पद्धतचिं अध्ययन बरेचसे झाल्याशिवाय त्यांस इंग्रजी शिकवू नये, नव्या पद्धतीचे ज्ञान इंग्रजी भाष्रेशिवाय देतां येणारच नाहीं असं नसल्यामुळें, देशी भाषेत व्याख्याने देऊनही शक्य तर तं ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा.
या सवे गोष्टी इष्ट आहेत. पण त्या प्रत्यक्ष अमलांत कशा आणाव्या यासंबंधाने खार्लांल सचना पसंत करण्यांत आल्या. पोर्वात्य विद्येस उत्ते- जन देण्याचे कामास तळापासून म्हणजे खासगी शाळा-पाढशाळा यांपासून
सिमला-कान्फरन्सच्या सूचना १९
सुरुवात करावी, हृल्लों कलकत्ता, बनारस येथें संस्कृत कालेजें आहेत, व कलकत्त्यास मुसलमानी ' मद्रेसा ? आहे, तशा प्रकारच्या सरकारी व खासगी जुन्या सस्था कायम ठेवून नवीन घालाव्या. डा. भांडारकर यांचें तर असे म्हणणं आहे काँ, इतर इलाख्यांच्या-विशेषतः बेगाल्या च्या मानानें-मुंबई इलाख्यांत सरकार जुन्या (विग्रेस द्यावें तितर्के उत्तेजन व पेशाची मदत देत नाहीं; सबब जुन्या संस्कृत कालेजासारखी स्रुस्था पुण्यास स्थापार्बी व इतर पाठशाळा वगेरेंना अधिक मदत द्यावी. जुन्या विदेस उत्तेजन देण्याचें काम नीट रीतसर होतें किंवा नाहीं हें पाहण्यास इन्स्पे- क्टर नेमण्यांत यावे. हलींच्या इंग्रजी कालेजांतून ठेवलेल्या पंडित-मोल- बींच्या जागांचे पगार वाढवावे. खासगी रीतीने शिकणाऱ्या विद्याथ्यांना शिष्यवृत्ति वभेरे देऊन त्यांच्या जेवणाखाण्याच्या विद्यमान सोई सवल. तीस मदत करावी. जुन्या विद्येत प्रावीण्य दाखविणाऱ्या लाकांस सर्टि- फिर्कटे द्यावी. महामहोपाध्याय वे शमस-उल-उलेमार्या पदव्यांबरोबरव त्यांना कांही तनखा देण्याची पद्धत सुरू करावी. महामहोपाध्याय वगेरे मोठया पदव्यांपेक्षां कांहीं खालच्या दज्याच्या पदव्याही निमाण कराव्या. जुन्या ग्रेथांचे संग्रह करण्याचें काम पूर्वीपासून सुरू आहेच ते चालू ठेवून, त यांच्या रीतसर याद्या वगैरे तयार कराव्या.
पौवोत्य विद्येला उत्तेजन द्यावयाचे तर हल्लीं चाळू असलेल्या प्रयत्नां- वर न थांबतां निरानेराळ्या युनिव्हासट्यांच्या द्वारे कांही विशेष योजना कराव्या १ किंवा सवे हिंदुस्थानास मिळून एक नवीनच मध्यवती संस्था कलकत्ता अगर मुंबई येथे स्थापावी १ हाही प्रश्न कॉन्फरन्सनें विचारांत घेतला. या बाबतीत बहुतेक सव सभासदांचे असे मत पडले कीं, देशी विद्येलळा उत्तेजन देण्याच्या कामी युनिव्हासिट्या या म्हणण्यासारखे कांहीं- एक करीत नाहींत; म्हणून केवळ याच उद्योगास वाहिलेली अशी एखादी मध्यवती सस्था निमोण करणें जरूर आहे. युनिव्हर्सिट्यांनीं कितीही
१२ संस्कृत विधेचे पुनरु्जावन
केलें तरी तें फारच थोडें असणार; कारण इतर सर्व विषय-विशेषतः आधुनिक युरोपियन विद्या-यासंबधाने मुख्य जबाबदारी त्यांचेवर पडते. शिवाय युनिव्हार्सटींत प्रवेश होण्यास इंग्रजी भाषा येणं अद्यापि अवश्य असल्यामुळें पडित व मोलवी यांना युनिव्हर्सिट्यांनीं या दिशेनें केलेल्या वाढत्या सोईचा फायदा घेतां येणं कठिण आहे. तरी पण मध्यवती संस्था निघाली म्हणून प्रांतानिहाय याच दिदोने ज्या ज्या काय गोष्टी कारेतां येर्]ल त्या नकोत असं मात्र नाहीं. दरएक प्रांतांत वेगळें वेगळें असें जे करितां येणार नाहीं तेंच द्दी मध्यवर्ती संस्था करील, पण जुन्या शाळा व पाठशाळा यांस मदत देणें, नव्या काढविणें, शिष्यव्रात्ते सर्टि- फिकोटें वगेरे देणं या गोष्टी प्रांतानिह्याय निरानेराळ्या कारेतां येतील व कराव्या. कोणत्याही प्रांतांतील शाळाखातं व युनिव्हासेटी यांच्याही आंवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी मध्यवता सस्थेनं करावयाच्या आहेत; किंब- हुना पोवात्य विद्येच्या बाबतींत वरिष्ठ प्रतीची जी जी सलामसलत द्याव- याची ती शिक्षणाची खातीं व य॒निव्हाशषेट्या यांना याच संस्थकडून मिळतील इतक्या तोलाची ती असली पाहिजे. सदर सस्था कोठें स्थापन व्हावी-म्हृणजे ती कलकत्त्यास असावी अगर मुंबईस असावी-र्याविषर्यी मतभेद असून अद्यापि निर्णय झालेला नाहीं. तथापि ती कोठेही निघाली तरी, निरनिराळ्या युनिव्हर्सिट्या, एशिआटिक सोसायटीसारख्या ग्रथ- संग्राहक सख्या, पुराणवस्तु संग्रहालये, जुनीं नाणीं, ताम्रपट, शिलालेख, मूती, कागदपत्र ब वास्तुकोशल्य इत्यादिकांचा शोध लावून जुनीं स्मरण- चिन्हें कायम ठेवून त्यांपासून नवीन प्रमेये काढण्यास मदत करणारें म्हणजे आर्कआलर्जाचें सरकारी खातं या सवोनीं मिळून या भावी मध्य- वती संस्थेशी हातांत हात घाळून काम करण्यास हरकत नाहीं, असें सवे सभासदांचे मत पडलें, ही संस्था मुख्यतः एतदेशीय लोकांच्याच उप- योगाकरितां म्हणून काढावी, पण युरोपांतील लोकांस या संस्थेचा फायदा
सिमला--कॉन्फरन्सच्या सूचना अ.
घेण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपला खर्चे करून शिक्षण मिळवावे असें कित्येक सभासदांचं मत होते; ब तं सवास पसंत होऊन असें ठरलें कीं, सदर संस्थेत प्रोफसरच म्हणून कोणी युरोपेअन आणल्यास गोष्ट निराळी, एरबीं या संस्थेच्या नांवानें खर्च पडणाऱ्या हिंदुस्थानच्या तिजोरांतील पेशाने केवळ युरोपियन लोकांची म्हणून कांहीं स्वतंत्र सोय करू नये.
सदर सभेतील पोटकमिटीने ही सस्था कशा स्वरूपाची असावी याचा विचार करून रिपोटे केला आहे. त्यांत संस्थेच्या नियमांचा एक मसुदा दिला आहे. त्यावरून पाहतां संस्थेचे स्वरूप खालीं दिल्याप्रमाणे असार्वे अखे त्यांचे मत दिसते. संस्थेचा मुख्य उद्देश जुन्या हिंदी विद्येच्या अनेक झाखांविषयीं शोध करवावे व शोध करण्यास शिकवावे असा आहे. आर्यन म्हणजे संस्कृत, पाली, प्राकृत, इराणी, अरेबिक व इतर सेमीटक, द्रविडी, तिंबेटी, त्रम्हदशी वगेरे भाषा व त्यांतील तत्त्वज्ञान आणि वाढ्यय याचा पराभर्ष सदर संस्थेने घ्यावा.वैदिक कालव वेदिकोत्तर काल यांतील हिंदुस्थानचा इति- हास, मुसलमानी रियासतीचा इतिहास, इतर देशांतील मुसलमानी धर्माचा इतिहास, बोद्ध धर्माचा इतिहास हाही एक विषय ठेवावा, याशिवाय पुराणवस्तुसंशोधनाचे जे जे प्रचालित प्रकार आहेत त्यांचा अभ्यास आणि शरीररचना व भाषा यांजवरून मानववंशासंबंर्घी निघणारे अनुमानाचे शास्त्र हे विषर्याह शिकविळे जावे. सदर संस्थेत शिक्षण इग्रजी भाषेच्या दोरे द्यावयाचें ठरलें असून तितकयापुरती इग्रजी भाषा ज्यास येते अश्ांसच सदर संस्थेंत घेतलें जाईल. पण ज्यांना घेतलें जाईल त्यांना शिक्षणाबद्दल फी मुळींच पडणार नाहीं. सदर सस्थेंत आर्यन भाषा, बोद्ध धर्म व सेमेटिक भाषा वगैरे विषय शिकविण्याकरितां सुमारें सहा प्रोफेसर व आठ दहा ' रीडर? च्या जागा ठेवाव्या आणे सशोधनाचे कामीं उत्तेजन देण्या- करितां कांही ' फेलोशिप्स * व' स्कालराशेप्सू? निमीण कराव्या. विद्या.
१४ संस्कृत विद्येचे पुनरुज्जावन
थ्यास साधारणतः प्रपचाविषर्यी निष्काळजी राहून अभ्यास करितां येईल इतकी त्यांची रक्कम असावी, सदर संस्थेतील नियामित शिक्षणक्रमारिवाय इंग्लिशखर्रीज इतर भाषांतूनही वेळोवेळीं व्याख्याने व्हावी, संस्थेतील अंत. व्यवस्था, प्रोफेसरांचे कोन्सिलव त्यांनीं निवडलेला अध्यक्ष, यांनी चालवावा, अश्शी योजना सिमला-कान्फरन्सने सुचाविली आहे. हिंदुस्थानांत येणाऱ्या युरोपियन अधिकाऱ्यांना जुन्या व नव्या देशी भाषा याव्या या हेतून परीक्षा ठेवून विशष प्राविण्य संपादणाऱ्या लोकांस बक्षिसेंहरि हल्लीं दिलो जातात. या परीक्षांस काय काय अभ्यास असावे याचाही विचार कान्फ- रन्सनें केल्याचे दिसतं. याशिवाय हला असलेल्या ' पुराणवस्तुसंशोधक ? खात्याचे काम कसे चालतें व कसें चालावें, पदार्थसग्रहालयाचा उपयोग कसा वाढवावा व ते अधिक लोकाप्रिय कसें करावे, हिंदुस्थानांत जुनी इतिहासप्रसिद्ध स्थाने आहेत, तेथे जामेर्नांत कालांतरानं गाडून गेलेली स्मृतिचिन्ह वर येण्यास खोदकाम कोठेकोठें व कसकसें करावें, वगेरे गोष्टींची च्चाहि कान्फरन्सनें केलीं.
वरील सर्वे गोष्टीवरून हल्ली वारा कोणत्या दिशेनें बाहत आहे, हें सहजच लक्षांत येईल. नवीन होणाऱ्या संस्थेचे वर वर्णन केललें स्वरूपच अखेर कायम होईल किंवा नाहीं हें आज निश्चयाने सांगतां येत नाही. तसेंच या नवीन योजनेवर हिंदुस्थानसरकार सालिना किती रुपये खच करणार याचाहि अद्यापि अदाज लागत नाहीं. सिमला-कान्फरन्सच्या रिपोटावर 'हिंदुस्थानसरकारचा संपूर्ण ठराव अद्यापि प्रसिद्ध व्हावयाचा असल्याने, संस्कृत विद्येच्या पुन€ज्जीवनाच्या संकल्पाचें फळ प्रत्यक्ष हाती किती पडेल हं पाहावयाचे आहे. फ्रान्सच्या ताब्यांतील इंडो-चायना नामक एशिअंटिक प्रांतांत फ्रेंच सरकारनं * पोर्वात्य-विद्यासंशोधक-संस्था' १८९८ सालीं स्थापिली; त्या संस्थेच्या उदाहरणावरून सदर सस्थेची कल्पना सुचलेली दिसते. संस्थेचे नांव ' इकोल फन्सेस् डी एक्स्ट्रीम
जुने व नवे पंडित रप
ओरिएन्ट ? असें आहे. ही संस्था इंडो-न्वायनाव गव्हर्नर एम् डूमर याने प्रथम आपल्या जबाबदारीवर काढली; व १९०१ सालापासून फ्रच सरकारानें तिला आपला आश्रय देऊन ती सनाथ केली. फ्रेंच इंडो- चायना हा अडीचशे लक्ष मेलाचा व दीड कोटी लोकसंख्येचा लहानसा प्रांत असतां तेथें बारा वर्षांपूर्वीच असली संस्था निघाली; व तिच्या नमु- न्याबरहुकूम सस्था हिंदुस्थानांत काढण्याची वाद्ठे हिंदुस्थानसरकारास हलली झाली आहे. यावरून इंग्रजांचे लक्ष आर्य विद्येकडे वाजवीहून कमी आहे, किंबा फ्रेंच लोकांचे लक्ष या बाबतींत अपेक्षेह्नहि अधिक आहे, हें सांगतां. येणें काडेण आहे. पण आजामित्तीस हनोई येथील संस्थेचा कित्ता इंग्रज सरकार इकडे गिरवू पहात आहे, ही गोष्ट मात्र अत्येत अभिनंदनीय होय.
जुने व नवे पंडित
इंग्रजी भाषा व पाश्चात्य विद्या यांचें महत्व खरोखर कमी न होतां संस्कृत विद्यचं योग्य महत्व ओळखले जाण्याचा काळ हलली आपोआप कसा आला आहे हें मागील विवेचनावरून दिसून आलंच असेल. परंतुया विद्येचे अधिष्ठान जे जुने पंडित त्यांच्याविषयी नव्या विद्वानांच्या मनांतहि आदर' बुद्ध करिती बसत आहे, ६ खुद्द सिमला कान्फरन्सचा रिपोर्ट वाचल्या- शिवाय कोणासाहि कळणार नाहीं, त्या रिपोटांत सामील केलेलीं पाश्रात्य विद्वानांची ' मिनिटे ' बाचणारांस, जुन्या संस्कृत पडितांविषयां त्यांना सप्रेम आदर वाटतो आणि या पंडितगिरीची परंपरा नष्ट झाल्यास फार मोडी हानी होईल अशी त्यांना मोते वाटते, याविषयीं संशय राहात नाहीं. खुद्द भापल्या समाजांत पंडितांचे जुने ऐव्र्य अस्तगत झाल्यासारखे दिसत असतां, पाश्चात्य पंडितांच्या मनांत त्यांच्याविषयी आदरबुद्दे कशी रह्वाबी हें सकृद्दर्शनी आश्चयकारक वाटण्यासारखे आहे. परंतु
१६ संस्कृत विथेचें पुनरुज्जीवन
हें कोडे उलगडणें फारसे कठीण नाहीं. आधीं खुद्द आमच्या समाजाच्या मनांत जुन्या पंडितांविषयीं आदरवुद्धि सर्वर्स्यांच नाहीशी झाली आहे असं नाही. पंडितवर्गाचें जने ऐश्वर्य गेळें यामुळे आमची आदर बुद्धि सवेस्वी लोपली असा भास होतो, पण तो खरा नाह. आमच्या समाजांतील विद्वानांना नव्या पाश्चात्य पडितागेर्राचें वळण जरी लागलें आहे तरी, त्यांनाहि जुन्या पंडितांची किंमत चांगली कळते, हेंही सिमला कान्फरन्स- च्या रिपोटांवरून दिसून येतें. व पाश्चात्य पंडितांसंबेधाने तर विशेष गोष्ट अशी आहे कां, त्यांना संस्कृत विद्या ही सवच नवी, अर्थातू तिजमध्ये असलेलें ज्ञानभांडार व तें जतन करून ठेवणारा पॉडतवर्ग या दोन्ही गोष्टी त्यांच्या अमेक्षेबाहेरच्या असल्यामुळें त्यांना आश्चर्य वाटणे व आश्च* यानें आदर दिगुणित होणें हें साहजिक आहे. पण या आश्चयापेक्षांहि वेगळें असे दुसरें एक कारण आहे, तें हें कॉ, ज्या पद्धतीनें संस्कृत पंडित तयार होतात तिजमध्य विद्येच्या खऱ्या भक्तास पटण्यासारखे असेच विराष कांहीं गुण आहेत. ही पद्धत म्हणजे एकांगी शिक्षणाची पद्धत होय. सबब एकांगी शिक्षणपद्धति व अनेकांगी शिक्षणपद्धाते यांच्या सापेक्ष गुणांसंबंधानें प्रथम थोडेसें विवेचन केल्यास तें अस्थानीं होणार नाहीं असें वाटत,
निवळ एकांगी शिक्षणापेक्षा खरें अनेकांगी शिक्षण अधिक चांगले हे कोणीही कबूल करील. पण एकांगी शिक्षणाचेही कांडी फायदे असतात; ब गेल्या शतकांतील शिक्षणपद्ध तीच्या तुलनेने त्यांतील कांहीं कांही फायदे पाश्चात्यांच्या नजरेस आळे आहेत. एकाग्रता ही शरसघानाप्रमाणे विद्या- भ्यासासहि उपयोगी आहे, द्रोणाचार्य हे बालकोरब वीरांस धनुर्विद्या शिकवीत असतां, त्यांनीं प्रत्येक विद्यार्थ्याला धनुष्यास बाण जोडल्यावर व नेम धरल्यावर "' तुला काय काय दिसतें तें सांग ” म्हणून विचारठे; आणि एकट्या अर्जुनास मात्र बाणाचें टोक व वेध करण्याची वस्तु यां. शिवाय दुसरे तिसरें कांही दिसत नाहीं असं त्याजकडून उत्तर आल्यावर
जुने व नवे पंडित १७
“ हाच खरा धनुर्धर होईल ? असें त्यांनी मनाशी ठरावेलें. या गोष्टीचे तात्पर्य उघडच आहे. मानवी मनाच्या समीकरणांत, एका गोष्टीला जे लक्ष दिलें तं दुसऱ्या गोष्टीवरून कमी झालें हे व्हावयाचेच. मानवी शक्तीस मयादा आहे; व ' पूरणस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ? असला अम- र्याद वस्तूंचा गणितशास्त्रांतील सिद्धांत त्यास लागूं पडत नाहीं. जुन्या पद्ध- तीच्या शिक्षणांत ही एकाग्रता असे आणि यामुळे त्या पद्धतीने शिकणारा विद्यार्थी आपल्या विषयांत खरा निष्णात होत असे. जुन्या काळचा उत्तम वेय्याकरण 'किंवा नेय्यायिक घेतला तर, व्याकरण |किंवा न्याय या विष- यांत त्याला अगोचर असा कोणताहि ग्रेथ-उपग्रंथ किंवा वादाचा मुद्दा सहसा राहत न. आतां या एकांगी अध्ययनामुळें त्या विषयाबहेरचा कांहीं मुद्दा निघाल्यास, जुन्या पंडितास पाण्यांतून बाहेर काढलेल्या माशा- प्रमाणें चुकल्या चुकल्यासारखे होणं स्वाभाविक असे. पण तो जोपर्यंत पाण्यांत राही तोंपर्यंत त्याची शाक्ते इतकी अचाट असे की, त्याला विद्यासमुद्राच्या थेट तळापयत बुडी मारून तेथील गूढ मुक्ताफळे वर आणतां येत असत, जुन्या पद्धतीचा दुसरा एक बिदेष गुण म्हटला म्हणजे स्मातिसामथ्ये. हातांत पुस्तक घरून अध्यापन करणें हा पूवी एक प्रकार कमीपणा मानला जाई; व अध्ययन करण्याच्या वेळीं विद्या- थ्योस जरी ग्रंथाचा आश्रय करावा लागे, तरी अध्ययन संपून तो स्वतः अध्यापकाच्या पदवीस येण्याच्या सुमारास त्याचे सव अध्ययनग्रंथ प्रायः तोंडपाठ होऊन जात; आणे केवळ या अ्थानेंच एण तो पुस्त- कास सोडचिठ्ठी देत असे. रिष्यांकडून अध्ययन करवितांना गुरुजींच्या हातास चाळा हवाच असला तरी तो ग्रंथांची पानं चाळण्याचा नसे; तर पत्रावळी लावणे, तपकीर ओढणें, सुपारी कातरणें असला. डेक्कन कालेजांतील जुने प्रसद्ध पंडित अनंतद्यास्त्री पेंढारकर यांना विद्याथ्यीख पाठ सांगतांना, लहान मुलाच्या हातीं खळण्याकरितां देण्याच्या चाबकाच्या २
१ट संस्कृत विद्येर्चे पुनरुज्जीवन
दोऱ्या वळीत बसण्याचा चाळा असे असे सांगतात. असो. अका रीतीने जुने पंडित हे खरोखरच चालते बोलते ग्रथ असत. त्यांचे विषय- निष्णातत्व व पाठांतर हीं पाहून अलीकडच्या कालांतील मनुष्य थक्कच होऊन जावयाचा ! पण या एकांगी शिक्षणामुळे जुन्या पंडितांच्या बुद्धीस एककल्लीपणा येत असे. व्यवहारचातुय अंगीं नसल्यामुळें त्यांची क्ाचित् थट्टाहि होई. समाजांतील अष्टपेळू व्यवह्मारांत शहाणपणाच्या चलनी नाण्याची मोड पुष्कळशी लागते; तेथें चवल्या-पावल्याच काय पण पेसा पै व कवड्याहि लागावयाच्या. जसा पदार्थ भेटेल तशा योग्य- तेचें नाणें दुकानदाराच्या अगावर टाकायला लागतें. जुन्या एकदेशीय पडितांच्या पदरीं शहाणपण पुष्कळ असे खरं, पण ते सगळें मोहोरा. पुतळ्या किंवा बंदे रुपये यांच्या रूपानें; त्यांच्याजवळ परचुरण नाही; आणि दुकानदाराष्र तर त्यांची मोहार घेऊन खपायची नाहीं; व पचायची नाही. यामुळें पदरीं द्रव्य व व्यवहाराच्या बाजारांत पदाथ मांडलेले असतां भाजीहि घेतल्याशिवाय त्यांना हात हलवीत परत यावें लागणार ! बरं, भाजी मिळालीच तर अंगापासन केव्हांही दूर न होणाऱ्या जर्रकांठी शालजोडीच्या पदरांत बांधून शास्त्रीबुवा ती घरीं आणणार !
अनेकांगी अशी जी आधुनिक शिक्षणपद्धति तिचेही नफे-तोटे असेच आहेत, नव्या युगांत ग्रेथसंग्रह्म विपुल, कोणताहि विषय घेतला तरी त्याच्यावर प्रत्यंतराच्या तोफखान्याचा सडकून मारा कारेतां येईल, इतकी चोहोकडे ऐसपैस मोकळी जागा, व उंचवट्याची ठिकाणें. तसेच त्या त्या विषयाच्या अभिमान्यांनीं वेशीची कवाडे लावून घेतली तरी आंत प्रवेशा करण्यास शेकडो गुत्त मार्ग, यामुळें इींच्या काळांत कोणताहि विषय कोणालाहे सुलभ. गुरुमुखाच्या गंगोत्रीचा प्रवास जुन्या काळा- इतका हल्ली दुःखद नाही, किंबहुना कोणालाहि स्वावलंबनानें व गुरुमुखा-
जुने ब नवे पंडित १९
शिवाय एखादी विद्या सांगोपांग शिकर्णे कठीण नाहीं. उद्योग मात्र इवा; साधनांची कमतरता नसते. पूर्वकाळीं नेय्याथिक, वैय्याकरण, मीमांसक अथवा दवैतवादी, अद्वैतवादी अशी विशेष गुणदर्शांक-पण त्याच कारणा- मुळें अल्पमर्यादासचक-विशेषणें पंडितांस लागत; पण हल्लीं अशा विदो- षणांचें कारण उरलं नाहीं, कां काँ, साधारणतः उद्योगशील असा विद्यार्थी घेतला तर त्याला अमुक एक विषयांतलें थोडें बहुत तरी माहीत नाहीं असे सहसा व्हावयाचे नाही. गुलाबदाणीच्या कारंजांतून निघा- ल्याप्रमाणें, आधुनिक विद्वानांच्या मुखांतून प्रसंगोपात्त विचेच्या सहत्त घारा एकाच वेळेस सवत असुन, शिवाय प्रत्येक धारेस निरनिराळ्या शास्त्राचा निरानिराळाच सुगंध येत आहे, हा अजब चमत्कार पाहून जुन्या काळचा पंडित आज आरश्चयांनें थक्कच होऊन नावयाचा ! आणि विद्येचे हें असलं सुवर्णयुग अवतरलं असतांहि जुन्या विद्यापीठांचे काम अजून चाळू आहे ब आणखी नवीं विद्यापीठं काढण्याचा हव्यास सुरूच आहे याचें त्यांस गूढ वाटेल. दुष्यतराजा मार्रीच क्रषीच्या आश्रमांत आला तेव्हां चहूंकडे कल्पतरूच कल्पतरू उगवलेले असतांहि हे क्षि अजून तपश्चयी कां करीत बसले आहेत याचें त्याला क्षणभर आश्चर्य बाटले ! “ यत्कांक्षति तपोभमिरन्यमुनयः तास्मस्तपस्यंत्यमी ! ” त्याच. प्रमाणें सर्व विद्या सकृतदर्शनी हातीं आल्या असतांहि आधुनिक विद्वान् लोक शिक्षणपद्धाते सदोषच आहे म्हणून दुःखीकष्टी होत आहेत, याचें जुन्या विद्वानांस कोडेच पडेल, पण या अनेकांगी शिक्षणाचा मोहकपणा कांहीं अशीं केवळ दिखाऊ आहे हे त्या बिचाऱ्यांस काय माहीत १ आधुनिक विद्वानाच्या ज्ञानाची लांबीरुंदी फार विस्तृत; पण त्याची खोली फार थोडी असते. वादाचा विषय बदलला असतां जुन्या पंडिताप्रमाणे त्याला पाण्याबःहेर काढून टाकलेल्या मत्स्यासारखे चुकल्या -चुकल्यासारखें होऊन तो तडफडणार नाहीं, कारण तो जलचर व स्थलचर म्हणजे उभय-
२० संस्कृत विचेचे पुनरुल्जीवन
ववर आहे खरा. बकाप्रमाणें तो जमीन असेल तेथपर्यंत चालेल व पाणी भेटतांच पोहूं लागेल, पण त्याची गति खोल पाण्यांत मात्र होणार नाहीं. यामुळें विद्यासमुद्राच्या तळाशी बुडी मारून मोती. वर आणणें हें त्याला दुष्कर होय. फार तर त्यानें सरस्वतीदेवीच्या क्रीडासरोबरांतील कमळांबरोबर उथळ पाण्यांत खेळावे. कोणताहि विषय तळहातावरील आवळ्याप्रमाणं त्याला चोहांकडून दिसेल; पण आवळ्याच्या पोटांतल्या बीची कल्पना मात्र त्याला होणार नाहीं !
नव्या शिक्षणपद्धतींत पाठांतरास महत्व नसते. यामुळें विद्याथ्यांची स्मरणशक्ति कमकुवत राहते. डोक्यांत ज्ञान असतांहि डोळ्यापुढे पुस्तक असेल तेव्हांच त्याची जीभ क्रिंवा हात चालावयाचा. जुन्या पाडिताच्या स्मरणदाक्तीचा “ अक्षय भाता ? नेहर्मी भरलेला असे; यामुळें झोपंतून जागे केलें तरी तो वादास सिद्ध व्हावयाचा. नव्या पंडिताचा भाता वरच- वर दुसऱ्याने भरून द्यावा लागतो. पुस्तके हाती येईपर्यंत त्याला धर्म- युद्धाच्या नियमांचा आश्रय करून मुदत मागून घ्यावी लागते, व सुदै- वाने आधुनिक काळचे वाद लेखद्वारा होत असल्यामुळें ती मुदत त्यास मिळतेही ! जुन्या काळच्या युद्धाप्रमाणंच जुन्या काळचे वाद. म्हणजे प्रतिपक्षाची गांठ समक्ष पडून तरवार्रीने युद्ध व्हावयाचे; तरवार फिर. विण्यास लागेल इतकाच स्थलावकाश, व तरवार उगारून मारण्यास लागेल इतकाच कालावकारा. जुन्या सभेतील वाद तोंडाने व्हावयाचा; तेथे ग्रंथ उघडून दाखविण्याची ब पहाण्याची अपेक्षा नसे. प्रतिपक्षांस व न्यायाधिशांस प्रायः ग्रथ पाठच असावयाचे. कोट्या व प्रति-कोट्या, उत्तरं-प्रत्युत्तरे सर्व जिभेवर असावयार्ची; व केवळ बुद्धीच्या तरळपणावर व तत्परतेवर विजय मिळावयाचा, प्रतिपक्षी-क्षणभर कां होईना-निरुत्तर झाला म्हणजे वाद जिंकला गेला असे ठरे, शोकराचार्य व मंडनमिश्र यांचा बाद चाळीस दिवस चालला होता; पण वादाचा निकाल लागल
जुने प्र नवे पंडित २१
सतो मंडनमिश्राचे गळ्यांतील पुष्पहार कोमजल्यावरून सिद्ध झाला !
जुन्या पडित लोकांच्या वादाची गोष्टाहि एकदरीने अज्ञीच होती. एखाद्या कोटीवर त्यांचा निणय अवलंबून असावयाचा व निरुत्तर केलेल्या किंवा गोंधळलेल्या प्रतिपक्षाच्या म्लान झालेल्या मुखश्रीवरून तो सिद्ध व्हाव- वयाचा ! आधुनिक विद्वानाच्या वादाची गोष्ट बरीच निराळी आहे. ज्या प्रातिपक्षांनी एकमेकांची तोंडे कर्धीही पाहिर्ली नाहीत अशांचे वाद निर- निराळ्य़ा खंडांतूनहि चाळू असतात. यास्तव क्षणभर निरुत्तर झाल्यामुळें मुखश्री म्लान होऊन फड नजिंकला अगर हरला जाण्याचा संभव नाहीं. वादांतील युाक्तेवाद व फारच तर कांही अंशी भाषेची ओजस्विता यावरून- चच जग निकाल लावते. या आधुनिक वादांना कालाचाहि नित्रध नसतो. एका देशांत पूर्वपक्षकार व दुसऱ्या देशांत सिद्धांती हें जसें चालते, तसेंच यंदाच्या पावसाळ्यांत पूवपक्ष होऊन भिजत पडलेल्या वादास घुढल्या वर्षीच्या उन्हाळ्यांताहे पालवी फुटण्यास हरकत नाहीं ! वादार्ची साघनेंहि दरा'च निराळी. आधुनेक युद्धाच्या सरंजामाप्रमाणं आधुनिक वादाचा सरंजामहि निराळा, आधुनिक पंडितांना मोठमोठया ग्रंथसग्र- हाल्याच्या पहाडी ' बातेऱ्या ? बांधतां येतात व त्यांच्या सहाय्यानें त्यांचा मारा चालावयाचा, शत्रुपक्षाच्या किल्यांतील मर्मे सांगण्यास सूचिपत्ररूपी गुसत हेर शकडो तयार असतातच ! प्रमाणांतर रूपी सही, सल्लागार ब योद्धे यांची कुमक दोन्ही पक्षांस मुबळक; व अखेर जय व्हावयाचा तो दाक््याशक्यतेच्या सुक्ष्म विचारावर अवलंबून असल्यामुळें कालांतराने विवक्षित मतांची परंपरा जेव्हां सर्रास चाळू होईल तेव्हांच वादाचा अखर निर्णय झाल्याची खबर यावयाची. सांगण्याचे तात्पर्य इतकेच कीं, जुन्या व नव्या पंडितांचे उद्दिष्ट, साधनें व परिस्थिति ही बहुतेक वेगवेगळी आहेत. जुन्या पॅडितांच्पा शिक्षणाचे एकांगित्व व नव्या पंडितांच्या शिक्षणाचें अनेकांगित्व हें सर्वस्वी त्यांच्या निरनिराळ्या भारिस्थिर्ताचेच परिणाम होत.
.& संस्कृत विचेचें पुनरुज्जीवन
वर दिलेलें वर्णन हें एकांगी व अनेकांगी शिक्षणाच्या अतिरेकाचंच ब्णन अर्थात् होय. कारण जुन्या काळांहि एकांगी शिक्षणाचाच प्रकार मुख्यत्वे करून असतां अनेकांगी शिक्षण मिळविलेले पंडित मुळींच नसत असे मात्र नाहीं. बुद्धिवान् पुरुषाला कोणत्याच काळांत अध्ययनाचे विषय मुद्दाम मर्यादित करून घेण्याचें कारण असत नाहीं. बेकनसंबंधानें त्याचे अभिमानी असें म्हणतातच की, ' तत्कालीन ज्ञान-विज्ञानाचे सर्व विषयरूपी प्रांत त्याने खालसा करून आपल्या मनाच्या राज्यास जोडले होते. (38001 ॥8त [विरेश 8]] ]0प1९026 10" 8 ])0"०- ४1106. ) आपल्या इकडेहि अध्ययनाचा कोणताहि विषय म्हणून न सोडणाऱ्या अनेकांगी पंडितांची उदाहरणे नाहींत असे नाहीं. सायणा- चार्य, माघवाचार्य, क्षेमेंद्र वगेरे पीडितांची उदाहरणें असल्या प्रकारची होत. तसेच जे जे प्रसिद्ध टीका-ग्रंथकार म्हणून होऊन गेले त्यांच्या टीकांकडे पाहिलें तर प्रायः असे दिसून येते काँ, जेथे जेथे म्हणून दुसऱ्या शास्त्राचा मुद्दा आला तेथें तेथे त्यांनी त्या त्या शास्त्रांत निष्णात असणाऱ्या पंडितांप्रमाणें विवेचन केलेलें आहे. म्हृणजे एकांगी शिक्ष- णाच्या कालांतही अनेकांगी शिक्षणाची किंमत लोकांस कळत नव्हती असे नाहीं. त्याच्याच उलट हल्लींची स्थिति आहे, कारण हृ्ली अनेकांगी शिक्षण हा नियम व एकांगी शिक्षण हा अपबाद होऊन बसला आहे, ब यामुळें अनेकांगी शिक्षणापासून होणारे तोटे-म्हणजे विशेषवः ज्ञानाचा उथळपणा--नजरेस आल्यामुळें एकांगी शिक्षण हवे असे लोकांस वाटू लागले आहे.
सिमला-कॉन्फरन्सच्या रिपोटोत मोठमोठ्या जाड्या आधुनिक विद्वा- नांनीं जुन्या पंडितांची स्तुति करून तो बगे लोपत चालला असे दुःखो- द्वार काढले आहेत त्याचें कारण हेंच होय. कोणत्याहि एका पद्धतीची अतिद्ययोक्ती झाली म्हणजे तिजविरुद्ध प्रतिक्रिया होणें स्वाभाविक आहे.
जुने व नवे पंडित २३
त्याप्रमाणे, जुन्या पंडितांचा एक वेळी अनादर होऊन हरली मात्र त्यांजविषयीं आदर उत्पन्न झाला आहे. अतिदयोक्तीर्ची दोन्ही टोंक चकवून कोणत्याहि गोष्टीच्या बरोबर मध्यबिंदूचा वेध हाणें हे काठिण असते; शिवाय मध्यवेधाची स्थिति आली तरी ती फार वेळ टिकत नाहीं. मनूची गाति ही घड्याळांतील लबकांच्या आंदोलनासारखी असते. चालत्या घड्याळ्याचा लंबक प्रत्येक आंदोलनांत मध्याशेंदूस स्पर्श करून जातो; पण मध्याबेंदूवर तो कधीही स्थिर राहत नाहीं, 'चालत्या म्हणजे सजीव समाजांतील मतमतांतराचा मनूहि इष्ट मध्याबेंदूवर स्थिर असा राहूं रकत नाही; व तो आंदोलने घेत एकदां या टोकास तर एकदां त्या टोकास जात असतो. यामुळें ज्या काळांत जे आहे ते तर हवेंच असते; पण जे नाहीं त्याचे गुण आठआठवून त्याची इच्छा मनुष्य करू लागतो. इंग्रजींत ' 80पणाटण या श जा ९एश"फण9पा१2८ट ध्यात हएश*फ ॥॥॥2८ ०! 5010011127” अस जें वाक्य आहे त्यांतच ज्ञानविज्ञानाच्या दृष्ट मयादेचा मध्याब्रेंद्ू आहे. एखादा विषय सववस्वी माहीत असणें हें हवेंच. पण तेवढाच माहीत असणें हं जसं अपूणत्वांच लक्षण आहे, तसंच सवेच विषय थोडथोडे माहीत असणें हें इष्ट खरें तथापि एखा- दाही विषय सर्वस्वी अवगत नसणे हेंही अपूर्णत्वाचेंच लक्षण होय. अर्थात् एकांगित्व व अनेकांगेत्व यांचा जर मेळ पडेल, म्हणजे प्रत्येक विषयाचे थोडथोडें ज्ञान असून शिवाय एखाद्या विषयाचे तरी सांगोपांग उत्कृष्ट ज्ञान असावें ही स्थिति सवात उत्तम. त्याच्या अभार्वी जुन्या पंडितांनीं नव्यांना उथळ म्हणन हसावे; व नव्यांनीं जुन्यांना एक- कलली म्हणून हसावे, असेच होणार. पण कोणत्याही समाजांत एकांगी ब अनेकांगी शिक्षण पावलेले लोक एकसमयावच्छेदेंकरून असतील तर, व्यक्तीचे जें अपूणत्व व दूषण तेंच, सर्व समाज म्हणून एक पुरुष घरला तर त्या पुरुषाचे पूर्णत्व व भूषण होईल हें उघड आहे. व या दृष्टीने
२४ संस्कृत विचेचे पुनरुज्जीवन
अनेकांगी-शिक्षण-प्रधान अश्या हल्लींच्या काळांत जुन्या पंडितपरंपरेचें युरोपियन लोकांसहि कौतुक वाटावें आणि पंडितवर्गाला उत्तेनन मिळून त्याची परंपरा पुढेंही चालावी अशी इच्छा उत्पन्न होऊन तत्प्रीलर्थ उद्योग व्हावा हं योग्यच आहे.
जुन्या व नव्या पडतीचें साहचये
एकांगी व अनेकांगी शिक्षणाचे गुण परस्पर कांही अंशी विरोधी असल्यामुळें त्या दोन शिक्षणपद्धतींचा मिलाफ करितां येईल किंवा नाहीं हा एक विचाराचाच प्रश्न आहे. दोन्ही पद्धती आपापल्या पर्रीने उपयोगीच आहेत; व त्यांतील अमुक एक हटकून चांगळी ब असुक एक सर्वथा त्याज्य असं म्हणतां यावयाचे नाहीं, दोन्हीहि पाहिजे आहेत. पण त्या साध्य व्हाव्या कश्या ! मनुष्यमात्रांत जसे स्वभाव मित्न असतात-एकाचा स्वभाव दुसऱ्यास येत नाहीं, व एकाच व्यक्ती्त दोन परस्पर विराधी स्वरावधर्म कायमचे नांदूं शकत नाहींतच नाहींत-तसेंच या दोन शिक्षण- पद्धतींचे आहे. एकींत स्मरणशक्तीची मेहनत व करामत, तर दुसरीत "चौकसपणा अधिक; एकीत शब्दप्रामाण्यावर भिस्त जास्त तर दुसरींत आत्म- प्रत्ययाचा व विचारस्वातंत्र्याचा जोर जास्त; एकीत गहनावगाहनशीलता, तर दुसरीत बुद्धीचा व्यापकपणा व विस्तार विशेष, अशा निर्रानराळ्या गुणांच्या पद्धतींचा मिलाफ व्हावा कसा £ एकाच मनुष्याला जसे धूर्त ब प्रांजळ, धाडसी व सावध, प्रेमळ ब विवेकी, न्यायी व उदार असं एकाच काळीं होतां येत नाही, तसेंच एकांगी व अनकांगी शिक्षण- पद्धतीनें मिळविलेल्या विद्येचे गुण एकाच व्यक्तींत एकबटतां येणें शक्य नाहीं. एकाच लेखकास दोन निरनिराळ्या वळणाची अक्षरं काढतां येणें कठीण, किंवा एकाच ग्रंथकारास अनेक निरनिराळ्या भाषापद्धाते
जुन्या व नव्या पद्धर्तीचें साहचर्य २"
लिहितां येणें कठीण; त्याचप्रमाणें कांहीं अंशी जुन्या पढिक पंडितास नव्या पद्धतीचा शोधक व बहुश्रुत पंडित होणें, किंवा नव्या पद्धतीच्या शोधक व बहुश्रुत पंडिता जुन्या पद्धतीचा पढिक ब उपस्थितिवश पंडित होणे कठीण आहे. पण परस्परविरोधी असे मनुष्यस्वमावगुण एकाच व्यक्तींत जरी एकाच वेळीं सांपडणें शाक्य नसले तरी, ते निर- निराळे गुण अंगीं असलेल्या निरनिराळथा व्यक्ती एकाच काळी एकाच समाजांत सांपडणे मुळींच कठीण नाहीं, जगांत इतर बाबींत आजवर कितीही फरक झाले असले तरी समष्टिरूप मनुष्यस्वभाववेचित्र्य हें मात्र सनातन--जं हजारों वर्षांपूवीचे तेंच भआाज-- आहे असे म्हणण्यास हर- कत नाहीं. मनुष्यस्वभमावाची गोष्ट व शिक्षणपद्धतीची गोष्ट थोडीशी वेग- वेगळी आहे खरी. प्रकाते विंडाची बोवेत्र्यशीलता निसर्गनिर्मित असून मानवी प्रयत्नापेक्षां बलवत्तर आहे. पण शिक्षणपद्धति ही मनुष्य- निार्मत असून बहुधा अनुकरणात्मक सते. यामुळें एकाच काळीं एकाच समाजांत शिक्षणपद्धतीचे वळण एकच असते; निदान एकमेकांस फारसे सोडून नसतं असंच आढळेल, स्वभावांत अनुकरण शक्य नाहीं; शिक्षण- पद्धतींत तें अनिवाह्य आहवे. एवढेंच नव्हे तर स्वभावांत समान स्वरूप असणें हें जितकें कठीण, तितकेच शिक्षण पद्धतींत वेचित्र्य आणणें कठीण आहे, पण प्रयत्न केला असतां तें असाध्य आढे असं मात्र नाही. पाठशाळा, तोळ, मद्रेसा या शिक्षणसंस्था जुन्या शिक्षणपद्धतींच्या निद- शुक आहेत खऱ्या; पण त्या अद्यापि सर्वस्वी बुडाल्या नाहींत. अगर्दी नव्यांतल्या नव्या पद्धतीचे युनेव्हार्सटीचे शिक्षण इकडे दिले जात असतां, दुसरीकडे आमच्या पाठशाळांमधून पू्व॑पीठिकानुरूप पठण- घाढणाचा ध्वानि निघधतच आहे; तो कांही सवेस्वी थांबला आहे असे नाहीं. आंग्लसरस्वतीच्या सांप्रदायाच्या निदर्शक अश्या रंगी बेरंगी फिती व काळया विदेशी झुली आज देशांत दिस लागल्या आहेत खऱ्या; तथापि,
२६ संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन
आर्यसरस्वतीच्या निद्याणादाखल मानल्या जाणाऱ्या जरीकांठी शालजोड्या खांद्यावर घेणारे, फार काय पण डोकीस बांधणारे लोकहि सर्वस्वी दिसे- नासे झाले आहेत असे नाहीं
या गोष्टींचा अर्थ असा आहे कीं, परिस्थितीमुळे निरानेराळया व्यक्तीं- च्या अघिष्ठानाने निरनिराळया शिक्षणपद्धति एकाच समाजांत एकाच वेळी आढळणे अगदींच अशक्य आहे अर्से नाही, नदीच्या पात्रांत मुख्य प्रबाह एकाच दिशेनें वाहत असतां एखादा उपपवाह दुसऱ्या दिशेने वाहत आहे असा चमत्कार सकृतदर्शनी दिसणे कल्पनातीत नाहीं; पात्रांतील उच्च- नीच स्थळांमुळें तें सवंथा सभवनीयच आहे. याच रीतीनं, शिक्षणाचा मुख्य प्रवाह आधुनिक कल्पनांनी आंखलेल्या पालांतून वाहत असतां प्राचीन परपरेनुसार मद्रेसा-पाठशाळांच्या पात्रांतून फार्शी-संस्कृत वित्रे- चा लहानसा प्रवाह दुसऱ्या दिरीनें वाहत आहे; त्यांचीहि उपयुक्तता आहे असं आधुनेक पंडितांस वाटू लागलें आहे; आणि तो कायम वाहता रहावा, आटून जाऊं नये, अशा हेतूनें ते उयुक्त झालेले आहेत-ही गोष्ट सिमला कान्फरन्सच्या पुराव्याने शाबीत होत आहे. मात्र हा हेतु कायमचा सिद्ध होण्यास एकच गोष्ट करणें जरूर आहे ती ही की, कॉलेजांच्या शिक्षण- क्रमाप्रमाणेंच पाठशाळांचाहि शिक्षणक्रम स्वतंत्र चाळू राहला पाहिजे; व ' तसं झाले असतां पाठशाळांतून शिकून पंडितगिरीची परंपरा चालू ठेवण्यास लोकांस अडचण पडणार नाहीं. कालेजें व पाठशाळा एकाच स्थळमयांदेंत असल्या तरी एकामुळे दुसरें ओस पडळे आहे असे पूर्वी झालेले नाहीं ब यापुढेंही सहसा घडून येणार नाहीं असें आम्हांस वाटतें. पुष्कळसे विद्यार्थी कॉलेजांत जातील खरे; पण पाठशाळांचे भक्तही सांपडणार नाहींत असें नाही; थोडे तरी सांपडतीलच. कॉलेजांत कोण जाईल व पाठशाळेत कोण जाईल ही गोष्ट यहृच्छेने ठरणारी आहे. अमुकच अमकीकडे जाईल हे कोणी निश्चयाने सांगूं शकणार नाहीं. हे सर्व परिस्थितीचे खळ आहेत.
जुन्या व नब्या पद्धतीचे साहचर्य २७
या गोष्टीर्ची एक दोन उदाहरणेहि मनावर ठसण्यासारखीं देतां येतील, इंग्रजी शिकून पदवी मिळवून प्रोफेसरीचे काम करणाऱ्या ग्रहस्थाचें मोडी अक्षर कित्ता घालण्यासारखें वळणदार व थेट जुन्या डोलाचें सांपडणें सहसा कर्ठाण हें कोणीही कबूल करील कीं नाहीं १ असे असतां के. प्रो. काथवटे यांचं मोडी हस्ताक्षर अगदीं वर वर्णिलेल्या नमुन्याचे होते हें पुष्कळ लोकांस माहीत असेलच. या गोष्टीचें कारण प्रस्तुत लेखकाने खुद्द प्रो, काथबेटे यांस एकदां सहज विचारले असतां ते म्हणाले की £: बेडाच्या सालीं मीं इंग्रजी शिकत होतों; पण बडवाळे लोक विजयी होणार आणि फिरून पेशवाई स्थापिली जाणार असा त्या वेळीं आमचा दृढ भरंवसा होता; व यामुळें इंग्रजी वियेचा उपयोग होणे नाही असें समजून आम्हीं जुन्या शिक्षण पद्धतीप्रमाणे अक्षर व गणित हेंच फिरून हातीं घेतले. पण पुढें पाहतो तो. बंडवाल्यांचा मोड होऊन इंग्रजी राज्यसत्ताच पुनः स्थोपित झाली; तेव्हां फिरून नव्या पद्धतीप्रमाणे आम्ही इग्रजी शिकू लागलों ! अशा रीतीनं जुन्या व नव्या शिक्षणपद्धतीचे दोन्ही फायदे आमच्या पदरांत पडले,'? अथात् हा यहच्छेचा पारेणाम. दुसरे उदाहरण आपले रॅगलर प्रि. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचें. यांचे घराणें वौदेकांचें असून खुद्द त्यांचे वडील कोंकणपट्टींतील उत्कृष्ट दशग्रंथी ब्राझ्- णांत मोडत अस्त; आणि या चिरंजीवांची अल्प बयांत दिसून येणारी बुद्धिमत्ता पाहून त्यांनीही दशग्रथी ब्राह्षण व्हावे अशी त्यांच्या वाडिलांची इच्छा होती असें म्हणतात, पण दैवाचा संकल्प कांहीं वेगळाच होता. कोंकणांत राहून वेदाभ्यासाकडेच ते लागते-त्यांच्या पायांना देशाची वाट न सांपडती किंवा त्यांना हातीं धरण्यास घाडोपत कव्योसारखा आधुनिक विद्वान् न मिळता-तर ' रघुनाथा ? स पंत ही पदवी न लाभतां भट्ट ही पदवी लाभली असती; इंग्लंडांत कम नदी कांठच्या काळेजच्या बोर्ड- गांत ' साईन थीटा, कास थीटा ? या शब्दांचा पाढ तोंडांतून निषण्या-
र्ट संस्कृत विथेचं पुनरुज्जीवन
ऐवर्जी, मुडी गांवांमधील एका लहानशा घराच्या परसांतील आवारांत नारळा -पोफळींना रहाटगाडग्याचे पाणी लावीत लावीत वेदांतील क्रचांच्या जटा-पाठांची व घन-पाठांचीं त्यांची आवतंनें चालती; लुसल्शीत सुगंधी पिअस सोपाऐवजीं, नियय समिध शेकलेल्या अश्निकुंडांतील भरड भस्मच ते अंगास चर्चित बसते; केंब्रिजच्या पदवीघराच्या काळ्यानिळ्या रिपतरी टोपीऐवजीं हिरवी फीत लावलेली तांबड्या बनातीची टोपीच त्यांच्या डोक्यावर राहती; लॉर्ड कर्झन यांनीं प्रोढीनें वणिलेल्या “ ब्ल्यू रिबन ? ऐवजीं, दगडी चातीने कातलेल्या ब बोजड ब्रह्मगांठ मारलेल्या गळ्यां- तील यज्ञोपवीताचाच अभिमान ते बाळगते; किंबहुना फक्त कोकणांतच विपुल असलेल्या भुताखेतांचें दर्शन झालें असतां, फक्त कोकणांतच लागू पडणाऱ्या समजुतीप्रमाणे जानव्याची त्रह्मगांठ दाखवून त्या महृद्धयाचे त्यांनी निवारण केळ असते. घनपाठी दराग्रंथी वैदिक “* रघुनाथभट्ट ? परांज व घर्मक्िक्षणाविरुद्ध कसून लिहिणारे ' रॅगलर ? परांजपे यांच्यां- तील भद खरोखर जमीनभस्मानचाच नव्हे काय £ आणि हा फरकडि दोन विषम शिक्षणपद्धती समानसुलळभ असतां, एखाद्या व्यक्तीला लीलेने अमुक एका पद्धतीस मुकवून दुसऱ्या एका पद्धतीच्या कक्षेंत नेऊन सोड- णाऱ्या यहृच्छेचेंच फळ नव्हे काय १
बाह्य पारोस्थतीप्रमाणंच मानासिक स्थितीमुळेंही निरनिराळ्या व्याक्ति निरनिराळ्या शिक्षणपद्धतीचे अवलंबन करणार हें उघड आहे. वेद्निंदक चार्वाक हा कांहीं विसाव्या शतकांतील एखाद्या अस्सल मिशनरी काले- जांत शिकलेला नव्हता, उलटपक्षीं, अस्सल मिरानरी कालेजांत शिकून तयार झालेल्या बी. ए., एम. ए. मध्यें, वेद ही अक्षरशः प्रत्यक्ष इंशवरा- चीच वाणी आहे असं म्हणणारे व मानणारे श्रद्धाळू लोक आज सांपड- णार नाहींत असं नाहीं. चार्बाकाच्या वेळीं एखादें मिशनरी काज असतें तर त्याला जसा निदान एक तरी योग्य विद्यार्थी मिळता, तसेंच आज
जुन्या व नव्या पद्धतीचे साहचर्य २९
हिंदुस्थानांत, जुन्या पद्धतीच्या पाठशाळा शिळूक राहतील तर, त्यांनाहि योग्य असे विद्याथी मिळतील. तात्पर्य, जी चूक आहे ती इतकीच का स्वभावभद, परिस्थितिमूळक विपरीतत्व, ब यहच्छावेलास कायम असतां निरनिराळ्या पद्धतांचे शिक्षण देणाऱ्या सस्था मात्र असाव्या तितक्या भाज या देशांत नाहींत. एकांगी शिक्षण व अनेकांगी शिक्षण हीं एकाच व्यक्ती- मध्ये समवनीय नसली तरी, एका समाजांत एकत्र सहज संभवतात; त्यांच्या योगाने प्रत्येक व्याक्तापिंडाला यथायोग्य शिक्षण मिळतें; व सर्व समाजाला श्रमाविभागाचा फायदा मिळतो. इंग्लंडांत एकराष्ट्रीयत्व सर्वस्वी सिद्ध झाले असल्यामुळें तेथे सर्व शिक्षण एकाच नमुन्याचे असणे ठीक असेल; पण इंदुस्थानांतील स्थिति तशी नाहो. येथें जुन्या ब नव्या परपरेचा विरोध चांगला जाग्रत आहे व कदाचितू पुढेंदी कर्धा तो सवस्वी मिटणार नाहीं. याकरितां हिंदुस्थानांत शिक्षणाचे नमुने उपराष्ट्रानुरूप वेगवेगळे असणे अगदीं जरूर आहे. ही गोष्ट कितीही जोरानें आम्ही पुनः पुनः: सांगितली तरी ती थोडीच होणार आहे. वरील विवेचनावरून, या देशांत आजच्या स्थितीतही पाठशाळा चालविण्याची गरज आहे हें दिसून येईल, व जी गोष्ट इकडील पाठशाळांची तीच बगाल्याकडील “* तोळां 'ची. मुसलमानी विद्येचीहि अशीच गोष्ट आहे. सुदेवानें या जुन्या विचेच्या भांड्याला नव्या विद्येची कल्हई देण इष्ट व हाक्य आहे असें म्हणणारा नवीन वर्ग आज निर्माण होत आहे; ब या वर्गाच्या विचारसरणीत सस्कृत विच्या पुनरुजीवनास पोषक असें बरेंच द्रव्य सांपडते. हें उभय- विध शिक्षण देऊन संस्कृत विदेच्या पुनरुज्जीवनास मदत कशी करावी या गोष्टीचा सिमला-कोन्फरन्समध्यें विचार झाला, पण “ ओरिएंटल इन्स्टिटयूट ' या नांबाची नवीन संस्था काढण्यापलीकंडे या गोष्टीच्या विचाराची तपशीलवार मांडणी कोठें झालेली त्या रिपोर्टात दिसून येत नाहीं. आणि मुख्य हेतु इष्ट असतां साधनें सुचविण्याच्या बाबतींत बरेच
३० संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
सभासद गोंधळून गेले, असें त्यांनीं पाठविलेल्या लेखी मिमेटांवरून दिसून येतं.
जुन्या परंपरेचे जे शिक्षण आज देशांत चाळू आहे तें पाठशाळा, तोळ, मद्रेसा वगैरे जुन्या पद्धतीच्या शाळांतन चालू आहे. संस्कृत, पर्शियन, आरबी वगेरे भाषांत संग्रहित असलेल्या विद्येचे जुन्या पद्धतींचे असें शिक्षण या'च संस्थांतून मिळण्याचे असल्यामुळे, अश्या शाळा ब त्यांत शिकणारे विद्यार्थी यांच अल्प प्रमाण पाहून कोणासाहि बरें वाटणार नाही, व हें प्रमाण किती अल्प आहे हें खाली लिहिलेल्या आकड्यांचे माहितीवरून कोणाचेही लक्षांत येइल, वरिष्ठ शिक्षणाच्या दृष्टीने पाहतां सव हिंदुस्था- नांत मिळून १४ शाळांमधून सुमारे १३०० विद्यार्थी संस्कृत, फारशी व आरबी विद्या जुन्या पद्धतीनें आज शिकत आहेत. सन १९०० सालीं या संस्थांची सख्या अवधी पांच असून त्यांत सुमारं ५५० विद्यार्थी शिकत होते. गेल्या दहा बारा वषात सस्था व विद्यार्थी यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तथापि, सर्वे हिंदुस्थानांत मिळून युनिव्ह सिटीशी संबंध असलेल्या वरिष्ठ इंग्रजी शिक्षणाच्या संस्थांची सख्या १८५ वत्यांत शिकणाऱ्या विद्याथ्यांची संख्या सुमारें ३० हजार असतां, जुन्या पोर्वात्य पद्धतीनें उच्च शिक्षण देणाऱ्या सस्थांची सख्या अवघी १४1१५ असावी यावरून जुनी विद्या किती मागसलेली आहे ह दिसून येईल, इंग्रजी विद्या देणारी नुस्ती “ आर्ट्स कालेज ' च हिंदुस्थानांत १२५ आहेत. असें असतां पोवोत्य इतकीं थोडीं कां असावी ? कायदा, वैद्यक, शिल्प, बास्तु- विज्ञान, कृषिकर्म वगैरे बाबतींत तर जुन्या विद्येचा सर्वस्वी लोपच झाला आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं, कारण वरिष्ठ प्रतीच्या शिक्षणसंस्थांतून पौर्वात्य तत्वज्ञान व काव्य यांच्या पळीकडे सहसा कांही शिकाविळें जात नाहीं. जुनी विद्या शिकविणाऱ्या प्राथमिक पाठशाळा वगैरे आहेत; परंतु त्यांची वाढ होण्याऐवजी ऱ्हासच झालेला आढळतो. उदाहरणार्थ, आरबी
थोडी प्राचीन माहिती ३१
व फारशी शिक्षण देणाऱ्या पाठशाळा सन १९०० ते १९१० या दहा सालांत २४३८ वरून १५०५ वर आल्या. व त्यांतील विद्यार्थ्याची संख्या ३७] हजारांवरून ३० हजारांवर आली ! तसंच संस्कृत पाठ- शाळा वगेरेंची संख्या १९२९ वरून १४२९ वर आली; म्हणजे दहा वर्षात पांचही पाठशाळा कमी झाल्या. विद्याथ्याची संख्याहि २३ हजारां- वरून २२ हजारांवर आली. पाठशाळांच्या संख्येच्या मानानें विद्याथ्यांची सख्या कमी झालेली दिसत नार्ही याचें कारण असं असावे काँ, जुन्या. पद्धतीनं विद्या संपादन करण्याची लोकांची इच्छा विद्दोष कमी होत नसतां, ती विद्या देणारे शिक्षक व त्या शिक्षकांचा स्वतत्र रीतीनें चरि- तार्थ चालण्याचे साघन हां दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. सिमला-कान्फरन्सनें “ओरिएंटल इन्स्टिटयूट ! सारखी संस्था काढण्याचें ठर- विले आहे हे तर ठीकच आहे; परंतु जुन्या पंडितगिरींची परंपरा कायम राहावी व वाढावी अशी सरकारची इच्छा असेल तर संस्कृत पाठशाळा अधिक स्थापने व्हाव्या अशी खटपट करून त्या सस्थांना योग्य तं द्रव्य सहाय्य करण्यासही सरकारानें कबर बांधली पाहिजे.
थोडी प्राचीन माहिती
जुन्या व नव्या पद्धतीच्या शिक्षणाचे साहचर्य हीही कां असावे, याचे विवेचन या विषयावरील मागच्या प्रकरणांत करण्यांत आलेच आहे. हें साहचर्य असण्याचे मुख्य कारण म्हटलें म्हणजे पूवीच्या पद्धती प्रमाणें शिक्षण मिळविलेल्या लोकांत जशी जाडी विद्वान् मंडळी निमीण झाली तशी कदाचितू यापुढेही होळ अशी आशा वाटते हेंच होय. जुन्या पद्ध- तीच्या शिक्षणास नव्या पद्धर्ताचें कांहीं कांहीं संस्कार दिल्याने * अधि- कस्य आर्थकं फलं ? या न्यायानें विशषष फायदाच होणार आहे. ते संस्कार
३२ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
कशा रीतीनें द्यावे हा एक स्वतत्र प्रश्नच आहे. परंतु जुन्या पद्धतीनें बन- ठेल्या-म्हणजे विसाव्या शतकांत मिळणाऱ्या नवीन संस्काराने वियुक्त असें शिक्षण पावलेल्याहि-पंडितगिराचे तेज पूर्वीच्या काळांत कसें होते, आणि एकदर्रने जुन्या पंडितागरींची परंपरा व तिचे सांप्रदाय हिंदुस्थानांत कसकसे होते याचें अगदीं होइल तितके संक्षिप्त विवेचन करून, नंतर गेल्या पन्नास वर्षात संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनास देशी व विदेशीही लोकांचे कोणकोणते प्रयत्न कसकसे फलद्रूप झाळे आहेत याचें आम्ही थोडक्यांत निरीक्षण करणार आहो.
संस्कृत ठाड्मयाचा सांगोपांग अगर त्रोटकही इतिहास आपणाकडे कोणी लिहून ठेविलेला नाहीं. त्याचप्रमाणें जुनी विश्वविद्यालये, पाठशाळा, पंडितसंघ, त्यांचे बादावेवाद, त्यांच्या सभा, त्यांच ग्रेथ व त्यांची शुरु- शिष्यपरपरा यांचीही माहिती कोणी फारशी लिहून ठेविलेली आढळत नाही. कित्येक ग्रेथकारांनी आपलं नांव, गांव, गोत्र, आश्रय देणारा राजा असल्यास त्याचें नांव व यशोवर्णन, आणि आपल्या गुरुघराण्याची परंपरा दिलेली असते. परंतु आश्रयदात्या राजाच्या वणनांत देखीळ काल्पनिक गोष्टींचा थोडाबहुत समावेश केलेला आढळतो. निदान गुरुपरंपरा देण्या- मध्ये तर भाविकपणाचा कित्येक वेळीं इतका कळस झालेला दृष्टीस पडतो की, प्रत्यक्ष त्रह्मदेवापासन तों स्वत: ग्रंथकाराच्या पूज्यगुरुपादांपर्येतच्या अनेतप्राय कालोदधीचे आक्रमण फक्त दहापांच कमानीच्या पुलावरून कारितां येतें ! अथांतू परंपरेच्या असल्या उलछेखांत इतिहासदृष्ट्या विश्व - सनीय अश्शी माहिती फारशी मिळूं शकत नाही. ऐतिहासिक दृष्टी ही जरी सर्वस्वी आधुनिक नसली तरी, कालगणनेची दृष्टी व वस्तुपे पूर्वांपरत्व ठराविण्याची दृष्टी ही तरी निःसराय आधुनिक आहे. शिवाय कोणी खतः एखाद्या विरीष्ट शास्राचे अध्ययन केलें असतां इतर शाक्नांचे विहगम- दृष्टीनें समालोचन करण्याची, व त्यांत ग्राह्म ब त्याज्य काय याची चौकशी
थोडी प्राचीन माहिती ३३
करण्याची, जी बुद्धि आधुनिक विद्वानांस असते, ती पूर्वकालीन पेडि- तांना फारशी असावी असे दिसत नाहीं. याचें एक कारण आम्हांस असें वाटतें कॉ, विदयेला आजकाल प्रायः ऐहिक महत्वबच असतें; परंतु जिचें पर्यवसान परमार्थात होत नाहीं अशी कोणचीही विद्या आहे असें पूर्वकालीं मानलेंच जात नसे. विद्या व मोक्षमाभ हे शब्द पूर्वकाली बहुधा समानाथकच होते. हिंदुधर्म जरी तात्विक दृष्टया मतभेदसहिष्णु असला, व ' साधनानामनेकता हें जरी हिंदुधमांचे एक असाधारण लक्षण- ही मानण्यास योग्य असले, तरी प्रत्यक्ष व्यवद्दारांत स्वतः अंगिका- रिलेल्या मोक्षमागाविषयींची अमिमानर्बाडध तीत्र नसणें ह कठीणच होतें. यामुळें अनेक शास्त्रांचे सारख्याच आवडीने अध्ययन करणारा मनुष्य पूवी विरळा, व सर्वे शास्त्रांना-अर्थात् सर्व प्रकारच्या वाडू्मयांना सहिष्णुतेने व आदरबुद्धीनें वागवून त्यांच्याविषयींची माहिती एकत्र करून ठेवून त्यांना पिरस्थाई करण्यास मदत करणारा मनुष्य त्याहूनही विरळा, यामुळें ज्याला संस्कृत वाड्मयाचा इतिहास ? असे कोणत्याही अर्थानें म्हणतां येईल असा ग्रंथ संस्छतांत आजपर्यंत झालेला आढळत नाही. नाहीं म्हणावयाला यासंबरंधांत एकच लहानसा ग्रंथ सुचण्यासारवा आहे, व तो मधुसृदन-सरस्वतीचा ' प्रस्थानभेद ' नांवाचा ग्रेथ होय. यांत वेद-बवेदांगें व षटूशास्त्रं यांचें वगॉकरण व व्याख्या फार चांगल्या पद्ध- तीने दिलेल्या आहेत. पण या ग्रंथांतील विषय हा आधुनिक पद्धतीने लिहि- लेल्या अशा विस्तुत संस्कृत बाड्मयाच्या इतिहासरूप ग्रेथांतील केवळ एक ल्हानर्स उपांग म्हणून शोभळ. असो; वरील कारणांमुळे जुन्या पंडित- परंपरेसंब्रधाने असावी तशी माहिती अद्यापि कोठें संग्रहित झालेली नाहीं. तथापि, केवळ उदाहरणादाखल थोडीशी माहिती आम्हांस उप- लब्घ असलेली देऊन नंतर प्रस्तुत विषयाच्या इतर अंगांकडे आम्हीं
वळणार आहो. .!
३४ संस्कृत विद्येचे पुनरुज्जावन
कोणी प्रयत्नच केल्यास या बाबतींत र्याळा हजार पांचशे वषोच्या अलीकडची तरी माहिती त्रोटक रीतीनें मिळण्याचा संभव आहे. प्रथम आपण पंजाब म्हणजे आर्य लोकांचा हिंदुस्थानांतील प्रवेशामा्गे घेऊं. आपणाला माहीत असलेलें संस्कृत पंडितगिर्राचे आदिपीठच नसले तरी, एक मोठ संस्कृत विद्यालय तक्षशिला येथे हाते हदी गोष्ट प्रसिद्ध आहे. तक्षशिला ही नगरी हलींच्या रावळाथडी शाहराच्या आसपास होती. विद्यापठाच्या बाऊतीत तक्षशिळेची कोर्ति कालीच्या बरोबरीची आहे. तर्क्षशिला ही प्राचीन भारतीय सम्राट अशोक याच्या एका : गव्हनरा ? ची राश्धानी होती. ब्राह्मण पंडितगिर्राचें ते॑ एक आगर होते. वेद-बदांगांपुद्धां अठरा शास्त्र॑ व सर्व तऱ्हेच्या कला यांचें शिक्षण देणारे विद्वान् लोक या विद्यापीठांत * प्रोफेसर ? असत. प्राचीन संस्कृत व्याकरणकार पाणिनी, चंद्रगुप्ताच्या हातून नेदांचा संहार करवून मगघ देशाचें राज्य स्थापणारा मुत्सद्दी भिक्षुक आर्यंचाणक्य, हे. तक्षशिला येथील विद्यार्पीठांतील विद्यार्थी होते. आयुर्वेदाचा एक आचार्य आत्रेय हा या विद्यापीठांत एका वेळीं वैद्यकाचा प्रोफेसर होता. खुद्द गोतम- बुद्धाचा शिष्य व खेही नीवक-जो मरघ देशाच्या बिंबिसार नामक राजाच्या पदरीं वैद्यराज म्हणुन होता-तोही येथंच वेद्यकी शिकला होता. प्रारंभी तक्षाशेला येथील विद्यापीठ ब्राह्मणधर्मीय होते. पुढें बोद्ध घमाची स्थापना झाली, तथापि, तक्षशिला येथोळ विद्यापीठांतील पंडितपरपरा तशीच चालू राहिली; व पुढें कुमारलब्धासारखे प्रचंड बोद्ध पडित याच विद्यापीठामध्ये निमाण झाळे. चिनी प्रवासी हुअनत्सँः| यानें कुमारलब्या- विषयीं असें लिहून ठेविलें आहे कीं, पूर्वेस अश्वघोष, दक्षिणेस देव, पश्चिमेस नागार्जुन व उत्तरेस कुमारलब्ध असे चार जाडे विद्वान् हिंदु- स्थानांत समकालीन होते. परंतु त्यांमध्यें कुमारलन्च हाच सवांत श्रेष्ट मानिला जाई. तो दरदिवशी कमीत कमी ३२ हजार अक्षरें लिहीत
थोडी प्राचीन माहिती ३२५
असे ! यानं अनेक शास्त्रांवर ग्रंथ लिहिले होते, ब हिंदुस्थानांतील चारही दिशांचे लोक त्याच्या दशनास येत, अशी त्या वेळची देतकथा म्हणून सदर चिनी प्रवाशाने लिहून ठेविली आहे. तक्षशिलेचा ऱ्हास झाल्यानंतर पंडितगिरीचा प्रबाह पूवकडे वाहूं लागला, तक्षशिला येथील विद्यापीठांत गुरु ब शिष्य यांची परंपरा ग्रहस्थाश्रमी होती. बोद्धघमांचा प्रसार झाल्यावर संन्यासी व भिक्षू यांच्याकडे पंडितागेरीचे व विद्या- पीठाचं चालकत्व गेलें. हे मिक्षू लोक होतां होईतों वस्तीचे गांव सोडून बागा, मठ व विहार यांतून रहात, आणि अध्ययनाध्यापनाचे काम चालवीत. ग्रीक देशामध्ये खिस्तापूवी तिसऱ्या शतकांत अँकेडेमॉस नामक एका विद्येच्या पुरस्कत्यानें विद्यापीठाकारितां म्हणून एक मोठी बाग करून दिछी होती तिजमध्ये प्रासद्ध ग्रीक तत्ववेत्ता ऐटो हा आपल्या अनेक शिष्यांस पढवीत असे ही ऐतिहासिक गोष्ट प्रसिद्ध आहे; व या गोष्टीवरूनच म्हणजे अकेडमांस याच्या नांगवरून, विद्या- पीठाचा दर्शक असा जो ' अकेडमी ? हा शब्द तो निघाला आहे. त्याचप्रमाणें कांही अंशी बोद्धकालांतील विद्यापीठेंही रानावनांतून पसर- लेलीं असत.
बेंगाल इलाख्यासबंधाने पहातां तिकडील परंपरेची माहिती साघा- रणतः सहाव्या शतकापासून मिळते. या काळाच्या सुमारास बंगाली लोक मोठे धाडशी, हिम्मती ब उद्योगी असून, एका अंगानें हिमाल- याच्या बफांच्छादित प्रदेशांत व दुसर्या अंगानें पूवसमुद्राकडील प्रदेशांत त्यांनी वसाहती केल्याचा घुरावा मिळतो. दीपकर श्रीज्ञान नांवाचा बंगाली ब्राम्हण हिमालय चढून तिबेटांत गेला होता व तेथें त्यानें बौद्ध धर्मांचा प्रसार केला. दुसरा एक बंगाली ब्राह्मण रामचंद्र कविभारती हा सिंव्हल्द्वीपांत गेला असून पराक्रमबाहु नांवाच्या राजाच्या कारकीर्दीत सिंव्हलद्वोंपांतील सर्व बौद्ध मठ व विहार त्याच्या व्यवस्थेखालीं होते.
३१६ संस्कृत विथेचें पुनरुज्जीवन
नलंद येथील बिद्यापीठाचा सुप्रसिद्ध अध्यक्ष शीलभद्र हाही पूर्वबंगाल- चा ब्राह्मण पंडित होता. समतट नांबाच्या राजधानींत राज्य करणाऱ्या त्राह्मम राजांच्या बश्यांत शीलभद्र हा जन्मलेला असून पूर्वीच्या * दंतदेव या नांवानेंही तो प्रासिद्ध आहे. शीलभद्रानें आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षांच्या भांत त्या वेळीं माहीत असलेल्या सर्व शास्त्रांचे अध्ययन पूर्ण केलें होते. नलंद सेर्थाल विद्यापीठाचा त्या वेळचा मुख्याध्यापक धर्मपाल याचा तो पट्टशिष्य असून इ. स, ५५४ सालीं यानें एका जाड्या विद्वान दक्षिणी पाडितावर वादांत जय मिळविल्यामुळें त्याच्या गुरूच्या निर्वा- णोत्तर त्याला विद्यालयाचा मुख्याध्यापक नेमण्यांत आलें, शीलभद्र ही कोणी काल्पनिक व्यक्ति नसून चिनी प्रवासी ह्यूएनत्सँग याने शीलभद्राची समक्ष गांठ घेतल्याचा वृत्तांत प्रसिद्ध आहे. याच्या वेळीं नलंद विद्या- पीठांत दहा हजार विद्यार्थी व १५१८ शिक्षक होते अशी आख्यायिका आहे ! या विद्यापीठाची परंपरा एवढी मोठी होती का, सुमारे शांभर वर्षांच्या अवधींत ती दुसर्या कोणालाही हार गेली नाहीं; व माध्यमिक नांवाचा बोद्ध मार्गांचा प्रवतक नागाजुन, मेनोस्ट्रेस नांवाच्या ग्रीक राजाला विज्ञान शिकविळेला नागसेन, सांख्यशास्त्रावर ६्छा करून बोड तत्वज्ञानाचे ध्वजारोपण करणारा युणवति बोधिसत्व, चिनांत जाऊन बौद्ध धर्मचक्राची संस्थापना करणारा प्रभामित्र, तिबेटी राजाच्या निमं- तणावरून तिकडे धर्मोपदेश करणारा जिनमित्र, तसेंच चंद्रपाल, स्थिर- मति, ज्ञानचंद्र व शीघ्रबुद्ध वगैरे प्राचीन बंगाली पंडितांचा संबंध याच विद्यार्पीठार्शी होता.
नळेंद येथील विद्यापीठानंतर पुढीळ पांचशे व्षोत उदंतपुरी व विक्रम- शिला येथील विद्यालये प्रश्रिद्ध होती. ही दोन्ही स्थाने हल्लींच्या बहार प्रांतांत आहेत, उदंतपुरी येथील विद्यालयांत १ हजार भिक्षू हीनयान नामक बोद्धमागांचे अनुयायी, व ५ हजार मिक्षू महायान मार्गाचे अनु-
थोडी प्राचीन माहिती ३५७
यायी होते; व हे दोन्ही मिळून सहा हजार शिक्षकच होते असें म्हटले तरी चालेल. उदंतपुरी येथें एक ब्राह्कणी व बोद्ध ग्रंथांचा फार मोठा संग्रह होता. विक्रमशिला हें विद्यापीठ बहार म्हणजे मागध देशाच्या पाल राजांर्नी स्थापिले ब अनेक देणग्या देऊन चालविले, या विद्यापीठांत सहा कालेज व १०८ पंडित प्रोफेसर होते असं म्हणतात. इ. स. ७५० सालीं हल्लींच्या भागलपूर जिल्ह्यांत गंगा किनाऱ्यावर धर्मपाल नांवाच्या राजाने मठ व देवस्थाने बांधिली, व त्यांना मोठमोठी वर्षासने चालवून दिली. त्यांतून या विद्यापीठांचा बराच मोठा खर्च चालत असे. मार्गे सांगितलेला दीपकर, तसंच प्रसिद्ध आचार्य श्रीबुद्धज्ञानपद हे विक्रमाशिलेच्या विद्यापीठाचे प्रिन्सिपाल होते. या विद्यापीठांत व्याकरण, दर्शन, भमिधर्म, वेद्यक वगेरे शास्त्रें विदोषेकरून शिकवीत. सदर विद्या- पीठांतून तयार झालेल्या विद्वान् पंडितांना ' द्वारपंडित ! अश्शी पदवी राजांकडून मिळत असे, विक्रमशिला येथील द्वारपंडितांच्या यार्दीत कारमीर, थिंहलद्वीप, गोड, बनारस वगेरे निरनिराळ्या प्रांतांतील लोकांचीं नांवे आढळतात. तिबेटांतीहळ लामा लोक संस्कृत ग्रंथांची तिबेटी भाषत भाषांतर करण्याकरितां पंडितांची मदत घेण्यास विक्रम शिला येथ येत असत. विक्रमशिला येथील विद्यापीठाचा नाश सन १२०३ सार्ल। मुसलमान सरदार बखत्यार खिलजी याने केला. बिक्रमशिला येर्थाल विद्यापीठ बौद्धमताचे होतें; परंतु ब्राह्मणमताचे असें दुसरें एक विद्यापीठ पूवकाळीं मिथिला येथें चवदाव्या शतकांत होतें, विक्रमशिलेप्रमाणें मिथिला येथील विद्यापीठाचा नाश मुसलमान सेनानायकांच्या हातून झाला नाहीं; पण नडिया म्हणजे नवद्वीप येथे स्थापन झालेल्या नव्या विद्यापीठाच्या तेजानें मेथिलविद्यापीठाचें तेज ढोपून गेळे, मिथिला-विद्यापीठ हें न्यायशास्त्राचें एक मुख्य आगर होतें, व तेथील शिक्षणाची कौर्ति ऐकून हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांतून
३८ संस्कृत विदयेचें पुनरुज्जीवन
विद्यार्थी तेथें जात. परंतु विद्यापीठांतील प्रोफेसर लोक आपले ज्ञान एखाद्या मोल्यवान वस्तप्रमाणें गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत. विद्यार्थ्योस शिक्षण मिळे, त्यांच्या परीक्षा घेतल्या जात, व त्यांना * डिप्लोमा ? ऊफ प्राविण्याच्या सनदा दिल्या जात. परंतु कोणाही विद्याथ्यांनें कोणत्याही न्यायग्रंथाची प्रत उतरून घेऊ नये, किंबहुना शिक्षक लोकांनीं व्याख्या- नांत दिलेलीं टिपणें विद्यापीठाबाहेर नेऊं नयेत, असा कडक 'निबेध असे. अखेर नवद्दीप येथोळ तरुण पंडित वासुदेव यानें या गुत मिथिल विद्या- घनावर घाला घातला. एवढेच नव्हे तर नवद्दीप येथें नवे प्रतिस्पर्धी विद्यार्पीठ स्थापन करून त्यानें मिथिलविद्यापीठाचें महत्व बुडविले. बाघुदेव पडित हा मिथिलविद्यार्पाठांत विद्याथी म्हणून गेळा, त्या वेळीं पक्ष- घरमिश्र नांवाचा प्रसिद्ध नेय्यायिक मुख्याध्यापकाचे जागीं होता. त्यानें या तरुण विद्याथ्यांची हुषारी पाहून त्यास ' सावभोम ? अशी पदवी दिली. पण केवळ या पदवीने संतुष्ट न होतां वासुदेव पडितानें कोणास कळूं न देतां मेथिल न्यायविद्येचे आकर-ग्रंथ सर्व तोंडपाठ केले ! व नेतर काशी येथे वेदांताचे अध्ययन करून नवद्दीप येथे परत जाऊन, पंघराव्या शतकाच्या अखेरीस त्याने स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले ! बासुदेव पंडिताचे चार नामांकित शिष्य होते. ( २ ) रघुनाथ शिरोमणी; हा आधुनिक नव्या न्यायशास्त्राचा श्रेष्ठ ग्रेथकर्ता असं अद्यापि मानलें जातें. ( २ ) रघुनंदन; हा बंगाल्यांतील हिंदुधमशास्त्रावरील प्रमुख ग्रेथ- कार आहे. ( ३ ) कृष्णानंद आागमवागीश; यानें बंगाल्यामध्यें तंत्र- शास्त्राचा प्रथम प्रसार केला आणि ( ४ ) चेतन्य, म्हणजे बंगाल्यांतील वैष्णव धमाचा मूल संस्थापक. चेतन्यानें आपला गुरु बासुदेव सार्वभोम याजकडून वैष्णव मताचा स्वीकार करविला असें सांगतात. वासुदेव सावभोम हा ओरिसा देशाचा राजा गजपाते प्रतापरुद्र याच्या आश्रयास असतां सन १५२० सालीं निवतेला.
दक्षिणी पंडित ३९
नवद्वीप येथे स्थापन झालेल्या विद्यापीठांत दॉकडॉ विद्यार्थी येऊन शिकून जात. परंतु मैथिलविद्यापीठाप्रमाणें, नवद्दीप येथील विद्यापीठास परीक्षा उत्तीणे झालेल्या विद्याथ्यांना पदव्या देण्याचा अधिकार बराच काळपर्येत प्रास झाला नव्हता, तो मिळविण्याची खटपट रघुनाथ शिरो. मणी यानें केळी. वदव्या देण्याचा अधिकार त्या वेळीं राजाच्या एखाद्या सनदेने मिळावयाचा नसून तो सर्वस्वी लोकमतावर अवलंबून होता; आणि मेथिलपंडितांना वादांत पराभूत केल्याशिवाय लोकमत पाहिजे तसें अनुकूल होण्यासारखे नव्हते. म्हणून रघुनाथानें वासुदेव सार्वभोमाच्या परवानगीने मिथिलटेस जाऊन तेथील विद्यापीठांत गुसतपणे प्रवेश करून घऊन व खुद्द पक्षघर्रामश्राचा वादांत पराभव करून नवद्दीप येथें पदव्या देण्याचा अधिकार सन १५३० सालीं मिळविला, आणि परत नवद्दीप येथे येऊन त्याने एक मोठी पाठशाळा काढली. नवद्दीप येथील विद्या- पीठाचा लौकिक तेव्हांपासन जो सुरू झाला तो अद्यापही जाग्रत आहे; व सव बेंगाल्यांत नवद्वीपासारखे संस्कृत विद्येच्या दृष्टीनें दुसरें महत्वाचे स्थानच नाही असे म्हटले असतां चालेल.
दक्षिणी पडित
बर बेंगालप्रांतांतील पंडितगिरीसंब्रंधानें जशी थोडीशी माहिती दिली आहे तर्शांच दक्षिणी पंडितांविषयीही प्रस्तुत लेखांत थोडीशी माहिती देण्याचा आमचा विचार आहे. दक्षिणी पंडितवर्गाची जी थोडीबहुत माहिती मिळते तिजवरून पहातां, इतर प्रांतांतील पंडितपरंपरेची अशीच माहिती मिळाल्यास ती फारच मनोरंजक होइल असें वाटतें. दक्षिणी पेडितांचें वजन व महत्व इकडेच होतं असं नाही; तर उत्तरदिंदुस्था- नांतह्ी तें पुष्कळच होतें. ज्या त्या प्रांताला आपापल्या पंडितपररेचा
४० संस्कृत विधेचें पुनरुज्जीवन
अभिमान विशेष असणं स्वाभाविक आहे. असें असतांही कलकत्ता संस्कृत कालेजांतील विद्यमान पडित महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री,
एमू, ए. सी आय. ई., यांनीं “' इंडियन अँटिक्केरी ' नामक मासिक घुस्तकाच्या अलीकडच्या एका अंकांत प्रांजलपणानें अशी कबुली दिलेली आहे काँ, विद्यापीठांचे आगर व पवित्र क्षेत्रांतील अत्यंत श्रेष्ठ अशी जी काशी ( बनारस ) ती उत्तरहिंदुस्थानांत असतां, तेथें दक्षिणी पंडि- तांचे जे बजन व जी मान्यता आहे ती खुद्द त्या प्रांतांतील पंडितांना मुळींच नाहीं. हें महत्व आजकालपंच आहे असं नाही, तर कित्येक शातकां- पासून चालत आलेलें आहे. घर्म आणि विद्या यांच्या बावतींत तद्देशीय, कनोजी व शारवरीय ब्राह्मण हे केव्हांही पहावें तों दक्षिणी पंडितांपुढे अगर्दी दिपून ग्रेळेले दिसतात, बनारस येथे हुडकणारास इजारां हस्त- लिखित ग्रेथरूप पोथ्या सांपडतात. आणि त्याजबरोबर त्याला हेंही आढ- ळून येतं की, यांतील बरेच ग्रथ खुद्द काशी येथ वास्तव्य करून राहि- लेल्या कित्येक दक्षिणी पंडितांच्या घराण्यांतील विद्वान् व बुद्धिवान लोकांनीं लिहून ठेविळेले आहेत. बनारस येथील महाराष्ट्र पडितकुळांचा इतिहास हाच गेल्या चार शतकांतील हिंदुस्थानांतील बहुतेक प्रांतांच्या संस्कृत विद्येचा इतिहास होय अशी हरप्रसाद शास्त्री यांची समजूत आहे. बंगाल्यांत नवद्दीप वगेरे ठिकाणीं पंडितपरंपरा या कालावर्धांत चांगलीच जायत होती; पण तिच वजन बंगाल्यापुरतं होत. असें असतां त्याच्या उलटपक्षीं नारायण भट्टासारख्या महाराष्ट्रीय पंडिताच्या विद्वत्तेचा अधि- कार, खुद्द काशी, कनोज ब मिथिला येथंच काय, पण बंगाल्यांतही मानला जात असे. पंडित नारायणभट्टानें सर्व हिंदुस्थानभर प्रवास केला होता व त्यानें अनेक संस्कृत ग्रंथ लिहून ठेविळे असून जगांतील अनु
भवांत प्रायः घडून न येणारी अशी एक गोष्ट त्याच्या संबंधांत इंश्वर- कृपेनें घडून आली होती. ब ती ही का, त्याच्या पश्नातू त्याच्या घरा-
दक्षिणी पोडित १
ण्यांत अनेक पिढ्यांपयेत जबळ जवळ त्याच्या तोडीचे लोकोत्तर पंडित होऊन गेले, महाराष्ट्रीय पंडितांची वसाहत कारीक्षेत्रांत ब आसपास जी आढळते तिचा बराच भाग नारायणभट्रामुळें वसलेला आहे,
याच कुळांतील एका पंडिताने गाघिजवंशानुचरितनामक जो एंक ग्रंथ लिहिला आहे, त्यावरून या घराण्याचा बराच इतिहास कळतो. या घराण्याचे गोत्र विश्वामित्र असून हे आश्वलायनशाखीय क्रगेदी ब्राम्हण होत. यांचा मूळ पुरुष गोविंदभट्ट हा पंघराव्या शतकांत दक्षि- णेत पंडित म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा नातू प्रस्तुतचा नारायणभट्ट होय. नारायणभट्टाच्या बापाच्या तरुणपणी दक्षिणेतील बहामनी राज्य फुटून त्याचे तुकडे झाले. नारायणभट्टाचा बाप रामेश्वरभट्ट याच्या वेळेपासून या घराण्याची शिष्यपरंपरा फेलावली. तो स्वतः मीमांसा, व्याकरण, न्याय व वेदांत या चारही शास्त्रांत निष्णात होता, ब गोदावर्रीच्या कांठीं पेठण येथ रामेश्वरभट्टाचे विद्यारीठ इतके गजबजून गेलें होतें कीं, वरील गाघिजवंश्ा नुचरित ग्रेथांत त्याला * श्रीरामचंद्राच्या सेन्याच्या छावणी ? ची उपमा अतिदायाक्तीनें दिलेली आहे. रामेश्वरभद्ट हा चमत्कार करून दाखवी असेही मार्नीत. निदान या त्याच्या कोर्तोमुळे निजामशाहीच्या बादराहाने रामेश्वरभट्टाळा सुवर्णमुद्रांकित निमंत्रणपत्रिका पाठवून आपल्या दरबारीं बोलावून घेतलें व त्याचा बहुमान केला, असा उलेख आढळतो, यानंतर रामश्वरभट्ट हा विद्यानगर येथ कृष्णरायनामक राजा राज्य करीत असतां गेला, व तेथुन द्वारकेच्या यात्रेस जात असतां वाटेंत त्याचा नारायणभट्ट हा मुलगा शके १४३५ च्या चेत्रमासांत ( मार्च सन १५१४ ) जन्मला. द्वारकेस अनेक शिष्यांकडून त्यार्ने महाभाष्य व सुरेश्वरवार्तिक यांचें अध्ययन करविले. नंतर पेठणास परत येऊन चार वर्षानी काशीस गेला, तो मग तेथेंच कायमचा राहिला, तेथेच त्याला बा्कांचे मुलगे झाले. त्यांचीं लञञें सोयरीकीही तिकडच्या
४२ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
तिकडेच झाल्या व ही वसाहत हळू हळूं तेथेंच फेलावली., रामेश्वर- भट्टाच्या शिष्यांमध्ये अनंतमद्ट पितळे, दामोदरसरस्वाते, माधअसरस्वति, गुजराथ येर्थांल गोविंद द्विवेदी, दक्षिणेतील वेदांताचे अध्यापक आचाये- भट्ट व विश्वनाथ तुलसी, गीतगोविंदाचा टीकाकार, कनोज येथील शंकर मिश्रशर्मा वगैरे होते. बरील माधवसरस्वति हा मधुसूदनसभस्वतीचा गुरू होय, हल्लींच्या दगा राज्याचा मूळ संस्थापक व * तत्वथितामण्या- लोकदूर्पण ? या ग्रंथाचा कता मिथिला येथाळ रहिवाशी महेश ठक्कर हाही रामेश्वरभट्टाचाच शिष्य होय. याशिवाय त्याच्या शिष्प्रवर्गात द्रविड, गुर्जर, कान्यकुन्न, मालव, व्रज, हिमाल्य, क््नांट, उत्कल, कोंकण, गोड, आंभ्र, मथुरा, कामरूप वगेरे प्रांतांतील लाकडी होते असा सदर ग्रेथांत उलेख आहे. परंतु वर्णनाच्या एन बहारींत आलेल्या ग्रेथकर्त्यांच्या कल्पनामय अतिदायोक्तीच्या ओघाचा भाग यांत किती आहे व वस्तु- स्थितिवणन किती आहे, याची निवड करणें जरासे कठीणच जाईल. नारायणभट्ट हा आपल्या बापापेक्षांही विद्वान निघाला. श्रति स्मृति व षडदर्शने या सवांचे त्यानं अध्ययन केळं. पूर्वेकडील पंडितांशीं मोठ- मोठे वाद करून धार्मिक बाबतींत त्याने दःक्षिणात्य कल्पनांचा श्रेष्ठ- पणा त्यांच्या मनावर निंबविण्याचा प्रयत्न वेळा. गया, काशी, प्रयाग या तीन क्षेत्रांत यात्रेकरूने पूजाअची ब विधि कसे करावे यासंबंधींचा ६ त्रिस्थळीसेतु * नामक ग्रेथ यानेच लिहिला अर्च म्हणतात, नारायण- भट्ट हा अकबराचा प्रासिद्ध प्रधान तोडरमलू याशी समकालीन हाता, तोडरमल हा विद्येचा मोठा भोक्ता ब आश्रयदाता असे. त्याने स्मात, ज्योतिष व वेद्यक यासंबंधाने संग्रहग्रंथ लिहविले होते. तो बरेच दिवस बेगालचा सुभेदार होता यामुळें बंगाली पॉडताशींही त्याचा परिवय असे. दिली येथ असतांना तोडरमलळू याने एके प्रसंगीं श्राद्धकमास बंगाली पडित बोलाविले होते व त्या प्रसर्गा नारायणभट्ट यासही निमं-
दक्षिणी पंडित ४३१
त्रण केलेले असून, त्या वेळीं नवद्दीप येथील प्रख्यात पंडित विद्या- निवास बॅनर्जी व त्याच्या बाजूचे गोड आणि मेथिळ पंडित यांच्याशी नारायणभट्टानें मोठा वाद करून जय मिळविला, असेंही या ग्रेथांत लिहिले आहे. श्रीरामचंद्राच्या यशाची कल्पना येण्यास रावणाच्या ऐश्वर्याची कल्पना आधीं येणें जरूर आहे असे म्हणतात ते कांही खोटें नाहीं, त्याचप्रमाणे नारायणभट्टाची विद्ठूत्ता लक्षांत येण्यास पडित विद्या- निवास यांची थोडी माहिती सांगणें जरूर आहे. विद्यानिवास बॅनजी यांचेही घराणें विठ्ठत्तेच्या कारणामुळें फार नामांकित होतें. विद्या- निवासाचा बाप विद्यावाचस्पती बॅनर्जी हें एवढे प्रचंड घेड होते कॉ, £ त्याच्या पायांवर तहेश्ीीय राजे लोकांचे रत्नजाडित मुकुट लोळत असत ! ? अथोतू या काविवर्णनांतील ग्राह्यां तेवढाच आपण घेऊं. पण दुसरी एक गोष्ट निर्विवाद आहे कॉ, निदान विद्यानिवास बॅनर्जी हे प्रसिद्ध पंडित होते. सव हिंदुस्थानभर मान्य असलेला न्यायग्रेथ- भाषापरिच्छेद-हा त्यांच्या दुसऱ्या मुलाने लिहिळला आहे, व त्यांचा तिसरा मुलगा अंबर येथील मानसिंहाचा मुलगा राणा भावसिंह याच्या दरबारीं पंडित होता. वरील गोष्टीवरून विद्यानिवास बॅनजीं यांच्या घरा- ण्याचा लौकिक कळून येतो. परंतु प्रस्तुत मुद्दा इतकाच काँ, या विद्या- निवास बॅनजींचा नारायणभट्ट यानें वादांत पराजय केला होता. वादाचा मुद्दा ग्रथांत वर्णन केला आहे तो विशेष उदात्त आहे असे म्हणवत नाहीं; तो बराच गोण होता. म्हणजे श्राद्धविधीमध्यें सजीव ब्राह्मणरूप पितरांना पितुस्थानीं बसवून भोजन घालावे किंबा त्यांच्या ऐवजीं दभभांचे पितर मांडून चटश्राद्ध करावें ! हा होता. वादाचें कारण असे दिसतं कीं, बंगाली पोडितांच्या मतें कलियुगांत भोजन घालण्यास योग्य असे सत्पात्र ब्राह्मण मिळणें अदाक्य आहे; सबब प्रत्यक्ष ब्राम्हणभोजन घाल ण्याविषयीं पुराण कषीची आज्ञा असली तरी, ती कलियुगांत शब्दशः
४9 संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
पाळू नये. नारायणभट्टाचें मत याविरुद्ध होतें; व चटमूर्तींपेक्षां कलि- युगांतील असत्पात्र ब्राह्मण झाला तरी तोच श्रेष्ठ असें दाक्षिणात्य पंडितांचे मत असून तंच नारायणभट्टानें बंगाली पंडितांकडून अखेर कबूल करावयास लावलें असं दिसतं.
नारायणमट्ट यांची शिष्यपरंपरा मोठी होती. पेकी ब्रह्मेंद्रसरस्वति व नारायणसरस्वाते ही जोडी बरीच प्रसिद्ध आहे. या नारायणसरस्वतीनें सोळाव्या शतकाच्या अखेरीस बरेच वेदांतग्रंथ लिहिले. स्वतः नारायण- भट्टाच्या ग्रथांपैकी दक्षिणेकडे चालूं असळेला “ धर्मप्रवृत्ति ! व उत्तर- हिंदुस्थानांत चाळू असलेला ' प्रयोगरत्न ' हे दोन ग्रंथ स्मृतिसंबंधानें आहेत. वृत्तरत्नाकरावर त्याने एक टीका लिहिलेली असून '* वत्तरत्ना- बली ? हा स्वतंत्र ग्रंथ त्यानें लिहिला आहे. ऑफ्रेट याने आपल्या संस्कृत अंथाच्या यादींत नारायणभट्टाचे अनेक ग्रंथ नमूद केलेले आहेत. त्यांत कांहीं मीमांसाग्रेथ, शास्त्रदीपिकेवरील टीका आणि माधवाचार्यांच्या कालनिणेयासंबंधाच्या कारिका आहेत. नारायणभट्ट हा मोठा ग्रइस्थाश्रमी असून संन्यासाश्रमाच्या विरुद्ध असे. वेदांतविषयांवर अनेक संन्याशांर्शी त्यानें वाद केले होते. वाद करून त्यानें पराभूत केलेल्या संन्याशांपैर्की नु्सिहाश्रम, उपेंद्राश्रम व मधुसूदनसरस्वाते हे होत. नारायणभट्टाची मोंगलद्रबारांताहे ख्याती होती. मोंगल सुभेदाराच्या विनंतीवरून एके वेळीं ' चोबीस तासांत पाऊस पाडवून त्यानें आवर्षणाची आपत्ती नाहीशी केली ' असं म्हणतात ! व या त्याच्या कामगिरीबद्दल काशी येथील, शंभर बषोपूर्बी मुसलमानांनी उध्वस्त केल्यामुळे पडीक झालेल्या, श्रीविश्वे्वराच्या देवालयाचा जाणोद्डार करण्याची परवानगी त्यास देण्यांत आली ! निदान, हली अर्धी मर्शाद ब अर्धे देऊळ अशी जी इमारत बनारस येथ निश्वेश्वराचें मंदीर म्हणून दृष्टीस पडते, तिच्यांताल देवळाचा भाग_ नारायणभट्टानें बांधलेला होय हें निर्विवाद आहे.
दक्षिणी पाडेत ४५.
नारायणभट्टानें आपल्यामागे स्वकतुक ग्रेथांशिवाय, ग्रेथसंरक्षणाच्या दृष्टीने देखकांकडून उतरवून घेतलेले असे बरेच ग्रंथ ठेविले, नारायणभट्टाचा बडील मुलगा रामकृष्णभट्ट हाही विद्वान असुन “ जीवत्पितुक निर्णय, ' : कोटिहोमादिपद्धाति, ! ज्योतिष्ठोमपद्धति, ' “ मासिकश्राडधनिर्णय, : वास्तुशांतिप्रयोग, ! * रुद्रळानपद्धति ! वगैरे अथ त्याच्या नांवावर मोड- तात. त्याच) दुसरा मुलगा जो रांकरभट्ट याच्या शिष्यवर्गात मह्लारीभद्ट व भट्टोजी दीक्षित-सिद्धांत कौमुदीचा कर्ता-हे होते. याच शंकरभट्टानें : घमद्वेतनिणयरचेद्रिका, ? ' मीमांसबालप्रकाशत्रतमयूख,' “ शास्त्रदीपिका- प्रकाश, ' सर्वघर्मप्रकाश ? वगेरे ग्रंथ लिहिले.
नारायणभट्टाच्या घराण्यांतील पंडितांप्रमाणें दुसरोहिे अनेक पंडित काशीक्षत्रीं प्रख्यातीस आले. त्यांपैकी विद्यानिधिकर्वाद्र या नांवाचा संन्यासी हा प्रमुख होता. सर्वे पंडितांचा तो पुढारी असून शहाजहान बादशाहाने प्याला * सर्वविद्यानिधान' अशी पदवी दिली होती. यानेंही प्रचंड ग्रेथसग्रह केला होता. ' विद्यानिधान कर्वीद्र सरस्वाते! अशा ठळक व सुंदर अक्षरांवरून, काशीबाहेर पसरलेले त्याच्या संग्रहांतील ग्रेथ अद्यापि हुडकून काढितां येतात. विद्यानिधानकर्वीद्र ह्या नुसता पंडित नव्हता, तर मोठा कर्ता पुरुषाहि असे. त्याच्यावेळीं काशी व प्रयाग येथे जाणाऱ्या यात्रेकरूंकडून कर वसूल केला जाई, व त्यासुळें त्यांस त्रास होत असे. यात्रेकरूंच हं दुःख पाहून विद्यानिधिस्वामी बरोबर अनेक पंडित वगैरे घेऊन काशीहून आग्रा येथे गेला. आग्रधास शहाजहान बादशहा त्यावेळीं राहत असे. बादशहाची दिवाणी -आममध्यें गांठ घेऊन हिंदु यात्रेकरूंची वकिली त्यानें इतक्या उत्कृष्ट रीतीनें केली की, एका वर्णन- पदु लेखकानं वर्णिल्याप्रमाणे * बादशहाच्या दरबारांत बसलेले इराख, इराणा, बदकशन, बल्क, काबूल, कंदाहार, काश्मीर, पंजाब, सिंघ वगेरे देशचे अमीरउमराव विद्यानिधीर्चे वक्तृत्व ब त्याचें बकिलीचातुर्य पाहून
४६ संस्कृत विद्येचे पुनरुज्जावन
गार होऊन गेले! आणि अखेर राहाजहान व राजपुत्र दाराेखो यांना दया येऊन त्यांनीं हिंदू यात्रेकरूवर्शीळ कर माफ केल्याचा हुकूम दिला. निवृत्ति व प्रवृत्ति यांचा स्वतःच्या चारित्र्यांत सुंदर मेळ घातलेल्या विद्या- निधिस्वामीनें ज्या दिवर्शी बादशहाकडून कर माफ करवून यात्रेकरूंचे दुःख निवारण केलें तो दिवस सव हिंदुस्थानांतील ढोकांस आनंदकारक झाला ! याच प्रसंगी बादशहाने स्वामीस ' सर्वविद्यानाधि? हा किताब दिला. अशा रीतीने यश मिळवून आल्याबद्दल सर्व हिंदुस्थानांतुन त्यांज- बर मानपत्रांचा वर्षांव झाला. यापेकी शंभर मानपत्रांचा एकाने संग्रह केलेला असन तो कलकच्याच्या एशियाटिक सोसायटीच्या ग्रेथसंग्रहा- ल्यांत अद्यापि पहावयास सांपडतो.
नारायणभट्ट व विद्यानिधी यांच्यानंतर काशी येर्थे प्रख्यातीस आलेले दक्षिणी पंडित म्हटले म्हणजे गागाभट्ट हे होत, यांना विश्वेशवरभट़ू असेंही नांव होते. गागाभट्ट हे नाराथणभट्टाचेच वडज होत, त्यांचा बाप, चुलते व चुलत भाऊ, हे सवं ग्रेथकार होते. परंतु गागाभट्टाची पायरी या सर्वावरची होती. गागाभट्टांनीं मीमांसा, अलंकार व वेदांत यांवर ग्रंथ लिहिले, जैमिनीय सूत्रांवर त्यांनी टीका लिहिली, तत्तेच कुमारिल- भट्टाने शाबरभाष्याची टाका जेथें सोडून दिली होती तेथून ती पुढें सर्व गागाभट्टानें पुरी केली, पण ग्रेथकार या नात्यापेक्षा श्रीशिवाजी महा- राजांचा अभिषेककार या नात्यानें गागाभट्टाची कौर्त अधिक दुमदुमत आहे. शिवाजीमहाराज उदयास येण्याच्या पूर्वीच्या निराशामय काळांत राजाश्रय फारसा नसतांहि, दक्षिणी पंडितांनी आपल्या विद्येचे तेज सवे हिंदुस्थानभर पसरले होतें. त्या तेजाला, शिवाजी महाराजांनीं स्वराज्य स्थापून महाराष्ट्रीयांचा माथा उंजळ केल्यावर, अधिकच लकाकी यावी हें अगर्दी स्वाभाविक आहे. शिवाजीमहाराजांनी अभिषेकाला गागाभट्रास योल्यावेळे ते केवळ तो विद्वान् त्राझण होता, व काशीच्या पंडितांत अग्र
दक्षिणी पंडित ४७
गण्य होता म्हणुन नव्हे; तर विशेषतः तो दक्षिणी-महाराष्ट्रीय होता म्हणून, नेक्रलोकडील राजेश्वयेमोडित बीर्यशाठी मराठे अण इशान्ये- कडील क्षेत्रांतीळ विचेश्रयमीडित तेजस्वी ब्राह्मण, या उभयतांनी सतराव्या शतकांत जोडलेल कोतिमडळ हे. भारत-पुरुषाच्या शराएवरील पवित्र यश्ञोपवीठच होतं, अशीही उत्पेक्षा शोभेल.
गागाभट्टाने!र उदयास आलेला दक्षिणी पंडित नागोजीभट्ट हाहि सर्वशास्त्रपारगत होता. टीकाकार या नात्यानें नागोजीभट्टानें सनाथ केलें नाहीं, असं एकाहे शास्त्र सांपडावयाचे नाहीं, तीर्थ, तिथी, योग, मीमांसा, रामायण, सांख्य, वेदांत वगेरे विषयांवर याचे ग्रंथ आहेत. तथापि, पाणिनीय व्याकरणावर टीकारूप लिहिलेले ग्रंथ विदोष श्रेष्ठ व सर्वमान्य हेत. नागोजीभट्टाने शेकडो विद्यार्थ्यास विद्येच्या मार्गास लावून नांगररूपास आणलें; व यासंबेधाच्या देतकथा काशीस लोक श्सद्यापे सांगतात. प्रन १७७५ च्या सुमारास, म्हणजे बनारसचे शी राज्य जाऊन ते 5हर कपनी सरकारच्या हातीं जाण्याच्या सुमारास, नागोजी भट्ट हा वारला. आध -प्रतापगडच्या राजानें नागोजीभट्टाचा योगक्षेम अखेरपर्यंत चार्लावला होता, त्याचाच शिष्य वैद्यनाथ पायगुडे अथवा अन्नभट्ट यानें व्याकरण ब स्मृति या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. मिताक्षरेच्या व्यबहारखंडावरील त्याची टीका हा, तिकडील स्मृतिग्रथ लावण्याच्या कामी मूधाभिषिक्त अधिकारी ग्रंथ या नात्यानें ब्रिटिश न्याय- झाली, त्या वेळी त्यांतीठ प्रोफेसर दाक्षिणी पंडितच होते व अजूनही त्या 'कॉलेजाच्या शिक्षक वर्गामध्ये दक्षिणी पडितांचें प्रस्थ बरेंच आहे.
काशी येथे प्रासद्धीस आलेल्या बरील दक्षिणी पंडितांखेरीज आणखीही कांहीं दक्षिणी घराणी होती. शेषाचायोचें घराणें हें वास्तरिक मूळचें
५८०५ ०७०११५
तेलंगी ब्राह्मणाचें. तथापि सर्व बार्जुनीं ते दक्षिणी ब्राह्मणासारखेंच होतें असे
४८ संस्कृत विद्येर्चे पुनरुञ्जीबन
म्हणण्यास हरकत नाहीं. दुसरें घराणें धर्माधिकारी यांचें. या घराण्याचा संस्थापक नारायणभट्टाच्या घराण्याच्या मूळ पुरुषाच्या आगेमागे म्हणजे सन १५२२ च्या सुमारास काशीस जाऊन राध्ला असावा. तिसरे घराणें भारद्वाज यांचें. या भारद्वाज घराण्याचा मूळ पुरुष महादेवभदट्ट, हा नारायणभट्टाच्याच एका वबशजाचा जांबई होता. यानेच सिद्धांतमुक्ता- वलीवरील दिनकरी नांवाची टीका लिहिली. या घराण्यांतील एक वदाज महामहोपाध्याय दामोदरशास्री हे बनारस येथील काळेजांत आणि महा- महोपाध्याय गोविदशास्त्री हे कलकत्ता येथील संस्कृत शाळेत अध्यापक होते. चवथें घराणं पायगुंडे यांचें बर सांगितलेले. पांचवे घराणें चोघरी ऊर्फ चतुधर यांचें. याच घराण्यांतील नीळकंठ चतुधैर याची भारतावरील टीका प्रसिद्ध आहे. सहावे घराणें पुणतांबेकर यांचें. यांतील महादेव- शास्त्री यांनी दीघिर्तीवरील भावानंद सिद्धांतवागीरा यांच्या र्टाकेवर उपर्टाका केली आहे.
हीं सर्व घराणीं व त्यांतील विद्वान् पंडितांनी लिहिलेले ग्रेथ हा महा- राष्ट्रीयांस निरतर अभिमानाचा विषय होऊन राहील यांत शंका नाहींच, पण पंडित हरप्रसादशासत्री हे स्वतः बंगाली असून त्यांनीं महाराष्ट्रीय पंडितांच्या कीर्तीची थोरवी अशा प्रांजलपणाने गाइली, ही गोष्ट त्यांच्या
विद्वत्तेस अत्यंत भूषणास्पद होय.
महाराष्ट्रांतील कांहीं पंडित घराणी
मागील लेखांत बनारसेकडील दक्षिणी पंडितांची परंपरा आम्ही नागोजी भट्टापयेत आणून सोडली आहे. नागोजीभट्टानंतरही ज्यांची योग्यता नागे.जीभट्टापेक्षां फारशी न्यून नाहीं असे अनेक वबेद्वान् झाले आहेत. नागोजीचा प्रसिद्ध खण्डनकार नाना पाठक हा एक गुजराथी पंडित असून त्यांची योग्यता फार मोठी आहे. पाययुंडे या नागार्जाच्या पट्ट शिष्याचे जामात देव, व विद्यार्थी भेरवमिश्र हेही फार मोठे पंडित होते, किंबहुना या रोवटील काळांत महाराष्ट्रांत उदयास आलेले सर्ब पंडित पायगुडे यांच्या शिष्यवर्गामध्ये मोडतात, पुण्याचे प्रासिद्ध निळकठ' शास्त्री थत्ते हे ज्या अहोबल शास्त्र्यांचे विद्यार्थी होत त्या अहोबलांचे अध्ययन ' पायगुडे यांचे जामाताजवळ जाहलं' अशी प्रास आहे. आज काशीस जीं विद्वद्रत्ने आहेत तीं व के, महामहोपाध्याय भारद्वाज दामो- दरशास्त्री हे सुद्धां, प्रसिद्ध महाराष्ट्र पंडित, एके काळीं पुण्याच संस्कृत विद्यालयाचे मुख्य अध्यापक, व महामहोपाध्याय गोपाळाचार्य कऱ्हाड- करांसारख्या विद्वानांचे गुरु जे गोविंदाचार्य अष्टपुत्रे यांचेच शिष्यक्याखत तयार झाले आहेत. काशीचे प्रसिद्ध पंडित बाळशास्त्री रानडे हे गो१दा- चायोचे पुत्र काशिनाथशास्त्री यांचे विद्यार्थी होत; व आज काशीस भूषण असलेले प्रायः सर्व विद्वान् या बाळेंद्र सरस्वति ऊर्फ बाळशास्त्री गनडे यांचेच विद्याथी होत, तात्पर्य, आज चार पांचदा वर्षे काशीस त्यार झालेले जे मोठमोठे पंडित त्यांची परंपरा दक्षिणी पंडितांपासूनच आहे.
नागोजीनंतर नागोजीच्या ग्रेथांचें सयुक्तिक व विद्दन्मान्य असे विवेचन करणारे राधवेंद्राचार्य गजंद्रगडकर हेही नागोजीच्या तोडीचे < विद्वान् होते. हे प्रसिद्ध नीलकंठशास्त्र्यांचे विद्याथी असून, व्याकरणशा सत्रामध्ये विषमी,
त्रिपथगा, प्रभा, वगैरे त्यांचे ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत, किंबहुना काशीकर |.
ष० संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
मंडळी आज त्रिपथगेस फार मान देतात, व परिभाषेंदुशेखरानंतर त्रिपथ- गेचें अध्ययन मुद्दाम करावितात, भट्टांच्या घराण्याप्रमाणें या राघवाचार्यो- च्या घराण्यांत एकापेक्षा एक ज्यास्त अशी अनेक विद्दवदरत्नें निमाण झालीं असून अद्यापहि त्या घराण्यांत संस्कृत विद्याभ्यास चाळू आहे. राघावाचायाचे पुत्र नारायणाचार्य यांचे वेदान्त ब न्याय य़ा विषयांवर फार मार्मिक ग्रंथ आहेत. त्यांचे महावाक्याथंखण्डन व ब्रह्मानंदीखण्डन ६ ग्रेथ फार मोठ्या योग्यतेचे आहेत. यांचेच बंधु रामाचार्य यांनीं प्रासद्ध भट्ट विष्णुशास्त्री यांनी केलेल्या त्रिपथगा-खण्डनाचा उद्घार रदोद्वेदिनी- नामक टीकेने केला आहे. मद्रासच्या पुनर्विवाहाच्या वादामुळे सवास परित्चित झालेले अनंताचार्य यांचीही शाब्देदुशेखर या नागोजीचे ग्रेथावर टीका आहे. प्रसिद्ध राघवाचा्यांच्या मनांतून महाभाष्याबर केय्यटाच्या मंडनाथ व नागोजींच्या खण्डनासाठी प्रदीपोद्योतप्रभा नांवाचा ग्रंथ करावयाचा होता. व तसा उलेख त्यांचे शब्दरत्नावरील टीकेमध्यें “ इदं करिष्यमाणभाष्यप्रदीपोद्यतटीकायां स्पष्ट भविष्यति ” हा आहे. परंतु त्यांचे कनिष्ठ पुत्र व उिद्वत्तंत वडिलांसहि दिपविणारे वामनाचार्य एकाएकीं वारल्यामुळें तो ग्रेथ जाहला नाहीं, हें संस्कृत विद्येचे दुदेव होय. या राघवाचार्योच्या गीतेवर एक भाष्य असून सर्व उपनिषदे व विष्णुसहर- नाम यावर यांच्या टीका आहेत. हा सर्वे ग्रंथसग्रहर सदर आचायांचे धुस्तकसंग्रहाल्यांत साताऱ्यास आहे. या काळीं महाराष्ट्रांतील दुसर प्रसिद्ध विद्वान् बि्ठलोपाध्याय, हे धमासंधुकारांच घु असून गदाधरीचे प्रस्रिद्ध टीकाकार कृष्णंभट्ट अर्ड यांचे विद्याथी होत. यांचीही शिष्यप्रंपरा फार मोठी असुन “ माझें हाड व्याकरण सांगेल ” असें म्हणणारे, व पुण्याच्या सर्मेत 'बेय्याकरणकेसरी' असा किताब मिळावैलेले कृष्णाचार्य पंढरपूरकर हे त्यांचे शिष्यवर्गात प्रमुख होत. प्रासिद्ध मेरुशास्त्री गोडबोले व मोर- शास्री साठे हेही निळकंठशास्त्र्यांचेच विद्यार्थी असल्यामुळं आज महा-
महाराष्ट्रांतील कांडी पंडितघराणीं ण
राष्ट्रांत आवणास शास्त्रीबुवांचे अनुयायी म्हणविणारा सर्व विद्वदर्ग परंपरेने नागोजीचे शिष्यश्शाखंत मोडतो.
महाराष्ट्रांत पूवेकाळीं केवळ मोठमोठे पंडित होऊन गेले एवढेंच नव्हे तर त्यांनीं शासत्राचा प्रसार होण्याकरितां आपणाकडे शिकावयास येणाऱ्या विद्यार्थ्यांस अहर्निश अध्ययनक्रम सुरू ठेविला होता. यामुळें दूरदूरचे बरेच विद्यार्थी या पंडितांकडे येऊन विद्यार्जज करीत असत; व येथील अध्ययन संपल्यावर आपापल्या देशांत जाऊन गुरूच्या पद्धती- प्रमाणे आपणाहि अध्यापन चालवीत असत. प्राचीन पंडितांची विद्वत्ता केवळ त्यांनीं सव ग्रंथांचे अध्ययन केळे, अथवा सभेत वक्तृत्व, समय- सूचकता किंवा पांडित्य दाखविलें एवढ्याच गोष्टींनी मापली जात नसून, त्यांनीं तयार केलेल्या विद्याथ्यांची योग्यता, प्रवीणता व संख्या यांवरून ती ठरवीत असत. या दृष्टीने आधुनिक विद्वानांपेक्षां त्यांस बराच श्रेष्ठ मान द्यावा लागतो, तेव्हां ही पंडितांची घराणीं म्हणजे कमीजास्त प्रमाणाने पाठशाळाच होत. अक्शा तऱ्हेच्या पाठशाळेचा बरच्या दर्जाचा मान जगटद्रुरूच्या मठ! कडे आहे. शंकराचार्य यांच्या मठांकडे पाहिलें अथवा वैष्णव मठांकडे दृष्टी दिली तर आम्ही म्हणतों याचा प्रत्यय येईल. या मठांत रोज प्रातःकाळीं पूजाअर्चा झाली म्हणले अद्वैतवेदांत अथवा द्वैतवेदांत यांचे पाठ चालत असतात. व इतर शास्त्रांचेंही पाठ सुरू असतात, मठांत पदारूढ असलेले आचार्य हे त्या त्या कालाच्या परिस्थितीप्रमाणे कमी अधिक विद्वान् असून त्यांचे पाठ व प्रवचन इं मुख्य कर्तव्य मानलें जात असे. या पाठ-प्रवचनांच्या वेळीं जो हुषार विद्यार्थी म्हणून नावाजला जात असे व जो सुनीत धर्मशील म्हणून सर्वास पटलेला असे, त्यालाच पुढें पूर्वगुरूच्या अंत- समर्यी दीक्षा देऊन पदाधिष्ठित करीत असत. याप्रमाणे या मठांतून योग्य पंडितपरंपरा कायम राहून तेथें अध्ययन अध्यापन उत्तम रीतोनें
ण्रे संस्कृत वियेचें पुनरुज्जीवन
म्वाळत असे. मठांतील विद्यार्थ्यांची उत्तम तयारी होत असे यास एक विशेष कारण आहे तें हें कीं, मठांत रोज सायंकाळी आराध्यदेवतेची पंचोपचार पूजा झाली म्हणजे मंत्रपुष्पाचे वेळीं ' क्तग्वेदसेवामवधारय । सामवेदसेवामवघारय । व्याकरणसेवामवधारय । न्यायसेवामवघारय । वेदांतसेवामवधारय । इ. इ. अशा रीतीनें सुवर्णदडधारी अधिकृत पुरुषाने त्या त्या विद्वानांस सेवा करण्यास आव्हान केले कीं ते ते पंडित येऊन पूर्वपक्ष उत्तरपक्ष होत, श्रॉंच्या दशशेनास दूरदुरचे जे पंडित येंत असत त्यांची परीक्षेची होच वेळ असे, तेव्हांत्यांचा व मठांतील विद्वानांचा याप्रमाणे प्रत्यही सायंकाळी बाद होत असे, व त्यांत सरस-निरसाची तेव्हांच पारख होत असे, तसंच प्रत्यद्दी बाहे- रच्या पंडितांबरोबर झगडण्याचा प्रसंग येत असल्यामुळें मठांतील विद्यार्थी व गुरु यांची शास्त्रम्रंथाची उपस्थिती सतेज राहात अस. शिवाय श्रींच्या पदरी उत्तम उत्तम पंडित आश्रय देऊन मुद्दाम ठेव- ळेळे असत. कारण हिंदूंच्या घर्मबाबीसंबंधानें निकालाचे हे * प्रिव्ही कौन्सिल ? असल्यामुळे धर्मशास्त्राच्या निणयाकरतां श्रीस असे पंडित जवळ ठेआावेच लागत, तेव्हां ही आचायोरची पीठे म्हणजे विद्यादेवीची आदमंदिरेंच होत. या घराण्यांत प्राचीन काळीं विद्यारण्य, जयतीथ बंगेरे पडित होऊन गेले. प्रस्तुतकालींही नुकतेच समाधिस्थ झालेले शुंगेरीच्या मठाचे ब वेष्णव मठाचे स्वामी हे दोघेहि उत्तम विद्वान् होते.
आतां आपण महाराष्ट्रांतील पंडितघराण्यांकडे वळू. हा पंडितघराणीं महाराष्ट्रांत ' विनाश्रया न शोभन्ते ? या सुभाषिताप्रमाणें राजघानीच्या शहरांतच विशेष आढळून येत. कोल्हापूर, सातारा, पुरणे या ठिकाणीं जशी पंडितांची नांवें ऐकू येतात, त्याप्रमाणें मुंबई, सोलापूर, वगेरे ठिकाणी ऐकूं येत नाहींत. तसंच तीथोची ठिकाणें जी क्षेत्रं तेथेही विद्वानांचा बराच भरणा असे, या दृष्टीनें वाई, नाळिक वगेरे पुराण
महाराष्ट्रांतील कांदीं पंडितघराणीं ५३
क्षेत्रांत पंडितांची विशेष संख्या दृष्टीस पडत असे तेही बरोबरच आहे. कोल्हापूर येथें पंडितराव यांचें घराणें चांगळे प्रसिद्ध असे. या घराण्याची न्याकरणशास्त्राकडे विशेष दृष्टी होती. सातारा येथं गर्जेद्रगडकर, अभ्य. कर, माटे यांचीं घराणी फार प्रसिद्ध होती. गजेंद्रगडकर यांच्या घरा- ण्यांत राधवेंद्राचा्य यांच्या विद्वत्तेसंबंधानें ब बुद्धिमत्तेसंबंधानें लोकांत फार आदर असे. यांची व्याकरण, न्याय, वेदांत व मीमांसा या चारी शास्त्रांत प्रवीणतेसंबंधाने मोठी कीर्ति होती. रघुनाथशास्त्री पवते, अनंत- शास्त्री पेंढारकर, विष्णुशास्त्री भट इ. इ. विद्यार्थी यांच्याचपार्शी त्या त्या शास्त्रांत प्रवीण झाले होते, आचार्यांचे व्याकरण, वेदांत वगेरे शास्त्रांत समान्य असे ग्रंथ आहेत. सभेत वक््तृत्वासंबंधानें यांचा मोठा लोकक होता. या घराण्याची दुसरी प्रदांसनीय गोष्ट म्हणजे आचार्यांच्या मार्गे त्यांचे सर्व पुत्र विद्वान् व कीर्तिमानू निघाले, विद्वान बापाच्या पोर्टी अविद्वान् मुलगा निपजावयाचा हा जो सृष्टिकत्यांचा नियम त्यास हॅ घराणें अपवाद आहे असे म्हटलें असतां चालेल. आतां या घराण्यांत राघवेंद्राचार्यांसारखे सगळच मोठे पंडित होते असं नाहीं. तथापि बडि- लांची कीर्ति घालविणारा मूख असा कोणी झाला नाहीं एवढें खास, गर्जेद्रगडकरांच्या घराण्यांत विद्यमान प्रतिनाधि बाळ!चाय हे आहेत व डॉ. भांडारकर सुद्धां यांच्या विद्वत्तेचे कोतुक करितात. अम्यंकरांचे घराण्यांतही भास्करशास्त्री यांचा व्याकरणांत लौकिक चांगला असे. भास्करशास्त्री हे निळकंठ शास्त्र्याचे शिष्य असून त्यांची दहोखरावर एक टीका आहे, रामशास्त्री गोडबोले, नारायणशास्त्री गोड्बोले वगैरे मंडळी भास्करशा- स्त्र्यांचे विद्वान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे नातू वासुदेव- शास्त्रीबुवा, फर्ग्युसन कालेजांतील शास्त्री व पुण्याच्या पाठशाळांतील मुख्य गुरु, यांचा महाराष्ट्रांत विद्वान् म्हणुन आज चांगला लोकिक आहे. त्यांच्या तोडीचा विद्वान् आज महाराष्ट्रांत दुर्मिळ आहे,
५४ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
भाट्याचें घराणें व्याकरणझास्त्रांत प्रवीण असे. बाई येथें अष्टपुत्रे, गोड” बॉले, आगाशे, रड्डी, ऐनापुरे, वळे वगेरे घराणीं पंडितांची म्हणून प्रस्तिद्ध आहेत, अष्टपुत्रे यांचे घराण्यांत गोविंदाचार्य अष्टपुत्रे हे उत्तम “पंडित असत, त्यांचे व्याकरणशास्त्रांत ग्रंथ आहेत. त्यांचे चिरंजीव काशीनाथशास्त्री हेही मोठे पंडित झाले. ते काशीत जाऊन राहिले. त्यांनी आपल्या पांडित्यानें तेथील लोकांस जेरीस आणल्यामुळे त्यांस तेथें पक्तींत पहिलं गंध लावण्याचा मान मिळाला ! तो अद्याप त्यांच्या घराण्यांत चाळू आहे, यांचे विद्याथी मोठमोठाळे पंडित होऊन गेले, गोडबोले यांच्या घराण्यांत मेरूशास्त्री म्हणून उत्तम नेय्यायिक झाले. भिकूशास्त्रीबोवा हेही उत्तम नेय्यायिक होते. हे सांगलीच्या पाठशाळे- वर गुरु म्हणून होते. महाराष्ट्रांत जें कांही थोडें न्यायशास्त्र प्रचलित आहे त्याचें सव श्रेय या गोडबोल्यांच्या घराण्याकडे आहे. आगाडे यांच्या घराण्यांत गोपीनाथशासत्री आगाशे हे उत्तम पंडित होते. रर्डींचें घराणें मूळचें कर्नाटकांतील, परंतु त्यांच्यांतील नरहराचार्य म्हणून एक न्याकरणशास्त्रांत उत्तम पंडित होते त्यांस शाहू छत्रपतींनी आश्रय देऊन बाह क्षेत्रांत आणलें; ब तेव्हांपासून ते सवे बाजूनी दक्षिणी बनले, या घराण्यांत व्याकरणशास्त्राचें अध्ययन अध्यापन परवापर्यंत चाल होतें. ऐनापुरे, वळे वगेरे घराणी अगदी अलीकडची आहेत. परंतु यांच्या घराण्यांत भिकाचार्य ऐनापुरे व जनार्दनाचार्य वळे हे उत्तम वेय्याकरण होते.
पुणें शहरी थत्ते यांचें घराणें फार नामांकित असे. सदाशिवदास्त्री थत्ते यांचें पांडित्य कांहीं अद्वितीय होतें. यांचे विद्यार्थी राघवेंद्राचार्य गर्जेद्र- गडकर, कुप्पाशासत्रीबोवा द्रवीड, मोरुशास््री साठे इ. इ. मोठमोर्ठी नामांकित विद्दद्रत्ने होऊन गेलीं. थत्तेशार्खांबाबांच्या तार्डांचे विद्वान् महाराष्ट्रांत कोणी नव्हतेच म्हटलें तरी चालेल, व्याकरणांतील प्रसिदध
महाराष्ट्रांतील कांहीं पंडित घराणीं ५५५
पंडित नागोजीभट्ट यांचे ग्रेथ याच शास्त्रीबोवांनी महाराष्ट्रांत प्रचलित केले व ते अद्याप चालू आहेत. महाराष्ट्रांत व्याकरणावैद्रेचें जे ऊर्जेत स्वरूप आहे त्यास हे शास्त्रीबोवाच मुख्य कारण आहेत. हे सर्व शास्त्रांत प्रवीण असत, परंतु यांचा भर ब्याकरणावर विदोष असे, षुण्यांतील भटांचे घराणेंही व्याकरणशास्त्रांत प्रवीण म्हणुन प्रसिद्ध असे, यांचें व्याकरणशास्त्रांत ग्रेथ आहेत. यांच्या घराण्यांतील पुढची मंडळी ग्वाल्हेर, इंदूर वगैरेकडे गेली ब तेथे त्यांनी लौकिक मिळविला. पंढरपूर क्षेत्रांत कृष्णाचार्य पंढरपूरकर विठ्ठलोपाध्ये हे उत्तम पंडित असून सर्वमान्य असत. विठ्ठलोपाध्यांचे बंधू बाबापाथ्ये यांनीं धर्मशास्त्रांत : घर्मर्सिंधू ' म्हणून आपल्या बंधूच्या साहाय्यानें ग्रंथ लिहिला. तो हल्ली सवेमान्य असा झालेला आहे. नाशिक क्षेत्रांत मोडक, फडक, गर्गे ही घराणीं विद्वानांची म्हणून प्रसिद्ध आहेत. यांत मोडक हे साहित्य- शास्त्रांत प्रविण असून पुढील दोन्ही घराणीं व्याकरणशास्त्राविषयीं प्रसिद्ध आहेत. विदोषतः मोडक हे साहित्यशास्त्रावरील ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध आहेत. नागपुरांत सदाशिवशास्त्री घुले, भट्टजी शास्त्री घाटे वगेरे मंडळी व्याकरणशास्त्रांत प्रतिभासंपन्न असत. सदाशिवशास्त्री घुले यांसही वेय्याकरणकेसरी म्हणत असत. यांची परिभाषेंदुशेखरावर उत्तम टीका आहे.
श्रीक्षेत्र कऱ्हाड येथे शास्त्री पंडितांचा जरी विशेष भरणा दिसून येत नाहीं, तथापि तेथे सरस कवि म्हणून नांवाजलेळे विठोबा अण्णा दफ्तरदार उदयास आले. अण्णांची संस्कृत ब प्राकृत पर्द्य हीं महा- राष्ट्रांतील हरिदासांना, कथेत चमत्कृति उत्पन्न करून भोतुवगास प्रमु- दित करण्याची साधनेंच झाली आहेत. यांचा सुर्ोकलाघव ग्रथ प्रसिद्ध आहे. अण्णांचे बक्तृत्वहि चांगलें असे असें म्हणतात. गोपाळा- चार्य अण्णा कऱ्हाडकर हेही कऱ्हाडचेच राहणारे, यांचा विद्याभ्यास
५६ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
इतर ठिकाणी झाला व यांचें आयुष्यही सर्व ग्वाल्हेरीस शिंद्यांचे आश्रित म्हणून गेले. तथापि हे मूळचे कऱ्हाडचे राहणारे म्हणून या क्षेत्रास मान आहे, हे अधुनिक मंडळांत प्राचीन रीतीचे पडित म्हणून नांवाजलेले होते. यांची व्याकरणशास्त्रांत उपार्स्थाते फार तीव्र असे, पण इतर शास्त्रांतील प्रभेयेंही यांस अवगत होतीं. श्रीशेत्र माहुली येथे कुंभारे, गोडबोले वगेरे घराणीं विद्वान् म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु प्रस्तुत काळीं रामशास्त्रीबरोबा गोडबोले यांशिवाय कोणी पंडित म्हणून प्रसिद्ध नाहीं. येथील प्रभुणे यांचे घराण्यास मोठा मान आहे. पेशव्यांच्या दरबारचे रामशास्त्रीबोवा प्रभुणे हे येथील राहणारे होते. यांची विद्वत्ता व लौकिक इहातिहासज्ञांस अवगत आहेच. याक्षिवाय सुरतचे भट्ट यज्ञेश्रर दीक्षित, मुंबई येथील प्रसिद्ध विद्वान् राजारामशास्त्री बोडस झळकाकर वगैरे कांहीं मंडळी प्रसिद्धच आहेत, प्राचीन तऱ्हेने विद्या संपादन करून आपल्या बुद्धिमत्तेने अवाचीन विद्यत ज्यांनी लौकिक संपादन केला अशा मंडळात प्रमुखत्वानें कृष्णशास्त्री चिपळूणकरांची गणना होते. यांनीं मोरशास्त्री साठे यांजपार्शी न्यायशास्त्रारचे अध्ययन करून नंतर पुढें इंग्रजी विद्येचा व्यासंग कला, आधुनिक विद्वानांस शास्त्रीबोबांच्या पांडि- त्याची ओळख करून देण्यास आमची अपेक्षा नाहीं, त्यांचे ग्रंथ त्यांची योग्यता सर्वांच्या प्रत्ययास आणून देत आहेत.
असो; हें विद्वत्तपंण संपावेतांना एक गोष्ट सांगितली पाहिजे ती ही काँ, हिंदुस्थानच्या सर्वच भागांत सर्वेच शास्त्रांचे सारखेंच अध्ययन होत आलें आहे असें नाही. अनेक कारणांमुळे दरएक प्रांतांत विशिष्ट शास्त्राचीच परंपरा मुख्यतः प्रचलित असलेली आढळून ते. इतर शास्त्रांचा सर्वस्वी लोपच असतो असा प्रकार नाही, पण त्यांतल्यात्यांत आवड-निवड, आदर-अनादर, मुख्य-गौण असा विवेक दिसून आल्याशिवाय रहात नाहीं. या दृष्टीनें पाहतां असें आढळेल काँ, बंगा-
महाराष्ट्रांतील कांद्दी पंडित घराणीं ५७
ल्याकडे न्याशास्त्राच्या अध्ययनाला प्राधान्य असे. महाराष्ट्राला व्याक- रणशास्त्र फार प्रिय आहे, पण त्याजबरोबर वेदांताचेंही अध्ययन असते. कर्नाटकांत न्याय व देतवेदांत विशेष भक्तीने पढला जातो; मद्रासेकडे श्रौत व अद्वेत वेदांत विशेष प्रचलित आहे. तेलंगणाकडे श्रौत ब वेद- पठण याजवर फार भर असतो. आणि जयपूर, कार८ॉ[र वगैरेकडे सा हित्य- शास्त्राचे अध्ययन जितडे होतें तितके दुसऱ्या कोणत्याहि प्रांतांत होत नसे, खुद्द कःशीस मात्र सर्व शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन होत असे; आणि या ठिकाणीं मात्र प्रत्येक शास्त्रांतील पंडितांच्या परंपरेचा सुगावा लागतो. असो; अशा रीतीनें या दोन लेखांत पंडितपरपसरेचें जे थोडेस दिग्दशेन केळ आहे, त्याच्या योगानें जुन्या पंडितगिरींतील नमुनेदार पंडितरत्नांची आपणांस आठवण होऊन त्यांचें तेज व त्यांची कोर्ति ही आधुनिक पद्धतीनें शिकलेल्या विद्वानांच्या बरोबरीची होती हें लक्षांत येईल, आजच्या काळीं राम मोहइनराय, भांडारकर, तेलंग, टिळक, अशा नांवांना विद्वत्तेच्या दृष्टीने जो मान आहे तोच मान पूर्वकाळीं आम्हीं वर दिलेल्या कांहीं कांही नांबांना होता; एवढेंच नव्हे तर आपल्या ग्रंथकर्तुत्वाच्या योगानें त्यांनीं आपली मान्यता केवळ दंतकथा- मिश्रित कीतीवर अवडबून न ठेवतां, वाटेल त्या काळीं वाटेल त्यानें आपल्या कृतीच परीक्षण करून ती कसास लावून पहावी अशा अढळ- पदादर ती बसविली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
संस्कृत विद्या व राजाश्रय
जुन्या संस्कृत पंडितगिरीच्या परंपरेसंबंधानें जी माहिती आम्ही पूर्वी एक दोन लेखांत दिली ती पुष्कळ लोकांस पसंत पडली, असे आम्हांस आलेल्या अनेक पत्रांवरून दिसून आलें. आम्ही दिलेल्या माहि- तींत भर टाकण्याच्या हेतूनें कित्येक सद्ग्हस्थांनीं या विषयावर आम्हांस पत्रे लिहिलीं. आम्ही स्वतः दिलेली माहिती अगर वरील पत्रांतून आलेली माहिती एवढ्याने या विषयास पूर्णता आली असें आम्हांस वाटत नाहीं. तथापि, या लेखांनी जुन्या पंडितगिरीच्या संबंधानें माहिती कां व कशी गोळा करावी याची दिशा वाचकांस समजल्यास आमचा हेतू एका दृष्टीनें तरी पूर्ण झाल्याचें आम्हांस समाधान वाटेल. पण हद्दी माहिती कितीही मनोरंजक व उपयुक्त असली तरी प्रस्तुत ठेखमालेतील विषयाचे तें केवळ रक अंग होय, हें विसरतां कामा नये. मुख्य विषय म्हटला म्हणजे असा कीं, संस्कृत विद्या सर्वस्वी बुडण्याच्या बेतांत एक वेळ आली होती, परतु लवकरच तदिरुद्ध प्रतिक्रिया होऊन हल्ली अनेक अंगांनी तिचें पुनरुज्जीवन होऊं लागलें आहे; सुदेवानें खुद्द सरकारासाहि हे पुनरुज्जीवन व्हावें असं वाटूं लागून, गत वर्षी सिमला येथें कान्फरन्स भरवून या इष्ट गोष्टींचा सरकारनें उपक्रमाहे केला आहे. तरी हा सरकारचा प्रयत्न ब लोकांचा इष्ट हेतू कोणत्या मार्गानें अधिक सिद्ध होईल याचा विचार केला पाहिजे. जुन्या विद्येचे पुनरुज्जीवन होण्यास मुख्य दोन मार्ग दिसतात. एक सरकार ब धनिक लोक यांनीं द्र्यद्वारा उत्तेजन देणें; आणि दुसरा म्हटला म्हणजे, विद्येच्याच अभि- रुर्चानें स्वतः लोकांनीं उद्योग करणें. यांभेकीं जुनी विद्या ब राजाश्रय यांच्या संबंधाचा थोडक्यांत विचार करून नंतर खासगी रीतीने झालेल्या ब होणाऱ्या प्रयत्नांचा विचार करण्याकडे आम्ही वळणार आहों.
संस्कृत विद्या व राजाश्रय ५९.
संस्कृत विद्येचा व जुन्या पंडितगिर्रीचा ऱ्हास झाला या गोष्टीविषर्यी खेद प्रदर्शित करणें सोपें आहे. पण तिच्या पुनरुज्जीवनास लागणारी खरी मदत करणें हें कोणाही खासगी व्यक्तीस फारसे शक्य नाहीं. आतां कोणतीही विद्या जाग्रत राहण्यास केवळ विद्रेकरितां म्हणून निरपेक्ष विद्याभ्यास करणारे विद्यार्थी- आजन्म ' विद्यार्थी ' राहणारे विद्यार्थी- हवेतच; आणे तसे लोक नसतील तर केवळ पैशाच्या जोरावर कोण- ताही विद्या जिवंत ठेवतां येणें शक्य नाहीं. पण मनानें विद्यार्जन करणें हाच जीविताचा मुख्य हेतु मानणाऱ्या लोकांतही केवळ संन्यासवृत्तीने जन्म घालविणारे मठवासी ब्रह्मचारी कोणत्याही समाजांत फारसे मिळणें कठीण, अर्थात् विद्याविषयक असा मुख्य व्यवसाय करणारासही संसार चालण्यास कांहीं तरी साधन लागतें, व हें साधन धनिक लोक-विदोषतः राजे लोक-जितके देऊं शकतात तितकें साघारण जनसमाज कसा देणार ! हल्लीं ग्रेथकारांचे ग्रंथ विकत घेऊन लोक विद्येस आश्रय देतात, तसा पूर्वी दक्षिणा देऊन ब शिष्टसंभावना करून देण्यांत येई. पण राजाश्रयाची गोष्ट म्हणून कांहीं वेगळीच आहे. “' बाणीतुष्टी पिष्ट- मुर्टें ददाति । राजा तुटे प्राममेक ददाति ॥ ” अक्ली जी अधे खेड- वळ म्हण आहे ती अगदी खरी. खासगी व्यक्ति देऊन किती देणार ! तें एका तळहातानें दिळें आणि दुसऱ्या तळहातानें खचले. तो कांही जिवंत झरा नव्हे, राजे लोकांच्या देणग्या मात्र जिवंत झऱ्यासारख्या असतात; व एकाच कुळांत पिढ्यानुपिढ्यापर्यंत पंडितगिर्राची परंपरा बुन्या काळीं जी दिसून येत असे, तिचें कांही अर्शी कारण हंच होय. भोजराजाच्या दरबारी येणारे कावि व पंडित प्रत्येक अक्षरागणक एक एक लक्ष रुपये देणगीदाखल घेऊन जात हं वर्णन निखालख आति- शयाक्तीरचे हें तर उघडच आहे. पण जुने राजे गांबर्चा गांबें इनाम देत असत, व त्या इनामांच्या जिवावर विद्वानू लोक पिढ्यानुपिढ्या पोसले
९० संस्कृत विद्येच पुनरुज्जीवन
लाऊन एकाच घराण्यांत विद्येची परंपरा चालण्यास मदत होई ह निर्वि- वाद आहे. त्या मानानें पाहतां हल्लीं पोवांत्य विद्येला “ राजाश्रय म्हणून काडीचाही नाही.
हिंदुस्थानाला हीं राजा आहे पण राजदरबार नाही. गव्हर्नर जन- रल हे राजप्रतिनिधे खरे; पण त्यांना स्वतःला तनखा असतो तोच फार मर्यादित. त्यांनाही राजचिन्हें म्हणून असतात, पण तीं जवळ जबळ बेगडी, राजदरबाराचा म्हणून प्रजेला जो एक प्रकारचा ओलावा मिळावयाचा तो नाही. राजदरबारी म्हणून राजप्रतिनिर्घाचा व लोकांचा जो काय लेव्हीच्या-घूळमेर्टाच्या-दिवशीं हस्तस्पर्श होईल तेवढाच; ब * गार्डनपार्टी ? सारख्या एखाद्या प्रसंगी दरबारभूमीच्या चतुष्कोनांत चहाबिस्किटें किंवा केळ्यापेरूंच्या डेखांचे काय उच्छिष्ट सांडेल तेवढेंच, फार काय, असंही म्हणतां येईल की गव्हर्नर जनरल यांचे भालदारचोपदार व शिपाई हे लोकांकडून “ पोस्त व बक्षीस यांच्या रूपानें सरसालांत जितके रुपये मिळवितात तितके रुपये पौर्वात्य मौलवी, पंडित किंवा विद्यार्थी, भिक्षुक, फकीरफुकरा यांस खुद्द गव्हर्न- मॅट हाऊसमधुन मिळत नसतील ! खरें म्हटलें तर दरबारी रीतीला शोभण्याला सरकारानें अनेक धर्मानुसार दिवस वगेरे ठरवून दरबारांतून मधून मधून दक्षिणा व देणग्या द्यावयास पाहिजेत. राजा हा देवाचा अंद व गव्इर्नर-गव्हर्नर जनरल हे राजांश, अशा परंपरेने हंदुस्थानां. तल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंगी हिंदुस्थानांतल्या देवता अवतरलेल्या असतात; आणि दरबारसारख्या व लेव्हींच्या प्रसंगीं ह राजांश जेव्हां आपापली बहुमानाची वसते परिधान करून येतात, तेव्हां हिंदी लोक- क्ॅनिदान भाबिक लोक-ऱ्यांच्या ठिकाणीं आपापल्या आराध्य देवतेचे रूप कल्पित असतील अशी उतलेक्षा केल्यास ती सरकारास आजकाल नापसंत इहोईल असे म्हणवत नाहीं. आतां राजा ब प्रजा यांचे धम विसंगत
संस्कृत विद्या व राजाश्रय ६१
आहेत, व खुद्द प्रजाजनांतही एकच घर्म नाहीं, अनेक आहेत हं खर. तथापि, “ नाविष्णुः एथिवीपातिः ? या वचनाची आठवण वब ध्यास हल्लींच्या स्थितीतही हिंदुस्थानांतील लाकांर्नी करावा, अशी सरकाराची इच्छा दिसते. आणि एकाच शार्रारांत कोणा हिंदूला गणपतीच्या शुंडेचा अंगुष्ठ, तर कोणास खिस्ताच्या क्रूसाचें टॉक, तर कोणास अधेचंद्राची कोर दिसल्यास, या काल्पनिक स्वरूपभेदाचा आरोप आपणांवर झाल्यास तो सोसण्याला अधिकारी आनंदाने तयार होतील. पण एवढ्याने भागत नाहीं. पूर्वपद्धतीप्रमाणें त्यांनीं प्रजाजनांतील विद्येचा व घार्मिकपणाचा सत्कारही केला पाहिओ. तीन चार धमांच्या प्रजा अमलाखालों अस- ल्याचा जर अभिमान वाटतो, तर तीन चार धर्मातील लोकासंतंधानें त्यांच्या त्यांच्या धर्मरिवाजाप्रमाणें दानधर्म, सत्कार, संभावना सरकारानें करावयास नको काय ? मुसलमान पातशहा वेळीं देंवळें व मूत फोडीत; पण वेळीं गांबचे गांव नवीन इनामही देत. इंग्रज सरकार देवळांचा विध्वंस करीत नाहींत हा त्यांच्या मनाचा थोरपणा आहेच. पण नि:पक्ष” पातीपणाच्या थोर वैभवास प्रत्यक्ष हात-मिजत्या ओदार्याची जोड मिळणे जरूर आहे. जुन्या राजघान्या सजीव करण्यांत मुत्सद्दींगिरी आहे असें सरकारास वाटतें, तर जुन्या विद्या सजीव व सतेज करण्यांतही तर्शाच मुत्सद्दीगिरी आहे असे कां वाटूं नये ! पोर्बात्य विद्या व खिस्तबाह्य घर्म यांची गुंतागुंत आहे, सबब जुन्या विद्येस जं उत्तेजन दिलं तंच खिस्त- बाह्य धर्मास दिलें असें सकृतूद शनी वाटण्यासारखें आहे खरे. पण हिंदी प्रजेच्या दृष्टीने राजसाहेबांच्या व तत्प्रतिनिधींच्या ठिकाणी विष्णुत्व येण्यास त्यांनीं प्रजेच्या दृष्टीनेच धर्माकडे पाहिले पाहिजे. “आम्ही धमाने खिस्ताभिमानी असलों तरी तुम्ही मात्र आम्हांस विष्णूचा अवतार मानलें पाहिजे; प्रजाबात्सल्याच्या पार्यी आम्ही खिस्ती धर्म सोडून देण्यास तयार नाही; ” असें सरकारचे म्हणणें असेल तर तें आम्हांस मान्य आहे.
र्र संस्कृत विचेचें पुनरुज्जीवन
त्यांनी आपला स्वतःचा ब प्रजाजनांचा धर्म यांना फक्त समसमान लेखा- बयास तयार असावें इतकेही आम्हांस चालेल, गव्हनर, गव्हर्नर जनरल हे सरकारी देवळांतून अधिकृत धमोंपदेशकांच्या प्राथनेस व उपासनेस जातात, त्याप्रमाणें त्यांना हिंदी देवाल्यें ब मशिदी यांतून प्रार्थनेस जातां येणार नाहीं ह॑ं खरं. तथापि, रविवारी खिस्ती देवळांतुन भिक्षा घातली जाते त्याप्रमाणें हिंदु व मुसलमानी धर्माच्या विशिष्ट सणावार्री सरकाराने आपले प्रतिनिधि पाठवन धर्मभिक्षा वाढविली तर त्यांचा स्वतःचा घर्म न बुडता प्रजाघर्मसंगोपनाचें भ्रेय खचित मिळेल ! गव्हर्नर, गव्हर्नर जन- रल यांनी नित्य प्रातःकाळीं गव्हर्नमेंट होसमध्यें हातांत पंळीपंचपात्री बेऊन गोप्रदान सोडून मग चहा पिण्यास किंबा छोट्या हजिरीस बसावं, असे आमचें म्हणणे नाहीं. कारण ते असें करू लागतील तर बकर-ईंदच्या दिवर्शी गोप्रदान केल्याबरोबर लगेच कुरबानीचा गोव- घही त्याच हातानें त्यांना करावा लागेल, हे आम्हास उघड उघड दिसतं ! सरकार धघर्माकरितां गोरक्षण करण्यास किंवा घर्माकरितां गोवधहि कर- ण्यास तयार नाहीं; व त्यांच्या घर्मनिःपक्षपातित्वाची ।केंबा धर्मताटस्थ्याची साक्ष देण्यास ही गोष्ट फारच उपयोगी आहे यांत शंका नाही. पण खुद्द गव्हनरप्राहेबांनी रोज आपल्या हातानें गोप्रदान सोडलें नाहीं तरी त्यांच्या ' आज्ञे * नें एकाद्या राजमान्य हिंदु घर्ममंदिरांत किंवा देवळांत शिंदु अधिकाऱ्यांच्या हातून हिंदु शास्त्री-पंडितांस दक्षिणा किंवा शाल- जोडी देण्यांत यावी अशी अपेक्षा करण्यांत वावगे काय ! जे हिंदुधर्मा- संबंधानें तेंच मुसलमानी धमासंबंधानें. हिंदु देवळांत खिस्ती लोकांचा भ्रवेश होण्यास अडचण तरी पडेल, मुसलमानांच्या मशिदींत खिस्ती लोकांस जाण्यास तितको अडचणही पडणार नाहीं, अस आम्हांस वाटतें. थण त्या कार्मी सरकारच्या मनांतच असेल तर सवलतीचा दुसराही एक मार्ग आहे. हिंदु व मुसलमानी धर्माला म्हणून जी मदत सरकारास
संस्कृत विद्या व राजाश्रय -ैः
प्रत्यक्ष करतां येणार नाहीं, ती संस्कृत व मुसलमानी विद्रेस “म्हणून त्यांना अप्रत्यक्ष करितां येण्यासारखी आहे; व खिस्ती धर्मानुयायांच्या हातून भिजलेली दक्षिणा हातावर घेण्यास जरी एखादा ब्राम्हण माघार घेईल, तरी कोरडी दक्षिणा, शालजोडी, किंवा ग्रंथछपाईच्या बिलाबद्दल बक्षिसे देण्याकरितां व लायबऱर््यांकारेतां सरकारांत विकत घेतलेल्या पुस्तकांच्या किंमतीबद्दल एखादा कागदी चेक किंवा तेल-कागदाच्या नोटांचे तुकडे दिल्यास तो ते टाकून देईल असें नाहीं !
धार्मिक बाबतींत सरकार तात्त्विकदृष्टया निःपक्षपाती असतांहि निर्रानरा- ळ्या धमास हस्त परहस्तं सरकाराकडून काय मदत हल्लीं पोंहोंचत आहे हें जातां जातां लक्षांत ठेवण्यासारखे आहे. मुंबई इलाख्यापुरतं पाहिले तर असं दिसून येतें की १९११-१२ साली 11९016818811281] म्हणजे खिस्ती घर्मखातीं सरकारचा खर्च सुमारें ३॥ लक्ष रुपये होणार होता. या ३॥ लक्षांत प्रत्यक्ष धार्मिक विधीकरितां अश्शी जरी एक पेही नाहीं तरी बिदाष, आर्चडीकन चेपलेन, छर्जिमेन, वगैरे भटजी-मंडळाच्या पगाराकरितां सुमारें तीन लक्ष रुपये खर्च पडतात; व अदमासे पन्नास हजार रुपये, खिस्ती देवळे, अधिकारी बिशपचा दोरा, वगैरसंबंधीं खर्च पडतात. इंग्रज सरकाराचा खास असा एक धघमपंथ आहे व त्यासच राजमान्यता आहे. या पंथाच्या धर्भमडळावर सर्वात जास्त पगार खर्च पडतो, पण चर्च ऑफ स्कॉटलंड, रोमन क््याथोलिक चचे वगेरे अराजमान्य खिस्तीधर्म- मंडळावरही पन्नास साठ हजार रुपये खच होतात, हें लक्षांत ठेवण्यासारखे आहे ! दुसरे पक्षी शिंदु धमांगभूत देवस्थाने, वषांसनें, दानधर्म व ग्रंथो- ततेजन वगैरे गोष्टींवर त्या सालीं फार तर ३। लक्ष रुपये खर्च होणार होता. यांपैकी देवस्थानांच्या खा्तींच बहुतेक म्हणजे २॥ लक्ष रुपये खची पड- तात. पर्वती संस्थान १७) हजार रु., त्र्यबकेथर ११॥ इजार रु. हीं मोठी देवस्थाने व पांच हजारां खालचो किरकोळ देवस्थाने व मशिदी
६४ संस्कृत विद्येर्चे पुनरुज्जीवन
सुमारे २-२। लक्षांचीं अशी आहेत, पण हीं सर्वे देवस्थाने जुनीं म्हणजे पेशव्यांचे वेळेषासनची आहेत. नवीन देवस्थान असें इंग्रज सरकारानें निर्माण केलेलें आढळत नाहीं. वर्षासने हींच काय तीं जुन्या वियेच्या प्रसा” रार्थ अर्शी समजावयार्ची, यांचा एकंदर सालिना आकार सुमारें सत्तर हजार रुपये आहे. पेकी १६॥१७ हजार रु. दक्षिणाफंडांतून ठेवलेल्या निरनिराळ्या कॉलेजांतील “' फेलोशिप्स ” ला जातात, पण ही रक्कम जुन्या विद्येच्या उत्तेजनार्थ असें थोडेच म्हणतां येईल ! ज्योतिर्वेधशाळेस खर्च पडणारेहि तीन हजार रुपये याच सदराखालीं येतात ! पण या वेधशाळेत जुन्या ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांचे एखादे फाटक पानही सांपडावयाचें नाही ! के. दोकर बाळकृष्ण दीक्षितांसारखा गणिती व ज्योतिर्विद-आरय ज्योतिष- शास्त्राचा इतिहासकार-पण सरकारी टेनिंग कालेजांत पोरें पढवितां पढवितां त्यांचा जन्म गेला व ७५ रुपयांवर त्यांचा पगार वाढला नाहीं! हं जुन्या पंडितगिरीस उत्तेजन ! ड!यरेक्टर आफ पब्लिक इन्स्टूकूशन यांच्या मार्फत ग्रंथोत्तेजनावर खर्चिल्या जाणाऱ्या १३॥ शे रुपयांच्या रकमेचा यांतच अतर्भाव होतो. पण हे अ्रंथ प्रायः मराठी असतात आणि त्यांतील विषयही आधुनिक व केवळ शालोपयोगी असेच असतात. जुन्या विव्रेस उत्तेजन असें त्यांपासून क्ाचितूच मिळते, ब्राह्मणास दक्षिणा या विशिष्ट सदरा- खालीं त्या सालच्या मुंबईच्या बजेटांत फक्त चाळीस रुपयांची नोंद आहे! याशिवाय नाहीं म्हणावयास ' शास्त्रीय शोध? वगेरेंच्या १०॥ लक्ष रु. खर्चाच्या खात्यांत जुने कागदपत्र वगैरे विकत घेऊन सुरक्षित ठेवण्याच्या कामाकरितां ३ हजार रुपयांची एक रक्कम आढळते. सर्व हिंदुस्थाना- करितां म्हणून असणाऱ्या पुराणवस्तुसंशोधनाच्या खात्याकडेही सालीना कांहीं हजार रुपये खच असतो, व त्यांतला कांहीं भाग मुंबई इलाख्या- कडे येतो. पण हा खर्च बहुतेक पुराणवस्तुसंशोधनाकडे होतो; जुन्या पंडितगिरीकडे म्हणजे विद्येचे परंपरानुसार संरक्षण करणाऱ्या विद्वान्
पुनरुज्जीवनाचा एक मार्ग ५
लोकांस उत्तेजन देण्याकडे होतो, असें नाहीं. सारांश, पेशाच्या दृष्टीनं पौर्बात्य विथेस उत्तेजन देऊन ती जाग्रत ठेवण्याचा विद्यमान प्रकार हा असा आहे. आतां सिमला कॉन्फरन्सनें सुचविलेल्या योजनेनें ही स्थिति कितपत सुघारेल याचा विचार करू.
पुनरुज्ीवनाचा एक मागे
सिमला कान्फरन्समरध्ये जमलेल्या बहुतेक लोकांस जुन्या पंडितांविषर्यी आदरबुद्धि होती हे स्पष्ट दिसून येतं. परंतु जुनी पंडितपरंपरा कायम ठेवण्याविषयीं योग्य उपाय असे फार थोडे सुचविण्यांत आले असे आम्हांस वाटतं. निदान पंडितांस उत्तेजन येण्याकरितां द्रव्यदृष्टया ज्या मार्गाचे अवलंबन करणें जरूर आहे ते कोणीं फारसे सुचविले नाहींत. : ओरिएंटल इन्स्टिटयूट स्थापण्यानें संस्कृत बिचेच्या संशोधनास मदत होईल, नाहीं असें नाही. परतु त्या संस्थेतील शिक्षणाचा सर्व क्रम पाश्चात्य विद्यापद्धतीच्या धोरणावरच बहुधा राहील. हें धोरण डॉ. भांडारकर यांच्या आधींच लक्षांत येऊन त्यांनीं “ होतां होईतो सदर संस्था हिंदी विद्यार्थ्याकरितांच अस्तित्वांत आहे असे समजावें व परदेशीय विद्याथ्यांना तींत बिनखर्ची शिक्षण मिळूं नये ” असा आग्रह. धरला तो बरोबर होता. पण या संस्थेत बहुतेक मुख्य प्रोफेसर इंग्रज किंवा युरोपियनच नेमिले जातीळ अशी भीति वाटते; ब मुख्याध्यापकासंबंधाने तर तो युरोपियनच असावा, .असें डा. भांडारकर यांनीं जें आपलें मत दिलें आाहे त॑ आम्हांस पसंत नाही. युरोपियन संश्योधनपद्धति आमच्या पद्धतीहून अधिक चांगली असेल, त्याबद्दल आमचें कांहीं एक म्हणणें नाहीं. पण ती पद्धति शिकून तयार झालेला व
£ ओरिणऐ्ंटल इन्स्टिटयूट ' चा अध्यक्ष होण्यास लायख असा हिंदी ग्हस्थ षु
६६ संस्कृत विचेचें पुनरुज्जीवन
मिळणारच नाहीं, असं मात्र आम्हांस वाटत नाहीं, जरुरीपुरता युरोपियन शिक्षक आणून त्याजपासन जी कायपद्धत असेल ती शिकून, पुढें त्या युरो- पयन शिक्षकाच्या शिकवणीचे काम नाहीं म्हणून त्यास परत पाठविल्याची उदाहरणें जपानच्या विद्येच्या एनरुज्जीवनाच्या हतिहासांत आढळतात; व ताच गोष्ट आम्हीं मनांत आणल्यास आम्हांस इकडेही कांही अशक्य नाहीं, पण सिमल्यास झालेल्या ' ओरिएंटल इन्स्टिटयूट च्या रचनेत मुख्य अध्यक्ष ब प्रोफेसर हे युरोपियनच असावे व उपशिक्षक हे मात्र देशी लोक असावे असा लेखी निजरध घातल्यासारखा दिसतो, तो पाहून स्वाभिमानी बाचकांस कसेसेच वाटेल; किंबहुना हिंदी लोकांवर अशा रीतीनें मारलेला कायमचा नालायखीचा छाप पाहून वाईटही वाटल्या- शिबाय रहात नाही. युरोपियन प्रोफेसर म्हटला म्हणजे त्याचा पगार हिंदी प्रोफेसराच्या पांचपट सहापट असावयाचा हें ठरलेले ! सरकारी शाळा- खात्यांत, म्हणजे भेथं राजकीय घोरण प्रभावी असतं, तेथें अशा गोष्टी- असले पंक्तिप्रपच-असावे हें ठीकच आहे. पण ज्या संस्थेची मूळ कल्पना केवळ विद्येच्या पुनरुज्जीबनासंञधाची आहे, म्हणजे जेथे कवळ विद्येलाच मान मिळावा-जातिभेद लक्षांत येऊ नये-तेथंही सरकारी शिक्षणखात्या- चेच धोरण प्रभावी झाल्यास तें एक नवेच विषादकारण उत्पन्न होईल असं आम्हांस वाटते, ठायखीप्रमाणें जो इसम मिळेल त्यास जागेचा ठराविक पगारही मिळावा, आणि युरोपियन व देशी असा भेद ल्यांत होऊं नये, हेंच सरळ व न्यायाचे आहे.
युरोपियन संस्कृतज्ञांबद्दल आम्हांला आदरबुद्धि वाटत नाहीं असें मुळींच नाहीं. उलट आग्हांस त्यांजबद्दळ विदोष आदर वाटतो; पण युरोपियन म्हटला कीं तो महापॉडितच असणार व त्याला देशी संस्कृतज्ञा- वेक्षां अधिक पगार दिलाच पाहिजे असं मात्र नाही, फरक आहे तो हतकाच आहे. पण सरकारी मापाने मोजतांना हा फरक लक्षांत घेतला
पुनरुज्जीवनाचा एक मार्ग १७
जात नाही ही दुःखाची गोष्ट होय. या मापानें मोजण्याची वेळ आली कीं मक््समुलर व पीटरसन दोबेही एकाच योग्यतेचे भरणार ब दोघांना पगार सारखाच मिळणार ! निदान कोणाही देशी संस्कतज्ञापेक्षां त्या दोघांनाही अधिक पगार मिळणार, येवढे त्यांच्यांतळे साधर्म्य केव्हांही रहाणारच ! षुन्या पंडितांची महती वर्णन करितांना युरोपियन लोकांनाही केव्हां केव्हां उदारपणाची उकळी थेते हें आम्हांस माहीत आहे, पण आपणा स्वतःपेक्षा एकाद्या जुन्या देशी विद्ठानू पंडितास आधिक पगार द्यावा, अश्ी कोणाही उदार युरोपियन संस्कृतज्ञानं आजवर शिफारस केल्याचें आमच्या एाकेबांत नाहीं, हा चमत्कार नव्हे काय! आमचे सेर्ल्बांसाहेब-माजी डायरे- क्टर आफ पब्लिक इन्स्ट्रक्ाशान-हे मोठे तत्त्ववेत्ते होते; व केवळ “' निर्वि- कार युक्तिवाद ” म्हणुन एखाद्या तत्त्ववेत्याच्या ऐेर्टानें ते उघड प्रतिपादन करीत कीं, नेटिवांची राहणीच थोड्या खचाची; सबब नेटिवांना युरोपि- यनाच्या जागेवर नेमून त्यांजकडून युरोपियन प्रोफेसराचें काम घेतां येत असलं तरीही त्याला युरोपियनाच्या दोनतृतीयांश पगार देण्यांत कांहींच अन्याय नाहीं, पण हा याक्तवाद आम्हांस मुळांच पटत नाही. अमुक एका जागेचा पगार इतका असावा असें ठरल्यावर तो कमी खर्च करणाऱ्या नेटिवाला मिळाला तरी सरकारचं त्यांत काय गेल ! युरोपियन प्रोफेसर आधिक पगार घेऊन अधिक खच करणार, आणि नेटिवास पगार कमी पण त्याचा खर्चही कमी असतो; मिळून दोघांची शिल्लक बचत सारखीच पडणार; या य॒क्तिवादांत कांहीं अर्थ नाहीं. कोणाची शिल्लक किती पडेल या दृष्टीने सरकार जागांचे पगार ठरवीत नाहो; तर अमुक एका जाग्याचे काम किती महत्त्वाचे व ते काम करणाऱ्या माणसास किती पगार द्यावा लागेल किंवा देणें बरें दिसेल या दृष्टींनंच त ते ठरविते, असं आहे तर नेटिवानें जास्त पगार मिळवून त्यानें ज्यास्त शिल्लक टाकल्यास त्यांत कोणाचें काय गेलें १ अमुक एका दर्जाच्या अधिकाऱ्याने अमुक एका
९८ संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन
पदतीनें राहणी ठेवली पाहिजे, इतका निर्बेध फार तर सार्वजनिक युक्ता- युक्ततेच्या दृष्टीनें सरकारानें घालावा, त्यास हरकत नाहीं. कचेरीत सभ्य- पणाचा ब ठाकठीक पोषाख करून येणाऱ्या नेटिव्ह ग्रहस्थाच्या घरीहि प्रत्येक मनुष्याला एक एक नोकर लागत नाहीं; तो घरी कुत्री, घोर्डी ब कोंबड्यांची खुराडी ठेवीत नाहीं; किंबहुना आपल्या हातानें आपली घोतरें स्वच्छ धुतो; मंडईतून आपल्या आवडीची भाजी आपल्या हातानें घेऊन येतो; म्हणुन त्याला पगार कमी द्यावा हा न्याय कोठचा खर्चिक व बिनखर्चिक अश्या या दोन पद्धतींत अमुकच चांगळे व अमुकच वाईट असें म्हणण्याचा अधिकार सरकारास आहे, असें आम्हास वाटत नाहीं.
तर्त प्रस्तुत विषयापुरतच आपण पाहूं. सारख्य। सारख्या योग्यतेचे युरो- पियन संस्कृतश॒ व नेटिव्ह पंडित यांच्या पगारांत असा मोठा फरक राहण्याचे कारण नाहीं एवढेंच नव्हे, तर याच्याही पुढं जाऊन आम्ही असें म्हणतों की, पुष्कळ वेळां या दोघांची विद्दत्ता सारखी नसून देशी पंडि- ताचीच योग्यता निःसंदय अधिक असतांही त्या बिचाऱ्यास मात्र अत्यल्प पगार असल्याची उदाहरणें इकडे कांही. थोडथोडकी घडून आलेली नाहींत. मुंबईइलाख्यांत मार्टिन हौ, कीलहान, बुल्हर, पीटरसन वगैरे युरोपियन ग्रहस्थ संस्कृताचे प्रोफेसर होऊन गेले. यांपैकी सस्कृ- ताच्या दृष्टीनें पाहतां एकही ग्रहस्थ त्याच्या मदतीस असलेल्या पंडिता- पेक्षां श्रेष्ठ नव्हता ! असे असतां या पंडितवर्गासच काय पण डॉ. भांडारकरांसारख्या उभय-भाषाकोविद जाड्या विद्वानासही संस्कृत प्राफे- सरीचा भरपगार मिळणें अदवाक्य झालं होतं. युरोपखंडांत भांडारकरांची कर्ते पसरलेली असो; पण इकडे तिचा काय उपयोग ? सन १८८१ सालीं हा वाद वर्तमानपत्रांतत उघड रीतीने झाला होता, व त्या वेळी कै० न्यायमूर्त तेलग यांनीं “ टाइम्स आफ इंडिया ? पत्रांत निर्भयपणानें जी टीका केली होती तिची या प्रसंगी आम्हांस आठवण होते. त्या
पुनरुज्जीवनाचा एक मार्ग ९९
प्रसंगीं तेलगांनीं खालीलप्रमाणे उद्गार काढले होतेः-“* कीलहान, बुल्हर व मार्टिन हो यांची विद्वत्ता जरी बरीच होती तरी त्यांच्या संस्कृतशते- संबंधानें उगाच फार्जांल स्तोम माजविण्यांत येत आहे. कोलेजांतून काव्य, नाटक वगैरे जे ग्रंथ विद्यार्थ्यांस शिकविण्यांत येतात त्यांमध्ये, नेटिव्ह विद्याथ्याइतकीही-ते ग्रंथ मार्मिक ब रसिक रीतीनें लावण्याची- पात्रता युगेपियन प्रोफेसरांच्या अंगीं असत नाहीं, महावीरचरित ब विक्रमोर्बशीय नाटकांची इंग्रजी भाषांतरे कती तरी सदोष आढळतील ! ही नुसत्या काव्य-नारकादि ग्रंशांची गोष्ट, मग वेदांतभाष्य, सिद्धांत- मुक्तावाले, कौमुदी वगेरे गहन शास्त्रीय ग्रंथांविषयीं तर बोलावयासच नको. हे ग्रंथ ते नेटिव्ह पंडितांजवळ न शिकते तर वरील युरोपियन प्रोफेसरांस ते काळेजञांतील विद्यार्थ्यांस शिकविता आलेच नसते. पण त्या ग्रेथांत त्यांची स्वतःची परीक्षा जरी घेतली असती तरी तींत ते उत्तीणे झाले नसते, असें आम्ही पेज मारून सांगूं शकतो. बहुतेक युरोपियन प्रोफेसरांचा संस्कृताचा अभ्यास इकडे नेमणूक होऊन हिंदुस्थानांत आल्यावर देशी पंडितांजवळ पद्दूनच झालेला होता. डाक्टर बुल्हर यांना धर्मशास्त्र के, विनायकशास्त्री दिवेकर यांनींच विद्याथ्यांसारखें पढविळे, तसेंच अनंत- शास्त्री पेंढारकरांनीं डॉ. कील्हार्न यांस व्याकरण शिकवीपर्यंत तं त्यांस येत नव्हते. डा. पीटरसन यांची विद्दत्ता तर प्रसिद्धच आहे ! त्यांचे विद्यार्थी त्यांच्या चुका वगौत काढीत; मात्र त्यांचा स्वभाव गोड अस- त्यामुळें त्यांच्यासंमधानें तक्रार गेरे फारशी होत नसे. पण ध्यानांत धरण्यासारखी गोष्ट ह्री की, पीटरसनसाहेबांच्या हाताखालीं राजारामशास्त्री बोडसांसारखे जाडे शास्त्री होते; व शास्त्रीबुवा प्रोफेसरसाहेबांपेक्षां दस- पट विद्वान् असतां त्यांना पगार मात्र प्रोफेसरसाहेबांच्या एकदशांश ! तीच गोष्ट भीमाचार्य झळकीकरांची ! बरं युरोपियन पंडितांच्या अंर्गी जो विशेष गुण असतो तो-म्हणजे मार्मिक ब शोधक बुद्धि हा गुण-
७० संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
कीलहॉने व बुल्हर यांच्या अंगीं ते प्रोफेसर होऊन हिंदुस्थानांत येण्याच्या पूवी नव्हता. फार काय पण प्रोफेसरीचें काम करीत असेपयेत तो फारसा दिसूनही आला नाहीं. इकडे मोठ्या पगाराच्या स्कालरशिप- वजा मिळालेल्या प्रोफेसरीच्या जागा भोगून, व प्रोफेसरीच्या जागांवर असतांच विद्यार्थ्यांप्रमाणें हाताखालच्या पंडितांच्या हाताखालीं शिकून, युरोपांत परत गेल्यावर त्यांच्या विद्वत्तेचा खरा बिकास झाला. म्हणजे ज्या गुणांच्या आरोपावरून युरोपियन प्रोफेसरांनीं इकडे हजारों रुपयांचे पगार खाले ते गुण खरोखर त्यांच्या अंगीं तेव्हां नव्हते व या गुणांचा उपयोग त्यांच्या इकडील विद्यार्थ्यांस मुर्ळांच झाला नाहीं. डा. भांडा- रकर यांनी सिमला कान्फरन्ससंबंधानें लिहिलेल्या एका लहानशा लेखांत असेंच मत दिले आहे. ( 1.पा'00९818 10120 ४0७०1९१ उ गावा 180० 10 800९06606१ 1॥ 1800097 ७८2 टान108] 918 ९० 8॥0"0ए९2 ७७ 9 पवपा" कणाला शट फिला ७७116. ) उलटपक्षीं पंडितांसंबंधानें पहावें तर त्याच्याविषयी खुद्द युरोपियन सस्कृ- तज्ञांच्या मनांतही फार आदर आहे, असें सिमला कान्फरन्सच्या वेळीं अगर्दी उघड दिसून आलें. तेथें जमलेल्या सवोर्नी जुना पंडितवर्ग हा फार उपयुक्त असून इरप्रयत्नारने त्याचें संरक्षण झालें पाहिजे असंच कबूल केलें. डॉ. थिबू, मि. वेनिस यांनीं तर असें स्वच्छ सांगितले की, ज्या म्हणून युरोपियन विद्यार्थ्यांला मूळ संस्कृत ग्रंथांवरून संस्कृताचा अभ्यास करावयाचा असेल त्याचे पंडितांच्या मदतीशिवाय चालणारच नाहीं. डॉ. भांडारकर, प्रो. गंगानाथ जहा वगैरेनीही असाच अभिप्राय दिला आहे व यांत आश्चर्य नाहीं. कारण पंडितांच्या विद्वत्तेची किंमत त्यांना 'वांगलीच माहीत आहे.
__ अशी जर स्थिति आहे तर मग पंडितांस पगार षुष्कळ द्यावा अशी सूचना कोणी कां करू नये £ पंडिताला इंग्रजी येत नाहीं या त्याच्या
पुनरुज्जीवनाचा एक मार्ग ७१
अषराधाकरितां पगाराच्या दृष्टींन त्याला पाताळांत कां लोटावं हँ आम्हांस तरी समजत नाहीं. जी गोष्ट कालेजांतील शास्त्र्यांची तीच कांहीं अंशीं शायस्कुलांतील शास्त्र्यांचीही आहे. नुक्ताच मुंबई कायदे- कोंसिलाच्या बेठकींत ना. दादासाहेब करंर्दाकर यांनीं हायस्कुलांतील शास्त्री मंडळीच्या पगारासंबधानें एक प्रश्न विचारला होता. त्यास मुंबई सरकारानें जे उत्तर दिलें होतें, त्यावरून असें दिसते की, या शास्त्री लोकांचे पगार जास्तीत जास्ती साठ रुपयेपर्येत वाहूं हकतात ! ब तेही पंचवीस वषाची नोकरी भरण्याचे वेळीं ! शाळा खात्यांत त्यांच्याहून कमी दजाचे जे डाइंग ब पार्शीयन भाषा वगे- रेचे शिक्षक असतात त्यांना जास्तींत जास्त पगार पंचाहत्तरपर्यंत मिळूं शकतो ! व पंचाहत्तर रुपये पगाराच्या असिस्टंट डेप्युटी इन्स्पेक्टरच्या जागांवर त्यांची नेमणूक हाऊं शकते. पण संस्कृत शास्त्री लोकांना हा मान आजवर मिळालेला नाहीं व पुढेंही मिळण्याचा संभव नाहीं, असे सरकारतर्फे दिलेल्या उत्तगवरून उघड होतं. संस्कृत शास्त्री विद्वत्तेन पार्दियन टीचर व ड्रोइंग मास्तर यांच्यापेक्षा बहुधा अधिक विद्वान् असतो हें कोणीही सांग शकेल, तथापि, शास्त्री लोकांत इंग्रजी येत नाही आणि ते फक्त जुन्या पद्धतीने पाठशाळेत शिकलेले असतात, या सबबीवर त्यांच्या पगाराची मजल साठ रुपयांवर जाऊं न देणें ह न्यायाचें दिसत नार्ही.
शाळांतील ब कालेजांतील शास्त्री लोकांचे पगार थोडेस्ष बाढावल्याने संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन पूर्ण झालें, असे कोणीच म्हणूं डहाकत नाही. परतु कोणत्याहि गोष्टीचें पुनरुज्जीवन व्हावयाचें तें सवे अंगांनी व्हावें लागतें; आणि शास्त्री लोकांना मिळणारे वेतन &ं संस्कृत विद्येच्या घुनरुज्जीवनाचें एक अंग असल्यामुळें आम्हीं त्याचा या लेखांत विशेष उल्लेख केला आहे. तथापि वर स्रांगितल्याप्रमाणें संस्कृत भाषेचा अभ्यास
७२ संस्कृत विदेर्चे पुनरुज्जीवन
केलेल्या युरोपियन पंडितांविषर्यी आम्ही आदरबुद्धि बाळगली पाहिजे यांत संशय नाहीं. व असं म्हणण्याची कारणें काय याचा आतां विचार
करू,
संस्कृत विद्या आणि युरोपियन पंडित
संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनाचा सर्व बाजूंनी विचार करितांना एक महत्त्वाची गोष्ट विसरतां कामा नये. ही गोष्ट म्हटली म्हणजे युरोपियन पेडितांनीं संस्कृत भाषेचा अभ्यास व सस्कृत विद्येचे संशोधन होण्यास केलेली मदत ही होय. या मुद्याचा विचार करितांना कोणीही आपलें मन प्रथम निर्विकार केलें पाहिजे; म्हणजे केवळ रणग्र'हक बुद्धीनेंच या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रो, मॅकडानेलसारखे नाकानें वांगी सोलणारे व हिंदी पंडितांची निंदा करणारे युरोपियन ग्रहस्थ भेटले असतां त्यांचें खंडन समर्पक केलेंच पाहिजे, ब तें आपण करितोहि. परंतु अश्या तऱ्हेने आपल्या बचावासाठी उत्तरास प्रत्युत्तर देण्यास आपली तयारी असली तरी, केवळ विद्येच्या हव्यासाने आणि ज्ञानाजनाच्या गोडीने आार्यभाषा व आरयविद्या यांचा अभ्यास करून त्यांजविषयीं आमच्याही डोळ्यांस न दिसणाऱ्या अश्या कित्येक गोष्टी ज्यांनी दाखविल्या, आणि त्यांच्या संरक्षणार्थ म्हणा किंबा फेलावाकरितां म्हणा अत्यंत परिश्रमाने आम्हीं स्वतः आजतर निर्माण न केलेलीं अशीं साधनेंहि ज्यांनीं निर्माण करून ठेविली, त्यांचे गुण-केवळ गुण घेण्याच्या वेळींही-सढळ मनानें न घेणे हा कृतप्रपणाचा कळसच होय असें आम्हीं मानतो. आम्हांला जशी इंग्रजी भाषा परकी; तशी युरोपियनांना संस्कृत भाषा परकी; आणि परकी भाषेंत कोणी कितीही निष्णात झाला तरी ज्याच्या हातून एखादी साधारण ढोबळ 'चूक वेळेस होणार नाहीं असा कोणीही पंडित-हिंदी किंवा युरो-
संस्कृत विधा आणि युरोपियन पंडित ७३
पियन--आढळणार नार्ही ही गोष्ट निश्चित आहे. तथापि, अशी एखादी चूक काढून त्यास निरुत्तर करणें निराळें, आणि त्याच्या एकंदर परिश्रमावर व कमाईवर तेवढ्या चुडीच्या आधारावर बोळा फासून त्याला नादान ठरविणें निराळें ! असो; संस्कृत विद्येच्या अध्ययनाचा जुना व नवा असे दोन प्रकार प्रसद्ध आहेत. पेकी दुसऱ्या प्रकाराचे आचार्यत्व बरेंचसे युरोपियन पंडितांकडे देणें जरूर आहे. हा दुसरा प्रकार म्हणजे चिकित्सक बुद्धांचा ब संशोधकपणाचा. आर्यविद्यची विचिकित्सा युरोपियन पंडितांकडूनच विशेष कां व्हावी, ब त्यांनाच ती आमच्याहून कांहीही आधक का साधावी, याला अनेक कारणें आहेत. ऐतिह्यासिक. दृष्टीनें कोणत्याहि _ गोष्टीकडे पाहाणें व तारतम्य भावानें कोणचीही वाड्मयात्मक वस्तु तोळून मापून घेणें याचें बळण आमच्यापेक्षा युरोबियन पंडितांस आमच्या आधींपासूनचे आहे. या कारणाची कारणें कांहीही असोत, पण त्याचें कार्य उघड दिसुन येतं; व तें हें कॉ, संस्कृत भाषेंतील वाड्मय तपासून तोळून तावुन सुलाखून घेतांना युरोपियन पंडित आमच्यापेक्षा निदान कांहीं बाबतीत तरी अधिक निविकार दृष्टि राखू शकतात.
फार जुन्या काळी युरोपियन विद्वानांना हिंदुस्थानची णी माहिती होती ती फक्त बाह्यांगापुरतीच. हिंदुस्थान म्हणजे एक फार समृद्ध, संपन्न, श्रीमान् देश आहे; इतकीच माहिती प्रिनी, स्ट्राबो, टॉलिमी वगेरे ग्रीक लेखकांना होती. मध्ययुगांत एरियन, इलियन, डियोक्रिसोटोमस् १०२ लेखकांच्या लेखांतून हिंदुस्थानांतील आर्य टोकांच्या अंतरंगासंबंधाची माहिती प्रथम रृग्गोचार होऊ लागली. पण “' या आर्य लोकांना स्वतःचे वाडूमय फारसें नसून ते ग्रीक वाळू्मयाच्या आलवालांतून ओंजळी ओंजळीनें पाणी घेऊन आपली तहान भागवीत असावे ” अशी त्यांची कस्पना असे. या विद्वानांना वाल्मिकि-रामायण माहीत असतं, तर “ डूलियडवरून रामायण तयार झालें ” या कल्पनेची पहिली आवृत्ति
७४ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
त्याच वेळीं निघाली असती ! असो; पोतुगीज लोकांनीं हिंदुस्थानास जाण्याचा रस्ता हुडकून काढीपर्यंत युगोेषियन लोकांना पोर्बात्य लोकांची कांहींच माहिती नव्हती अशी सर्वसाधारण समजूत आहे; पण ती बरोबर नाहीं. पोतुंगीजानंतर डच, डचानंतर इंग्रज अशी परंपरा आहे. पोर्तुगीज लोक जलमार्गाने प्रथम हिंदुस्थानांत आले खरे. तथापि, स्थलमागानें इराण व हिंदुस्थान यांचा संबंध युरोपाशीं त्यापूर्वीही येत असे. रोम वब हिंदुस्थान यांच्या दरम्यान पहिल्या सहा सात शतकांत &लेक्झांडयाच्या द्वारानें दळणवळण होतं; आणि इटालीच्या पलीकडे युरोपच्या वाटेवर फ्रान्स ब जमनी हे देश असल्यामुळें, पोतुंगाळपेक्षां आधीं या दोन देशांत हिंदुस्थान व इराण यांची माहिती पसरली होती. फ्रान्स व जर्मनी यांना प्रथम पोर्वात्य देशांची केवळ अंधुक अशीच कल्पना होती; तथापि, या देद्यांविषयी त्यांना कांही विदोष आदर व अद्धत-रम्यता वाटत असावी; कारण जुन्या फ्रच व जर्मन ग्रेथांतून या देशांचें अशाच कर्थाचें वर्णन आढळतें, फ्रेंच आणि जर्मन कविता व गोष्टी यांतील काल्पनिक स्थळें व पात्रें इराण ब हिंदुस्थान यांतून केव्हां केव्हां घेतलेली 'देसतात, बुद्धाच्या गोष्टीवरून ' बर्टोम ब जोसाफेट ! ही कथा रचली असावी असे म्हणतात, इपबी सनाच्या सहाव्या शतकापासून युरोपियन प्रवाद्यांनीं रिदुस्थानांत प्रत्यक्ष येऊन इकडील माहिती तिकडे प्रासिद्ध करण्याचा क्रम सुरू झाला, या शतकांत आलेल्या प्रवाशाचें नांब कासमस ऊर्फ ईंडिको छयूसटस असें होतें. बेंजामिन ट्यूडेला हा ११९० च्या सुमारास ब त्या मागून माकोपोलो हा १२७०-९५ यांच्या दरम्यान इकडे आला हं प्रसिद्धच आहे. त्यानंतर आलेले बरेच प्रवासी इटालियन होते. या प्रवाशांच्या कांहीं खर्या व कांहीं काल्पनिक व अद्धुत वर्णनावरून हिंदुस्थानास १11७011159 ४४ार्याता ' आश्चयभूमे ? असें नांव पडले होते.
संस्कृत विद्या आणि युरोपियन पंडित ७५
आज जसें वाटेल त्या अद्धत वस्तुला आपण ' विडायती ? हें नांव देतों, त्याप्रमाणें सर्वे तऱ्हेचे अद्भुत पशुपक्षी, रानमाणसें, दाढीवाल्या बाया, अभमिभक्षक व अग्न्युद्वाक वनस्पाते, भविष्योत्तर सांगणारी व कोल देणारी पवित्र झाडे-तात्पर्य भोळवट समजुतीने निमीण केलेल्या हरएक अद्भुत वस्तूर्चे स्थान म्हणजे हिंदुस्थान ब इराण हें होय, अशी युरोपांत कांहीं काळ समजूत होऊन गेली होती. यानंतर पोवोत्य गोष्टी, देतकथा वगैरे त्या त्या युरोपियन नामरूपानें सजवून सांगण्यास सुरुवात झाली. बोकेशरोओ, स्ट्पेरोला व लाफाटेन यांच्या ग्रथांत हें रूपांतर व सक्रमण दिसून येतं. हिंदुस्थानांत व इराणांत-म्हणजे त्या काळीं माहीत असलेल्या अत्यंताद्मुत अशा भूमींत-जमन कथापुराणांचे धीरवीर नायक जाऊन त्यांनीं तेथें चिंदबाद दर्यावर्याप्रमाणें विवचित्र साहसे केलीं व संकटें सोसलीं असें वर्णन करणारीं पुस्तकें जर्मन भाषेंत १४व १५ व्या हातकांत होत असत, याच्या उलट, झिंदुस्थानांतील राजपुत्र ब राजकन्या वेषांतर करून जर्मनींत फिरत असल्याच्या काल्पनिक कथाहि या सुमारास तिकडे आढळतात. सोळाव्या शतकापासून युरोपियन प्रवा- शांची संख्या अर्थीतच वाढूं लागली. सतराव्या शतकापासून हिंदुस्था- नांतील व इराणांतील प्रत्यक्ष ग्रेथ युरोपांत जाण्यास सुरुवात झाली. युरोपखंडाला इराण हें हिंदुस्थानाहून अधिक निकट असल्यामुळें प्रत्यक्ष ग्रंथ असे इराणी कावि सादी याचेच युरोपांत प्रथम गेले. युरोपांत सवोच्या आधीं प्रवेश झालेला संस्कृत ग्रंथ म्हणजे. भनहरीरची शतक, पद्वनाभ नांवाच्या ब्राह्मण पंडितांकडून डच लोकांनीं मिळविलेल्या एका प्रतीवरून सन १६५१ सालीं भर्तुहरींच्या दोनशे छोकांचे डच भाषां- तर लीडन या शहरी प्रसिद्ध झालें; व १६६३ सालीं आर्नोल्ड नांवाच्या ग्रहस्थानें त्याचें जमन भाषांतर करून न्यूरेनबर्ग येथे छापले. जर्मन भाषेंत संस्कृत ग्रंथाच्या प्रसिद्धीचा हाच पहिला प्रयत्न होय; व जमेनीच्या
७९ संस्कृत विधेचे पुनरुज्जीवन
प्रयत्नासंबेधानेंच विशेष जोर देऊन सांगण्याचे कारण हें का, संस्कृत विद्रेसंबंधानें युरोपांत जमन लोकांनीं जितकी जाग्राते केली तितकी हिंदुस्थानांत राज्य स्थापलेल्या इंग्रज लोकांचोहि हातन झालेली नाही, संस्कृत भाषेचे खरे भोक्ते जमन ! ब संस्कृत भाषेच्या अभ्यासावर खरे परिश्रम केळे असे जमन लोडांनींच !
जर्मनीमध्ये पारियन भाषेचा अभ्यास अथोतच संस्कृत भाषेच्या अभ्यासा- च्या आर्धी सुरू झाला होता, पण पुढे पुढें संस्कृत भाषेचीच गोडी षर्मन लोकांना अधिक वाटूं लागली. प्रशिद्ध विद्वान् इंग्रज सर विलियम जोन्स यानें सन १७८४ सालीं एदियाटिक सोसायटीची स्थापना केलीं, बण जर्मन पंडित हर्डर याचा संस्कृताचा अभ्यास १७७१ पूर्वीपासूनच सुरू होता. हडर यानें हितोपदेश, नीतिशतक व भगवद्रीता यांतील निवडक भागांचे भाषांतर छापले होते. १७९१ सालीं सर विल्यम जोन्स याच्या इंग्रजी भाषांतरावरून शाकुंतल नाटकाचे जर्मन भाषांतर फारस्टर यानें प्रसिद्ध केलें, हें होईपर्यंत परियन काव्यांची उत्कृष्ट यमकें, त्यांतील सुंदर स्त्रिया, सुवासिक पय, गुलाब फुलांच्या बागा व ऐहिक विलासांच्या वर्णनांतून मधून मधून गोवून दिलेले व एखाद्या रंगेल देववादी तत्त्व- वेत्त्यास सुचणारे दुःखमिश्र विचार या सवोमुळें जमन वाचकांना पर्शियन कवितेचा प्रथम प्रथम बराच मोह पडला, पण शांकुतलाचें भाषांतर प्रसिद्ध झाल्यापासून संस्कृत काव्यग्रथांचा श्रेष्ठपणा त्यांच्या लक्षांत भरला. प्रख्यात जर्मन कवी ग्युएटी हा पोबात्य वाळूमयाचा नादी असून, रामा- यणांतील रामरावणाच्या युद्धांतील राक्षसांच्या व विशेषतः वानरसेनेच्या वेष्टांची वर्णनें आपल्या स्नेही मेडळीस तो वाचून दाखर्बीत असे, पण या गोष्टींनी त्याचें जे समाधान होत नसे तें १७९१ सालीं कालिदासाच्या शाकुंतलाचे भाषांतर वाचून झाले,
पांच वर्षोनेतर ग्युएटी यानें फास्ट नामक काव्य लिहिलें त्यांतील
संस्कृत विदया आणे युरोपियन पंडित ७७
कांहीं कांही प्रवेशांची प्रेरणा कालिदासाच्या प्रतिभेनेंच झाली असं अमे- रिकन भाषापंडित डे० आथर रेमी यांचें म्हणणें आहे. 1?819 नामक ग्युएटीच्या ग्रंथांत मातुःश्रींचा शिरच्छेद करणाऱ्या जामदग्न्याची गोष्ट आणि स्वतःच्या हातानें शिरच्छेद करून घेतलेल्या आणि आपल्या पतीला देवीच्या वरप्रसादानें पुनः जिवंत करणाऱ्या मदनसंंदरीची-वेताळ- पंचविश्ींतील-गोष्ट घेतलेली आहे. ग्युएटीला परियन कवी सादी व हाफीज यांचीही बरीच गोडी होती; आणणि ' दिवाणी ? नामक त्याच्या काव्यांत हरप्रकारच्या उमद्या व विलासी परियन कविकल्पनांची लयलूट झालेली दिसते. ग्युएटीप्रमाणें प्रसिद्ध नर्मन कवी शिलर यालाही पौर्वात्य वाडूमयाची गोडी लागली होती. ग्युएटीनें शिफारस केल्यावरून शिल्रनें गीतगोविंद्राचें भाषांतर वाचले होतं; आणि शाकुंतल नाटकाचे रूपांतर करून त्यावरून प्रयोगाकरितां एक जमन नाटक करावें असाही त्याचा विचार होता. पण शिलरची वीररसप्रधान नाटके ज्यानें वाचलीं असतील त्याला, शाकुंतल हे केवळ श्हंगारिक ब म्हणुन मवाळ असं वाटुन त्यानें त्या गोष्टांचा नाद कसा सोडला अल, यांची चांगली कल्पना येईल, जमनीत आयेविद्येच्या अभ्यासाची परंपरा स्थापित होण्यापूर्वीच शिल़र हा
ण पावला.
संस्कृतांत झालें तरी काव्य व नाटक हें वाडू्मयांतील गोण असेंच अंग आहे; ब कोणत्याही परकीय लोकांवर काव्यनाटकांच्या योगानें आर्यलोकांच्या बुद्धिमत्तेचा, विद्वत्तेचा व सुसंस्कृतीचा कायमचा ठसा पडणें अथोतच शक्य नव्हतें. धघार्मेक व तात्विक वाड्मय हाच आर्य- संस्कृतीचा खरा गड्डा असें आपण तर म्हणुंच; पण कालांतराने जमन पंडितांचे मतही तसंच बनून त्यांनीं काव्य नाटकांस दूर लोटून आर्य- संस्कृतीच्या या गडुथास हात घातल्यास त्यांत नवल नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस तुलनात्मक भाषाशास्त्राच्या अभ्यासास युरोषखंडांतील
७्ट संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
विद्वानांनी सुरुवात केली होती, आणि या संघायक भावनेनें संस्कृत ब युरोपियन विद्यांचें व विद्वानांच्या मनार्चे जे एका वेळीं एकीकरण झालें तें आजवर कायम असून दिवसदवस वाढतच आहे. अठराव्या रात- काच्या अखेरीस इंग्रजांनीं हिंदुस्थानावर आपलें राजकीय वचस्वब निःसंशय स्थापले; पण त्याच वेळीं जमर्नांच्या लोकांनी या देशावर अध्यात्मिक ब विद्याविषयक वचेस्व स्थापण्यास सुरुवात केली. या उद्यो- गाचे खरे पुढारी फ्रेडरिक झेजेळ व आगस्ट विल्यम केजेल हे होत. फ्रेडरिक यानें सन १८०८ सालीं 1) तटाला वटा" वाटा नामक ग्रंथ प्रासद्ध केला, त्यांत महाभारत, रामायण, मनुस्मृति, संस्कृत छंदःशास्त्र, व्याकरण वगैरे गोष्टींचे साधारण स्वरूप सांगून त्यानें संस्कृत वृत्तांत जमन छोकही रचले, आणि तुलनात्मक भाषापद्धतीनें संस्कृत व युरोपियन भाषा यांचा निकट संबंध कसा आहे हें दाखविलं, या दोघां बंधूनी मिळून हितोपदेश, नीतिशतक, पुराणें यांचे मासलेही भाषां- तराच्या द्वारें जमन लोकांपुढे मांडले, आगस्ट छेजेळ याचा एक भाऊ इस्ट हॉडिया कपर्नांच्या नोकरींत होता, व दुसरा मद्रासेस नोकरीत अस- तांच मेला, पहिल्याच्या स्मरणार्थ त्यानें 1012 0328150122 0१९8 फाटा) ही कविता रचिली. 'छेजेस बैधुच्यानेतर पौवात्य व पाश्चात्य बाड्मयांचें एकीकरण करणारा असा स्कर्ट . हा जर्मन पंडित होऊन गेला. याला जमन ब्राम्हण अशी संज्ञा देतात; व त्यानें संस्कृत वाडू- मय जमन भार्षेत ओतण्याचा प्रयत्न जन्मभर केला. त्याच्या ग्रथांत भारत, रामायण, हितोपदेश, पंचतंत्र, कथासरित्सागर, रघुवश्य, कुमार- संभव, उपनिषदे, पुराणें, भागवत वगेरंतीळ अनेक उतारे आढळतात. याशिवाय, चांद्रायण न्रत, पंचतपःप्रयांग, ४वितामणीचा सर्वार्थसिद्धकता हा गुण, चंद्रकमल व सूयकमल यांचे धर्म, वगेरे अनेक संस्कृत कल्प- नांचा उपयोग त्याच्या स्वतंत्र ग्रंथांतून केळेला सांपडतो; व एकंदरीने
संस्कृत विद्या आणि युरोपियन पंडित ७९
त्याच्या मनावर संस्कृत विद्येची पुष्कळच छाप पडली होती ही गोष्ट निधिवाद आहे, रूकटच्या ग्रंथांत हिंदुस्थानच्या इतिहासांतील अनेक प्रसंगही आढळतात; उदाहरणाथ्र-प्रतापासेह व अकबर यांजमधील चितोडसंत्रंधाचें युद्ध, चांदबिबीचे शो्य वगेरे, इतकेंच नव्हे तर पाद ( पाय किंवा किरण ), बकर ( बगळा किंवा भोंदू ), द्विज ( ब्राह्मण, पक्षी किंबा दांत ) या अनेका्थी शब्दांबरच्या कोट्या त्यानें जमन भाषेत उतरविल्या आहेत. तसेंच संस्कृत हिमालय पवेत व जर्मन हिमेल [11110 संस्कृत हिमवत् व जमन 71, सस्कृत माया व मैन ९४12 या शब्दांवर झछेष करण्याचेंही धाडस त्यानें केलं ! संस्कृत कविकल्यनांत खरा गढून गेलेला जर्मन कावि म्हणजे हेनरिक हाईन हा होय. हा ेजेलचा शिष्य होता. चंद्रकमळांवर तर त्यानें एक स्वतंत्र काव्यच लिहिलें आहे. गंगातीर, चंद्रकिरणप्रकाशित उद्याने, सरोवरें, मुगांचे कळव, ताल व तमालराजी, मयूर, कोकिळा, काम, वसंत, गंघवे-वगेरे कविमनरंजक समयपुनीत सुंदर वस्तुकलापांचा त्यानें आश्रय केला होता; अनेक कवितांच्या द्वारे संस्कृत कवीच्या अंतःकरणाच्या गाभ्यांत तो शिरला होता; आणि शिंदुस्थानांतील उत्कृष्ट अशा निसर्ग- निर्मत देखाव्यांचे मानसिक दृष्टिसुख घेण्यांत तो अगदीं गढून गेलेला असे. विश्वामित्र व वसिष्ठ यांच्या पुराणप्रसिद्ध भांडणांची उपमा त्यानें एका काव्यांत योजली आहे. आणि “' भगीरथाने ज्याप्रमाणें स्वर्गोतून गंगा आणली त्याप्रमाणे आपली प्रियतमा एमा इचा प्रणयानुनय कर* ण्याचा मीं प्रयत्न केला. ” असंही तो सांगतो. हे जर्मन ग्रंथकार पूर्वींच्या काळांतले झाले; पण अलीकडच्या काळांतही ही परंपरा चालूच आहे. १८८७ सालीं बोडेन स्टेट नामक जर्मन ग्रंथकाराने शाकुंतलाच्या आधारें एक जर्मन नाटक लिहिलें आहे; त्यांत महाभारतांतील शकुतलाख्यान, कालिदासाचे शाकुंतल व अनेक स्वकपोलकह्पित रचना यांची खिचडी
८० संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन
केली आहे. व्हॉन शक ४०1 8180 या आधुनिक जर्मन ग्रंथकाराने फर्दुसीच्या काव्याप्रमाणे 8011011100) ४० (91208 या नांवाच्या ग्रंथांत अनेक पोर्वात्य कथा गोंबल्या झाहेत.
पण पूर्वी सांगितल्याप्रमाणें केवळ काव्य नाटकांच्या योगानें युरो- पियन पंडितांच्या मनांत पोवात्य वाडयाय वाचण्याची प्रेरणा झाली तरी तें वाचन अर्थातच तेथे थांबणे शक्य नव्हते. गुलिस्तान, बोस्तान, गजल वगेरे पर्शियन काव्यें; आणि नीतिशतक, हितोपदेश, गीतगोबिंद, शाकु- तल वगेरे संस्कृत वाढ्य़याचे नमुने वाचायला चांगले खरे. तथापि खऱ्या विद्याप्रिय युरोपियन पंडितांना वेद ब उपनिषदे वाचावयास मिळूं लागल्यावर काव्य नाटकांकडे त्यांची प्रवृत्ति होणे अशक्य होतें; आणि काव्य नाटकें वाचून त्यांचे मन जरी रमलें अप्लेल, तरी संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या कार्मी युरोपियन पंडितांकडून जी मदत झाली ती ते लोक वेद व उपनिषदे वाचू लागल्यापासूनच झाली.
देशी भाषांच्याठ्वारे झालेले प्रयत्न
इग्रजी भाषेच्या अभ्यासास प्राधान्य येऊन संस्कृत व मराठी दोनही भाषा मागासल्या अशा काळाचें वर्णन पूवी आलेंच आहे. सुदैवाने हा कालावाषे फार थोडा होता. यापुढचें स्थित्यंतर म्हणजे ज्या काळांत मरा- ढीस व मराठीच्या द्वारे संस्कृताच्या अभ्यासास उत्तेजन आले तो. मराठी ब संस्कृत यांचा संबंध असाच कांहीं निकट आहे काँ, संस्कृताचा परि- श्रमपूवक अभ्यास केल्याशिवाय मराठी वाडमय वाढावयाचेंच नाहीं. मराठी भाषेच्या अभिमान्यांना अमुक एका वेळेस मराठी ही स्वतंत्र भाषा होऊं ठागलठी असें दाखवितां येईल, किंवा अमुक एक शब्द अथवा अमुक एक प्रकारचा प्रत्यय हा मराठीच्या स्वत्वाचा किंवा व्यक्ति-
देशी भाप्रांध्याद्वारें ज्नालेले प्रयत्न ८१
त्वाचा द्योतक आहे असेही सिद्ध करितां येईल. पण संस्कृताची भूमिका काढून घेतल्यास मरार्ठाचें स्वतःचे म्हणून कांही अभिमानास्पद वाब्याय उरेल असे म्हणतां येणार नाहीं. मराठी ही जिंवत देश-भाषा व संस्कृत ही मृत देश-भाषा असे आपण म्हणतों खरें. परंतु लोक प्रत्यक्ष व्यव. हारांत बोलतात ती जिवंत ब जी ते प्रत्यक्ष बोलत नाहींत ती मुत येव. ढ्यापुरतेच, व केवळ या अरथानेंच वरील म्हणर्णे खरं आहे. एरवी जिवंत. पणाच्या गुणघमोच्या दृष्टीनें पहातां उलटापालट होते. प्रो, मक््समुल्लर यांनीं एके ठिकाणीं असें म्हटलें आहे की, संस्कृत भाषा ही हृल्लीं आहे ह्याहून आणखीही अधिक ' मृत ? भाषा असती तरी, हिंदुस्थानभर ज्य भाषा सजीव म्हणून स्वतःस म्हणवीत आहेत त्या सर्वे आर्य-व द्रविर्ड वगेरे अनार्य भाषाही-आपल्या प्राणांच्या प्राणासंबेंघानें संस्कृताच्याच सर्वस्वी कुणी आहेत ही गोष्ट कांहीं खोटी नाहीं, (_..-“-
कोणच्याही देशी भाषेंतील उच्च दर्जाचे वाढ्य़य घेतलें तर अर दिसून येईल कां त्यांतल्या रम्य कल्पना, उदाहरणें, दाखले, न्याय सिद्धांत, अलंकार वगेरे प्रायः संस्कृतांतूनच घेतळेळे असतात. फा: काय पण अशा वाढ्ययांतील दोंकडा ७५ शब्द सवोस साधारण अस तात. कारण सवांचे जे मायपोट किंवा समान अधिष्ठान म्हणजे संस्कृत त्यांतून ते घेतलेले असतात. संस्कृताच्या उपकारकत्वाचा याहून अन घुरावा कोणता असणार ! संस्कृत ही आज ' बोलती ! भाषा नाहीं अरं असले तरी तेवढ्यावरून कांहींच सिद्ध होत नाही; कां कीं ती आई शेकडो वर्षे तशीच आहे. दरम्यान देशभाषत-प्राकृतांत-झालेले ग्रेः असे फार थोडे; ग्रंथरचना प्रायः संस्कृतांतच होई. संस्कृत ही बोलत भाषा नाहींशी होऊन आजे कर्मात कमी तीन हजार वर्षे झाल असावीं, व आज सर्वे हिंदुस्थानच्या खानेसुमारींत संस्कृत ही आपल : घरीं बोलण्याची ? भाषा आहे असं लिहून देगारे लोक पांचपन्नास|
६
८२ संस्कृत विद्येर्चे पुनरुज्जीवन
सांपडावयाचे नाहींत. तथापि, संस्कृत भाषेचें स्वामित्व अद्यापि आहे तसें अढळ व निर्विवाद आहे; आणि या तीनसाडेतीन हजार वषीच्या अवधींत जेव्हां जव्हां विद्येचे पुनरुज्जीवन झाले, जेव्टां जेव्हां राष्ट्राच्या शरीरांत नवीन रक्त खेळावयास लागून विचारस्फुरण होऊं लागलें तेव्हां तेव्हां, संस्कृत भाषेवरील भस्म फुंकले जाऊन, आंतून संस्कृत विद्येचे तेज प्रचलित देशी भाषेच्याद्वारे राष्ट्राच्या तोंडावर पडलेलं असे, असेंच बहुधा आढळून येईल.
युरोपांत १५ व्या १६ व्या शतकांत जेव्हां विद्येचे पुनरुज्जीवन झालं तेव्हां ग्रीक व लॅटिन या मृत भाषांच्या उद्घारानेंच तें कार्य सिद्ध झालें, पण अँग्लो संक्सन भाषा लंटिन व ग्रीकला जितकी जवळ आहे त्यापेक्षां मराठी, गुजराथी, बेंगाली व हिंदी या संस्कृतला अधिक जवळ आहेत. आणि गेल्या शतकांत इंग्रजीच्या उद्दीपनाने हिंदुस्थानांत विद्येच्या पुन- रुज्जीवनाची वेळ झाली तेव्हां संस्कृताच्या अभ्यासाकडे हिंदी टोकांचें [फरून लक्ष वेधले यांत आश्चर्य नाहीं. या काळापासून संस्कृत वाड्ययाचं परिशीलन युरोपियन व हिंदी लोक या दोघांनी दोन तऱ्हांनी केलें. पेकी युरोपियन लोकांनीं केलेलें परिशीलन आमच्या परि्शीलनाहूनही अधिक उपयुक्त व स्फूर्तिकारक कसें झालें आहे याचा विचार आज कर- ण्याचें कारण नाहीं. आज देशी भाषांच्या द्वारें अथवा देशी भाषांस उपकारक होईल अशा रीतीनें संस्कृत विद्येच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न इकडे कसकसा झाला आहे याचे थोडक्यांत निरीक्षण करू,
बेंगाल प्रांतांत संस्कृुताचा अभ्यास नवीन पद्धतीनें करण्याचा प्रयत्न राजा राममोहनराय यांनी प्रथम केला, राममोहनराय यानी इंग्रजी भापंचें ठिक्षण हिंदुस्थानांत य्यावें अणाविषयीं जरी चळवळ केटी तरी स्वतः त्यांचें संस्कृत भाषेचे अध्ययन चांगड होते. व ते नव्या पद्धतीचे विद्वान् झाले नसते तर त्यांचें नांव ' पंडित ? नात्यानें खास ऐकू आलें
देशी भाषांच्याद्वारें झालेले प्रयत्न ८३
असतें. राजा राजेंद्रलाऊ मित्र यांनीं बिब्लिझओोथेका इंडिका या मासिक पुस्तक!चे द्वारें बऱ्याच संस्कृत ग्रंथांचे संशोधन करून ते छापले हें प्रासे- दच आदे. तसेंच शब्दकल्पद्रुमाचे कर्ते राजा सर राधाकांत देव, पंडित ईश्वरचंद्र विद्यासा.,र, तारानाथ तकबाचस्पाते, पंडित जीवानंद विद्या- सागर, व्रावू भुवनमारन वैश्याख, महेशचंद्र पाल, रमेशचंद्र दत्त, प्रताप- चंद्र राय, मन्मथनाथ दत्त वगैरे विद्वानांनी संस्कृत ग्रंथ छापणें, संपादणें, टोका व भापांतर करणें या बाबतीत केलेले परिश्रम नमृद करून ठेव- ण्यासारखे आहेत. वाबू जीवानंद विद्यासागर यांनीं तर जवळ जबळ दोनदा रूस्कृत ग्रेथ छापून प्रशिद्ध केळे असतील. हे ग्रंथ असावे तितके शुद्ध नाहींत. तर्थाप, केवळ ॥८द्वानांची दृष्टि बाजुस ठेवली तर या कांहीशा सदोप्रशाठ मिश्रित पण चालचलाऊ ग्रेंथांनीं हजारो संस्कृत अध्ययनेच्छु लोकांचे फार मोठें काम झालें आहे. बंगाल्यांतील रायळ एशिआरटिक सोसायटीने संस्कृत ग्रंथ संशोधनास बरच दिवसांपासून सुरुवात केलळली आहे, व हत्ये मदामहोपाध्याय हरपसादशास्त्री, राय शरच्चंद्र दास बहा. दूर वभे'नीं शे.घक दर्शनें पुष्कळ नव्या संस्कृत पोथ्यांची भर घालून आजचा हस्तळिखित संग्रह बराच समृद्ध केला आहे.
संयुक्त प्रांतांत काशी हें तर संस्कृत विवेचे आगर आहेच. पण काशी येथील सस्कृत कालेजच्या अध्यक्षाच्या जागी आलेल्या युरोपियन विद्वानांच्या परिश्रमाने चाललेले “ पंडित ' नांवाचें संस्कृत मासिक पुस्तक संस्कृत ग्रेथ छापून प्रसिद्ध करण्याच्या कार्मी बरेच सहायभूत झाले आहे. त्याचप्रमाणे काशी येथे बाबू पी. एटू. मित्र ब हारेदास गुप्त यांच्या परिश्रमानें निघालेल्या चोखांबा संस्कृत ग्रंथमालेमध्ये अनेक उप- युक्त संस्कृत ग्रेथ प्रसिद्ध झालेले आहेत. अलाहाबादेस कांही थोडे दिवसांपासून डॉ. बी. डी. बसूप्रभाति कित्येक संस्कृताभिमानी ग्रह. स्थांनीं ' पाणिनि-आफिस ' नांवाची संस्था काढलेली असून तिच्या
८४ संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन
द्वारे आजपर्यंत अनेक संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. पाणिनि-ऑफि- सच्या दवार प्रसिद्ध झालेल्या अष्टाध्यायीच्या सभाषांतर आवृत्तीवर प्रो. मक्समुल़ूर हे अत्येत खुष होऊन त्यांनीं ग्रंथकर्त्यांस असे लिहिलें की, “ चाळीस वषोपूर्वी मी जेव्हां पाणिनीची अष्टाध्यायी शिकत होतो, आणि त्यांतील तीं बिकट सूर्त्रे ब त्यांवरची त्याहूनही बिकट वातिके वाचतां वाचतां डोक्यावर हात देऊन वेडा होऊन जात असे, त्या वेळीं हृल्डींसारवी पाणिनीची आवृत्ति हाती. पडती तर तिच्याकारितां मीं काय बाटेल ती किंमत दिली असती. ” नवीन तऱ्हेचा संस्कृताचा अभ्यास बंगाल्यांत आर्धी सुरू झाला. परंतु “* खरी मार्मिक व शोधक विद्वत्ता मुंबई इलाख्यांतच सांपडते, अन्यत्र सांपडत नाहीं, ' असे राय शरच्चंद्रदास बहादूर या विद्वानू बंगाली ग्रंथकाराने आपल्या एका लेखांत म्हटलं आहे, व ते कांही अंशीं खरंही आहे. मुंबईद्द इलाख्यांत संस्कृत ग्रंथ पुष्कळ प्रसिद्ध झाले असून शिवाय त्यांचे संपादन कृत्यही शोधक विद्वानांच्या हातून झालेलें आहे. संस्कृत- ग्रंथप्रसषिद्धीच्या कामीं प्रमुख नांवें म्हटली म्हणजे मुंबईचे श्रीव्यंकटेद व निर्णयसागर छापखाने व पुण्याचा आनंदाश्रम छापखाना हे होत. आणि या बाबतींत पंडित खेमराज श्रीकृष्णदास, रोट जावजी दादाजी आणि महादेव चिमणाजी आपटे यांचे उपकार अगणित आहेत. व्यंकटेश- समाचार छापखान्यांत प्रसिद्ध झालेले धर्मग्रंथ, नि्णयसागर छापखान्यांतुन प्रसिद्ध झालेले--विशेषत: काव्यमाला मासिक पुस्तकांतून छापलेले--- काव्यग्रंथ, व आनंदाश्रम छापखान्यांतुन प्रसिद्ध झालेलीं पुराणें ब तत्व- शानाचे ग्रंथ हे सवे एकत्र केळे तर तो एक बिनमोल ग्रेथसंग्रहच होईल. तर्सेच मुंबईचे प्रसिद्ध थिओआसफिस्ट तुकाराम तात्या यांनीं तत्वविषचक छापखान्यांतुन प्रसिद्ध केलेळे वेदविद्येचे ग्रंथही फार उपयुक्त आहेत. शोधक ब संपादक या नात्यानें पंडित भगवानलाल इंद्राजी, भाऊ
देशी भाषांच्याद्वारें झालेले प्रयत्न ८५
दाजी, भांडारकर, तेलंग, मंडलीक, पाठक, त्रिवेदी वगैरेंनी बरेंच काम केलेलं आहे. मद्रासेकडे संस्कृत भाषेचे अध्ययन पुष्कळच माहे, व तिकडेही मध्वविलास, वाणीविलास वगैरे छापखान्यांतून प्रसिद्ध झालेले मृल ग्रेथ, म्हैधुराकडील बि्ळिओथेका संस्कृतिकानामक ग्रंथमालेंतील ग्रंथ, त्रावणकोर संस्थानांत प्रसिद्ध झालेले ग्रंथ, तसेंच हल्लीं निघालेली शंकराचार्यांच्या समग्र ग्रेथांची आवृत्ति वगेरंनीं संस्कृत अध्ययनास दिलेलें उत्तेजन फारच उपयोगीं पडलेलें आहे.
संस्कृत ग्रेथांचे मराठींत ज्ञान करून देण्याने संस्कृत पुस्तकांच्या अध्य- यनास या इलाख्यांत आजपर्यंत पुष्कळ मदत झाली आहे. के. डेकर पांडुरंग पंडित, के. माधवराव कुटे, काशिनाथशास्त्री लेले, घुले, द्रवीड, भानु, आप्पाशासत्री राशिवडेकर, अभ्यंकर, गर्दे, ऐनापुरे, गोडबोले, चिपळूणकर, बापटशास्त्री, वैद्य, मोडक, लिमये यांच्या परिश्रमाने वेद, उपनिषदे, भारत, भागवत, रामायण, पुराणें, वेदांत, वगैरेंच्या अध्य- यनास निवळ मराठी वाचकांना झालेली मदत ब्रिनमोल होय. संस्कृत वाढ्ायांतील उत्तमोत्तम ग्रंथांचे मराठींत भाषांतर करून मराठी भाषेची अभमिवृद्धि व सस्कृताध्ययन या दोहोसही एकदम साहाय्य करण्याची प्र्रात्ति अद्यापही अव्याहत चालली आहे. या प्रवृत्तीचे दर्शक असे प्रस्तु- तचे ठळक प्रयत्न म्हटले म्हणजे शेट दामोदर सावळाराम यांचा उप- निषत्पकाश व पुराणग्रंथमाला, वे. शा. सं. बापटशास्त्री यांची ब्रह्मविद्या- अ्रंथरत्नमाला, आणि चार भाषांत प्रसिद्ध होणारा श्रुतिबोध हे होत. दर- एक पुराणाचा त्रोटक पण सुसंबद्ध सारांश मराठींत देण्याचा उपक्रम षुराणग्रंथमाला करीत असून उपनिषत्मकाशाचे दर अंकांत, एक मुख्य उपनिषद् व त्यावर आचार्यभाष्य हीं मराठींत भाषांतरासह देण्याचें कार्य चालूं आहे. ञह्मविद्याग्रंथरत्नमालेंत आरंभीं विद्यारण्याचा अनुभूतिप्रकाश, अन्वय अर्थ ब विवरण यांतह प्रासिद्ध होत असतो. पण चौथ्या अंका-
८६ संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन
पासुन संपादकांनी त्यांत अशी सुधारणा केली आहे की, प्रत्येक उप- निषदाचें मूळ आणि त्यावरील शंकराचार्य यांचें भाष्य आणि शंकरानंद ब विद्यारण्य यांचें आत्मपुराण ब अनुभूतिप्रकाश हीं तिन्ही एकदम सान्वयार्थविवरण अशीं द्यावयाची, तिसरा प्रयत्न म्हणजे चार भाषांत निघणाऱ्या श्रृतिब्रोधाचा होय. संस्कृत वाढ्ययांत व सनातनधमोत धुर्ताचें स्थान आद्य एवढेंच नव्हे तर अत्युच्च व पहिल्या प्रतीचे अस. ल्यामुळें एका दृष्टीने हा प्रयत्न विशेषच महत्वाचा मानला पाहिजे, वेदार्थ- प्रसिद्धीचे यत्न आजपयंत अनेक झाले; पण ते बहुतेक अर्धवटच राहिले आहेत. हें काम असें आहे कीं तें जितकें त्वरित व परिपूर्णतेने वाचकांचे हाती पडेल तितके सर्वे दृष्टींनी इष्ट व जरूरीचे आहे. पूर्वीचे यासंबंधाचे प्रयत्न फार व्यापक कार्य हातीं घेतल्यामुळे किंवा मासिक पुस्तकाची पृष्ठसंख्या थोडी धरल्यामुळें अर्धवट राहिलेले आहेत. असल्या फुटकळ ब अर्धेबट प्रयत्नांचा भाषाभिवृद्धि किंवा वाढ्ययवृद्धि या दृष्टीनं फारसा उपयोग नसतो ही गोष्ट लक्षांत आणून, आधीं आंखून हातांत घेतलेले कार्य त्वरित पुरें होऊन समग्र ग्रेथ वाचकांचे हाती. लवकर पडण्याची तजवीज श्रृतिबाधकार करतील, तर ते मराठी भाषेची उन्नति व वाढ' आणि संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन या दोनही दृष्टींनी दृष्टच होईल असें आम्हांस वाटतं,